
Din Vishesh
आज बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा ६१ वा वाढदिवस आहे. १९८८ मध्ये कयामत से कयामत तक या चित्रपटाद्वारे पदार्पण करणाऱ्या अभिनेता आमीर खानला आज चित्रपटसृष्टीत ३८ वर्षे झाली. आपल्या कारकिर्दीत आमीरने २२ हून अधिक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. रोमँटिक नायकाची भूमिका असो वा सामाजिक विषयांवर आधारित भूमिका प्रत्येक पात्रात त्याने एकरुप होऊन काम केले आहे. म्हणूनच आज आमीर खान चित्रपटसृष्टीतील एक विश्वासनीय आणि उत्कृष्ट कलाकार मानले जातात.
14 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1931 : पहिला भारतीय बोलपट ‘आलम आरा’ मुंबईत प्रदर्शित झाला.
1954 : दिल्लीत साहित्य अकादमीची स्थापना झाली.
1967 : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमीत हलविण्यात आले.
1988 : पाई डे प्रथम गणित उत्साहींनी साजरा केला. 1988 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी पाय डेची संकल्पना मांडली होती. (π= 3.14) ही पायची किंमत दिनांक १४/३ प्रमाणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
1998 : सोनिया गांधी राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्ष बनल्या.
2000 : कलकत्ता येथील टेक्निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
2001 : सिक्कीममधील आदिवासी समुदायातील चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
2010 : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला
14 मार्च रोजी जन्म दिनविशेष
1874 : ‘आंतोन फिलिप्स’ – फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 7 ऑक्टोबर 1951)
1879 : ‘अल्बर्ट आईनस्टाईन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 18 एप्रिल 1955)
1899 : ‘के. सी. इर्विंग इर्विंग’ – ओईल कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 13 डिसेंबर 1992)
1908 : ‘फिलिप व्हिन्सेंट’ – व्हिन्सेंट मोटारसायकल कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 मार्च 1979)
1931 : ‘प्रभाकर पणशीकर’ – ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म. (मृत्यू: 13 जानेवारी 2011)
1933 : ‘मायकेल केन’ – ब्रिटिश अभिनेता यांचा जन्म.
1961 : ‘माईक लाझारीडीस’ – ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक यांचा जन्म.
1963 : ‘ब्रूस रीड’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
1965 : अमीर खान – सुप्रसिद्ध अभिनेता यांचा जन्म.
1974 : ‘साधना सरगम’ – पार्श्वागायिका यांचा जन्म.
1972 : ‘इरोम चानू शर्मिला’ – भारतीय कवी यांचा जन्म.
1973 : ‘रोहित शेट्टी’ – भारतीय दिग्दर्शक आणि छायाकार यांचा जन्म.
14 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष
1883 : ‘कार्ल मार्क्स’ – जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते यांचे निधन. (जन्म: 5 मे 1818)
1932 : ‘जॉर्ज इस्टमन’ – अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 जुलै 1854)
1963 : ‘जयनारायण व्यास’ – भारताचे प्रमुख स्वतंत्रता सेनानी, राजस्थानचे पूर्व मुख्यमंत्री आणि ‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस’ चे प्रसिद्ध नेता यांचे निधन.
1998 : ‘दादा कोंडके’ – अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 8 ऑगस्ट 1932)
2003 : ‘सुरेश भट’ – कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार यांचे निधन. (जन्म: 15 एप्रिल 1932)
2010 : ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन. (जन्म: 23 ऑगस्ट 1918)
2018 : इंग्रजी सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, विश्वशास्त्रज्ञ आणि लेखक जे सिद्धांत कॉस्मोलॉजी सेंटर फॉर रिसर्चचे डायरेक्टर होते.स्टीफन हॉकिंग यांचे निधन. (जन्म: 8 जानेवारी 1942)
2022 : स्टीफन अर्ल विल्हाइट – अमेरिकन संगणक शास्र्यज्ञ व GIF फोटो फॉरमेटचे निर्माते (जन्म 3 मार्च 1948)
आखाती देशातील युद्धाने मोडले शेअर बाजारचे कंबरडे! गुंतवणूकदारांची धाकधूक कायम