Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय पार्श्वभूमी ते यशस्वी अभिनेता..! रितेश देशमुखचा वाढदिवस; जाणून घ्या 17 डिसेंबरचा इतिहास

प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये घर करणारा अभिनेता रितेशचा आज वाढदिवस. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कॉमेडी भूमिका साकारणाऱ्या रितेशने 2014 साली मराठी चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 17, 2025 | 11:07 AM
Comedy actor Riteish Deshmukh's birthday is on December 17th marathi dinvisesh

Comedy actor Riteish Deshmukh's birthday is on December 17th marathi dinvisesh

Follow Us
Close
Follow Us:

राजकीय घराणेशाहीचा वारसा असलेल्या देशमुख कुटुंबातून असलेल्या व्यक्तीने बॉलीवुडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये घर करणारा अभिनेता रितेशचा आज वाढदिवस. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कॉमेडी भूमिका साकारणाऱ्या रितेशने 2014 साली मराठी चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला. ‘लय भारी’, ‘माऊली’, ‘वेड’ सारख्या मराठी चित्रपटातून त्याने मराठी प्रेक्षकांची मने जिंकली. आता तो मराठी बिग बॉसचे सूत्रसंचालन देखील करतो. मराठी बाणा जपणाऱ्या अभिनेता रितेश देशमुखवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

17 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1718 : ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध घोषित केले.
  • 1777 : फ्रान्सने औपचारिकपणे अमेरिका या देशाला मान्यता दिली.
  • 1927 : हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेंद्र नाथ लाहिरी यांना ब्रिटीश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधी गोंडा तुरुंगात फाशी दिली.
  • 1928 : पोलिसांच्या हातून लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली, त्यानंतर तिघांना 1931 मध्ये फाशी देण्यात आली.
  • 1941 : दुसरे महायुद्ध – उत्तर बोर्नियोमध्ये जपानी सैन्याचे आगमन.
  • 1970 : जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे 13 वे सरन्यायाधीश म्हणुन पदभार स्वीकारला.
  • 2014 : युनायटेड स्टेट्स आणि क्युबा यांनी राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित केले.
  • 2016 : शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • 2016 : लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची लष्कर प्रमुख आणि एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांची हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • 2016 : आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
  • 2016 : विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडेच जिकून ठेवले
हे देखील वाचा : निवडणूक जाहीर झाली पण ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

17 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1778 : ‘सर हंफ्रे डेव्ही’ – विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 29 मे 1829)
  • 1849 : ‘लालमोहन घोष’ – देशभक्त, काँग्रेसचे 16 वे अध्यक्ष यांचा कलकत्ता येथे जन्म. (मृत्यू : 18 ऑक्टोबर 1909)
  • 1900 : ‘मेरी कार्टराइट’ – इंग्लिश गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 3 एप्रिल 1998)
  • 1901 : ‘यशवंत गोपाळ जोशी’ – मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 1963)
  • 1905 : ‘मुहम्मद हिदायतुल्लाह’ – भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 18 सप्टेंबर 1992)
  • 1911 : ‘डी. डी. रेगे’ – चित्रकार व लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 2 सप्टेंबर 1999)
  • 1947 : ‘दीपक हळदणकर’ – दिग्दर्शक व चलचित्रकार यांचा जन्म.
  • 1972 : ‘जॉन अब्राहम’ – अभिनेते यांचा जन्म.
  • 1978 : ‘रितेश देशमुख’ – अभिनेते यांचा जन्म.
हे देखील वाचा : जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो पेंशनर्स डे ; जाणून घ्या याचे महत्त्व

17 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1740 : ‘सेनापती चिमाजी अप्पा’ – पेशवाईतील पराक्रमी यांचे निधन.
  • 1907 : ‘लॉर्ड केल्व्हिन’ – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ यांचे निधन. (जन्म : 26 जून 1824)
  • 1933 : ‘थुब्तेन ग्यात्सो’ – 13 वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म : 12 फेब्रुवारी 1876)
  • 1938 : ‘चारुचंद्र बंदोपाध्याय’ – बंगाली कथालेखक व कादंबरीकार यांचे निधन. (जन्म : 11 ऑक्टोबर 1876 – चांचल, माल्डा, बांगला देश)
  • 1956 : ‘पं. शंकरराव व्यास’ – गायक व संगीतशिक्षक यांचे निधन. (जन्म : 23 जानेवारी 1898)
  • 1959 : ‘डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या’ – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1880)
  • 1965 : ‘जनरल कोडेन्डेरा सुबय्या थिमय्या’ – भारतीय भूदलाचे 6 वे सरसेनापती यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1906)
  • 1985 : ‘मधुसूदन कालेलकर’ – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार यांचे निधन. (जन्म : 22 मार्च 1924)
  • 2000 : ‘जाल पारडीवाला’ – अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक यांचे निधन.
  • 2001 : ‘देवदत्त दाभोळकर’ – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन. (जन्म : 23 सप्टेंबर 1919)

Web Title: Comedy actor riteish deshmukhs birthday is on december 17th marathi dinvisesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

National Pensioners Day 2025: जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो पेंशनर्स डे ; जाणून घ्या याचे महत्त्व 
1

National Pensioners Day 2025: जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो पेंशनर्स डे ; जाणून घ्या याचे महत्त्व 

प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेने घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 16 डिसेंबरचा इतिहास
2

प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेने घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 16 डिसेंबरचा इतिहास

Sardar Vallabhbhai Patel : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 15 डिसेंबरचा इतिहास
3

Sardar Vallabhbhai Patel : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 15 डिसेंबरचा इतिहास

विख्यात मराठी कवी व पटकथा लेखक ग. दि. माडगूळकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १४ डिसेंबरचा इतिहास
4

विख्यात मराठी कवी व पटकथा लेखक ग. दि. माडगूळकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १४ डिसेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.