फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Bharat Gayan Samaj Pune: पं. भास्करबुवा बखले यांनी संगीताच्या प्रसारासाठी आणि संगीतोत्सुकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी १ सप्टेंबर १९११ रोजी पुण्यात ‘भारत गायन समाज’ या प्रतिष्ठित संगीत संस्थेची स्थापना केली. उस्ताद अल्लादिया खां, मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्व यांच्यासारख्या महान संगीतकारांचे सहकार्य लाभलेल्या या संस्थेने महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली. संगीताचे शिक्षण देण्यासोबतच या संस्थेने अनेक गुणवंत कलाकारांना घडवले आणि पुण्यात एक समृद्ध सांस्कृतिक वातावरण निर्माण केले. संगीत कलेच्या संवर्धनासाठी अविरत झटणाऱ्या या संस्थेने संगीत क्षेत्राला अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. आज ‘भारत गायन समाज’ हा महाराष्ट्राचा एक अमूल्य सांस्कृतिक वारसा मानला जातो.






