Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Assam Assembly Elections 2026मध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक; काँग्रेसच्या या बड्या नेत्याचा BJP मध्ये प्रवेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला आणि आज भाजपमध्ये प्रवेश केला. बोरदोलोई यांचा राजीनामा काँग्रेससाठी एक मोठा धक्का मानला जात आहे

  • By प्रीति माने
Updated On: Mar 18, 2026 | 05:53 PM
Congress Leader and MP Pradyut Bordoloi Joins BJP Ahead of 2026 Assam Assembly Elections

Congress Leader and MP Pradyut Bordoloi Joins BJP Ahead of 2026 Assam Assembly Elections

Follow Us
Follow Us:

देशांतील पाच महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या निवडणूका या भाजपसाठी आव्हानत्मक ठरणार आहेत. या राज्यांवर राज्य करण्यासाठी भाजप साम-दाम-दंड-भेद करण्यास तयार आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये राजकीय स्थित्यंतरे सुरू झाली आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला आणि आज भाजपमध्ये प्रवेश केला. बोरदोलोई यांचा राजीनामा काँग्रेससाठी एक मोठा धक्का मानला जात आहे आणि भाजपसाठी मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.

भारतीय जनता पक्षात सामील झाल्यावर बोरदोलोई म्हणाले की, त्यांना काँग्रेसमध्ये घुसमटल्यासारखे वाटत होते आणि त्यांनी पक्षावर आपला अपमान केल्याचा आरोपही केला. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि केंद्रीय राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हे देखील वाचा: इराण-इस्रायल युद्धाच्या छायेतून ‘जग लाडकी’ सुखरूप मुंद्रा बंदरात; 80,886 टन कच्चे तेल भारतात दाखल

प्रद्युत बोरदोलोई यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

भाजपमध्ये सामील झाल्यानंतर लगेचच, प्रद्युत बोरदोलोई यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण स्पष्टपण सांगितले. ते म्हणाले की, काँग्रेसमधील असमाधान आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या कामाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन, यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. नवी दिल्लीत भाजपमध्ये औपचारिकपणे सामील झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सरमा यांची कार्यशैली त्यांना प्रभावित केले, ज्यामुळे त्यांनी हे महत्त्वाचे राजकीय पाऊल उचलले आहे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा काय म्हणाले?

पत्रकारांशी बोलताना, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बोरदोलोई यांच्या पक्षांतराला एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हटले आणि हे काँग्रेस नेत्यांच्या पक्षांतराच्या व्यापक प्रवृत्तीचे द्योतक असल्याचे सांगितले. विरोधी पक्षावर निशाणा साधत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “मी प्रद्युत बोरदोलोई यांचे भाजपमध्ये मनापासून स्वागत करतो. आज काँग्रेसमध्ये स्वाभिमानी लोकांना स्थान नाही.” येत्या काही महिन्यांत काँग्रेसचे आणखी ज्येष्ठ नेते भाजपमध्ये सामील होतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला.

हे सुद्धा वाचा : Bihar New CM: बिहारच्या राजकारणात सत्तांतराचे वारे: नितीश कुमारांनी दिले भावी मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुख्यमंत्री सरमा यांचा महत्त्वपूर्ण दावा 

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, पुढील दोन वर्षांत देबब्रता सैकिया आणि रिपून बोरा यांच्यासारखे नेतेही भाजपमध्ये सामील होतील. “आसाम काँग्रेसमधील अनेक सक्षम नेते आमच्यात सामील होतील.” ते पुढे म्हणाले की, काँग्रेस नेत्यांच्या भाजपमध्ये सामील होण्याची प्रक्रिया २०१६ पासून सुरू असून, तिला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Congress leader and mp pradyut bordoloi joins bjp ahead of 2026 assam assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • Assam
  • Assam News
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.