cm devendra fadnavis dcm ajit pawar birthday on same day 22 july maharashtra politics
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमी चर्चेत असणाऱ्या दोन नेत्यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस आहे. कामाची पद्धत आणि राजकीय विचारधारा पूर्णपणे वेगळी असताना देखील आज हे नेते हातात हात घालून सत्तेमध्ये एकत्र राहिले आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस आहे. देशासह राज्यभरातून दोन्ही नेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारण दोन्ही नेते हे हुकम्मी एक्का आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांची कामाची पद्धत अतिशय वेगळी आहे. अजित पवार हे त्यांच्या गावरान अन् ठसकेबाज पद्धतीचे आणि धडाकेबाज बोलणं यासाठी ओळखले जातात. पहाटेपासून दिवसाला सुरुवात करणाऱ्या अजित पवार यांचा कामाजा धडाका वाखाण्याजोगा आहे. अजित पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तगडा लोकपरिचय आणि संवाद दिसून येतो. रसातळातील आणि खेड्यागाव्यातील लोकालोकांमधील असणारी अजित पवार यांची लोकप्रियता ही त्यांच्या कामाची एकप्रकारे पोचपावती आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या संयमी राजकारणासाठी ओळखले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू मिळालेले फडणवीस यांची विदर्भामध्ये मोठी पकड आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मुद्देसूद मांडणी आणि अभ्यासपूर्ण वक्तव्य यामुळे राजकारणामध्ये त्यांची वेगळी ओळख आजही टिकून आहे. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे असे नेते आहे ज्यांच्या एका चालीने राजकारणाची बाजू पलटते. शहरी भागामध्ये घडलेले देवेंद्र फडणवीस हे नवीन युगाला महाराष्ट्रासोबत जोडण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणामध्ये, बोलण्याच्या शैलीमध्ये आणि विचारधारेमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये एका गोष्टीचे साम्य आहे ते म्हणजे हजरजबाबीपणा आणि वक्तशीरपणा. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर पद्धतीने काम करणारे नेते आहेत. पहाटेच्या वेळी देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामाला लावणाऱ्या या दोन्ही नेत्यांचे राजकारण हे नेहमीच चर्चेत ठरले आहे.
पहाटेचा शपथविधी अन् चर्चा
सध्या राज्यामध्ये महायुतीचे सरकार असले तरी देखील यापूर्वी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी आगळी युती 2019 च्या निवडणुकीनंतर साधण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी शिवसेना व भाजपमध्ये सत्तेची चर्चा निष्फळ ठरत असल्यामुळे अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले होते. पहाटेच्या सुमारास झालेला हा शपथविधी राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरला जातो. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी पुन्हा येईल अशी देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या घोषणेवरुन त्यांच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. मात्र आपला संयमीपणा कायम ठेवत देवेंद्र फडणवीस यांना दोन मोठे पक्ष फोडण्यामध्ये यश आले आहे. कधीही काकांची साथ सोडणार नाही असे वाटणाऱ्या अजित पवारांचे मन वळवण्यात देखील देवेंद्र फडणवीसांना यश आले. एकाच दिवशी जन्मलेले हे दोन्ही नेते एकत्र हातात हात घालून राजकारण करताना दिसून येत आहेत.