Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

213 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे विमान बुडाले होते समुद्रात; जाणून घ्या 1 जानेवारीचा इतिहास

जगभरामध्ये नवीन वर्षे म्हणून 1 जानेवारीला उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरण असते. तरुणाईचा उत्साह देखील दांडगा असतो. त्याचबरोबर अनेक ऐतिसाहिक घटना या दिवशी घडल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 01, 2025 | 05:07 PM
Air India plane carrying 213 passengers sank in the sea history of January 1st

Air India plane carrying 213 passengers sank in the sea history of January 1st

Follow Us
Close
Follow Us:

नवीन वर्षाचे देशासह जगभरामध्ये जल्लोषाचे वातावरण असते, पण वर्षाच्या पहिल्या दिवशी एक दुःखद घटनाही इतिहासात नोंदवल्या गेल्या आहेत.  1978 मध्ये या दिवशी एअर इंडियाचे विमान 213 प्रवाशांसह समुद्रात कोसळले होते. सम्राट अशोक नावाचे हे बोईंग ७४७ बॉम्बे (आता मुंबई) आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर १९७८ मध्ये यांत्रिक बिघाडामुळे क्रॅश झाले.

विमानात 190 प्रवासी आणि 23 क्रू मेंबर्स होते. घटनेनंतर लगेचच हा कटाचा भाग असावा असा संशय व्यक्त केला जात होता, परंतु समुद्रात सापडलेल्या विमानाच्या अवशेषाच्या तपासणीत हा अपघात असल्याचे सिद्ध झाले. 1 जानेवारी 2024 रोजी चीनने 1990 नंतर प्रथमच निकाराग्वामध्ये आपला दूतावास उघडला. निकारागुआचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल ओर्टेगा यांच्या सरकारने तैवानशी संबंध संपवल्यानंतर चीनने हे पाऊल उचलले.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या आणखी काही घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:-

  • 1664 : छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत मोहीम सुरू केली.
  • 1804 : हैतीने फ्रान्सपासून स्वातंत्र्य घोषित केले.
  • 1862 : भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता लागू करण्यात आली. 6 ऑक्टोबर 1860 रोजी त्यास मान्यता देण्यात आली.
  • 1880 : मनी ऑर्डर प्रणालीचा परिचय.
  • 1925 : अमेरिकेच्या टेलिफोन आणि टेलिग्राफची संशोधन शाखा म्हणून ‘बेल लॅबोरेटरीज’ची स्थापना.
  • 1948 : पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यात हल्लेखोर पाठवल्याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार केली.
  • 1959: फिडेल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखालील बंडखोर सैनिकांनी क्यूबाचा हुकूमशहा फ्लुजेन्सियो बतिस्ता यांचा पाडाव केला आणि त्याला तेथून पळ काढावा लागला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • 1978 : एअर इंडियाचे विमान कोसळून समुद्रात पडले.
  • 1984 : ब्रुनेई या छोट्या समृद्ध आशियाई देशाने ब्रिटनपासून स्वातंत्र्य घोषित केले. तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांमुळे दोन लाख लोकसंख्येचा हा देश दरवर्षी अब्जावधी डॉलर कमावतो आणि संपूर्ण आशिया खंडात दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे.
  • 1992 : बॉम्बे (आता मुंबई) येथे नवीन वर्षाची संध्याकाळ साजरी करताना बनावट दारू प्यायल्याने किमान 91 लोकांचा मृत्यू.
  • 2011 : Oprah Winfrey Network लाँच.
  • 2017 : नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान इस्तंबूलमध्ये नाईट क्लबमध्ये झालेल्या हल्ल्यात 39 लोकांचा मृत्यू, 60 हून अधिक जखमी: क्रोएशियाने अधिकृतपणे युरो स्वीकारले आणि हे चलन स्वीकारणारा 20 वा युरोपीय देश बनला.
  • 2024 : चीनने 1990 नंतर प्रथमच निकाराग्वामध्ये दूतावास उघडला.

 

याचे मूळ आर्टिकल वाचण्यासाठी आपण https://navbharatlive.com/ यावर क्लिक करावे

Web Title: Air india plane carrying 213 passengers sank in the sea history of january 1st

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • air india
  • new year 2025

संबंधित बातम्या

Air India : उड्डाणच्या तयारीत अन् अचानक लँडिंग; एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड 
1

Air India : उड्डाणच्या तयारीत अन् अचानक लँडिंग; एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड 

जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?
2

जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
3

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

AAI मध्ये तीन पदांसाठी हटके भरती! ‘या’ वयातील उमेदवारांनाच करता येणार अर्ज
4

AAI मध्ये तीन पदांसाठी हटके भरती! ‘या’ वयातील उमेदवारांनाच करता येणार अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.