Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; संतप्त नागरिकाचा प्रशासनाच्या दारात ‘कचराफेक’ आंदोलन

नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील चार दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी अनोखे आंदोलन केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 28, 2026 | 03:02 PM
Karjat News : ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; संतप्त नागरिकाचा प्रशासनाच्या दारात ‘कचराफेक’ आंदोलन
Follow Us
Follow Us:
  • ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
  • संतप्त नागरिकाचा प्रशासनाच्या दारात ‘कचराफेक’ आंदोलन
कर्जत/ संतोष पेरणे : नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वार्ड क्रमांक 5 मधील कचरा मागील चार दिवसांपासून उचलला जात नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी अनोखे आंदोलन केले. शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख संदीप उतेकर यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घरगुती कचरा आणून टाकत प्रशासनाचे लक्ष वेधले.

नेरळ येथील वार्ड क्रमांक पाचमध्ये मागील चार दिवसांपासून कचरा उचलणारी घंटागाडी फिरकलीच नाही. यामुळे रहिवाशांच्या घरात कचऱ्याचे ढीग साचले असून, परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नेरळ मध्येच असलेल्या ‘बुर्हानी पार्क’ सारख्या भागांत घंटागाडी नियमित येत असताना, वार्ड क्रमांक पाच मधील रहिवाशी यांना डावलले जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे.याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार विचारणा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संदीप उतेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. प्रशासनाला जाग आणण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरातील कचरा एका बादलीत भरून थेट ग्रामपंचायत कार्यालयात नेला आणि कार्यालयाच्या दारात तो कचरा ओतून प्रशासनाचा निषेध केला. “आम्ही कराचा भरणा करतो, मग कचरा उचलण्यास दुजाभाव का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Karjat News : टोरंट जलविद्युत प्रकल्प आणि शिलार धरणाला गावकऱ्यांना विरोध कायम; संपप्त नागरिकांचं धरणे आंदोलन

दरम्यान संदीप उतेकर यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ग्रामविकास अधिकारी व प्रशासक रजेवर असल्याचे कारण देऊन जबाबदारी टाळली जात आहे. मात्र नागरिकांच्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष करणे हे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. नियमित घंटागाडीची सोय उपलब्ध नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. घंटागाडीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे आणि वार्ड क्रमांक पाचसह इतरही भागांत नियमित कचरा उचलला जावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. जर प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Matheran News : निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार; मलनिःसारण उघडे चेंबर्स ठरतायत धोकादायक

Web Title: Karjat news gram panchayats mismanagement is on the rise angry citizens protest at the administrations door by throwing garbage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.