Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळाच्या बारशाला पाळण्यात वरवंटा का ठेवतात ? काय आहे यामागचं कारण ?

बारशाच्या वेळी बाळाच्या पाळण्यात वरवंटा ठेवतात. पण कधी प्रश्न पडलाय का हा वरवंटा पाळण्यात ठेवण्याचं कारण काय ? चला तर मग याचं नेमकं कारण काय ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 24, 2026 | 05:10 PM
बाळाच्या बारशाला पाळण्यात वरवंटा का ठेवतात ? काय आहे यामागचं कारण ?
Follow Us
Follow Us:
  • बाळाच्या बारशाला पाळण्यात वरवंटा का ठेवतात ?
  • काय आहे या मागचं कारण ?
हिंदू परंपरेनुसार, असं सांगितलं जातं की, बाळ सव्वा महिन्याचं झालं की त्याचं बासरं करावं. हा बाराशाचा विधी मोठ्या उत्साहात घरातली मंडळी करतात. पण बारशाच्या वेळी बाळाच्या पाळण्यात वरवंटा ठेवतात.कधी प्रश्न पडलाय का हा वरवंटा पाळण्यात ठेवण्याचं कारण काय ? चला तर मग याचं नेमकं कारण काय ते जाणून घेऊयात.

बाळाच्या बारशावेळी त्याच्या पाळण्याच वरवंटा ठेवण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत. बारशाच्या दिवशी बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी, वरवंट्याला (पाटा-वरवंटा) साडीने गुंडाळून, चेन-टिकली लावून नटवून बाळाप्रमाणे पाळण्यात ठेवतात. असं म्हणतात की, ‘सटवाई’ किंवा वाईट शक्तींना चकवा देण्यासाठी आणि बाळाच्या रक्षणासाठी, तसेच बाळ सुदृढ व बळकट व्हावे हा यामगचा उद्देश असतो.

या परंपरेची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत

शास्त्र असं सांगतं की, बारशाला सटवाई देवी बाळाच्या नशिबाची नोंद करण्यासाठी येते. त्यामुळे, आधी वरवंटा पाळण्यात ठेवून सटवाईला भरकटवले जाते, जेणेकरून वाईट दृष्टी या वरवंट्यावर पडावी, बाळावर नाही.काही ठिकाणी या प्रथेला ‘पाचवी पूजन’ किंवा ‘सटवाईची पूजा’ म्हणतात. पाटा-वरवंटा या पूजेत महत्वाचे मानले जातात.ही प्रथा प्रामुख्याने बाळाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी आणि त्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पाळली जाते.

Mangaladitya Rajyog 2026: एप्रिल सुरु होताच ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस; सूर्य-मंगळाची युतीमुळे अडचणी होणार दूर

शास्त्रीय कारणं काय ?

याला जसं धार्मिक कारण आहे तसंच शास्त्रीय कारणं देखील आहेत. असं म्हटलं जातं की, बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी पाळणा तपासून पाहण्यासाठी वरवंटा ठेवला जातो. वरवंटा जड असल्याने आधीच कळतं पाळण्यामध्ये कुठलीही समस्या नाही. वरवंटा हा स्थिर आणि जड असतो आणि पाळणा रिकामी ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाईट शक्तीना लांब ठेवण्यासाठी पाळण्यात वरवंटा ठेवला जातो. वरवंटा हा भूमी तत्वाशी निगडीत आहे. त्यामुळे कणखरपणा आणि सहनशक्ती वरवंटा दर्शवतो. वरवंट्याप्रमाणे बाळ देखील कणखर, सहनशील आणि स्थिर घडावं असाच दृष्टीकोन यामागे सांगितला आहे.

वरवंटा हा स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक आहे. पूर्वी मसाले, धान्य वाटण्यासाठी वरवंट्याचा वापर केला जायचा. त्यामुळे तो अन्न, पोषण आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो.वैद्यकीय सुविधा कमी असलेल्या काळात लोक पारंपरिक उपायांवर जास्त विश्वास ठेवत. बाळ आणि आई सुरक्षित राहावेत म्हणून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टी केल्या जात. वरवंटा ठेवणं हे त्यापैकी एक संरक्षण असतं हा विचार त्यामागे असायचा.

Shukra Gochar 2026: रामनवमीला शुक्र गोचर संयोग, सिंह राशीसह करिअरच्या उन्नतीची संधी; सुखसमाधानाने नांदणार

धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

 

Web Title: Why we put pestal during traditional name ceremony as per hindu ritual

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • astrology news
  • hindu religion
  • traditions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.