Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Dahi Handi 2026: भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण म्हणून साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे स्वरूप काळानुसार बदलताना दिसत आहे. मानवी मनोरे, लाखोंची बक्षिसे, सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीबरोबरच चौकाचौकातील मोठमोठ्या बॅनरमुळे दहीहंडी आता स्पर्धा आणि राजकीय शक्तिप्रदर्शनाचे माध्यम बनत आहे का?

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 05, 2026 | 03:29 PM
गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Follow Us
Follow Us:

सण-उत्सव की बॅनरबाजी?
दहीहंडी कृष्णाची, पण चौकाचौकात फोटो राजकारण्यांचे!
श्रीकृष्णापेक्षा नेत्यांच्या बॅनरचीच अधिक चर्चा

Dahi Handi 2026: ‘गोविंदा आला रे आला…’च्या गजरात राज्यभर दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ठिकठिकाणी गोविंदा पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, काळाच्या ओघात या पारंपरिक उत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे. ‘दहीहंडी हा धार्मिक-सांस्कृतिक उत्सव आहे, स्पर्धा आहे की राजकीय प्रसिद्धीचे व्यासपीठ?’ असा प्रश्न देखील उपस्थित राहिला आहे.

दहीहंडीची परंपरा भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांशी जोडलेली आहे. पौराणिक कथांनुसार बालकृष्णाला दही आणि लोणी अतिशय आवडत असे. कृष्ण आणि त्याचे सवंगडी गोकुळातील घरांमध्ये जाऊन लोणी-दही चोरून खात असल्याने कृष्णाला ‘माखनचोर’ असेही संबोधले जाते.

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

कृष्णाच्या या खोड्यांपासून लोणी वाचवण्यासाठी गवळणी दही आणि लोण्याची मडकी उंच ठिकाणी बांधून ठेवत असत. मात्र कृष्णाने आपल्या सवंगड्यांच्या मदतीने मानवी मनोरे उभारून उंचावर बांधलेल्या मडक्यापर्यंत पोहोचण्याची युक्ती शोधली. याच बाललीलेची आठवण म्हणून पुढे दहीहंडीची परंपरा रूढ झाल्याचे मानले जाते.

परंपरा पडली मागे अन् जीवघेणी स्पर्धा

पूर्वी स्थानिक पातळीवर साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीला आता मोठ्या स्पर्धेचे स्वरूप आले आहे. गोविंदा पथकांकडून अधिकाधिक थर रचण्याची चढाओढ पाहायला मिळते. काही मोठ्या दहीहंडी उत्सवांमध्ये आकर्षक बक्षिसे, भव्य व्यासपीठे, संगीत आणि सेलिब्रिटींची उपस्थिती यामुळे उत्सवाचे स्वरूप अधिक ग्लॅमरस झाले आहे.ही स्पर्धा आता जीवघेणी ठरत आहे, असं म्हणायला वावग ठरणार नाही.

गोविंदा पथकांसाठीही दहीहंडी हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. कोणत्या पथकाने सर्वाधिक थर रचले, कोणत्या मंडळाने मोठी हंडी आयोजित केली आणि कुठे मोठे बक्षीस ठेवण्यात आले, याची उत्सुकता दिसून येते.

उत्सव कृष्णाचा, बॅनरवर मात्र नेते?

या सगळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे राजकीय बॅनरबाजी. दहीहंडीच्या काही दिवस आधीपासूनच शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि कार्यक्रमस्थळांच्या परिसरात राजकीय नेते, पदाधिकारी आणि इच्छुकांचे मोठमोठे बॅनर आणि होर्डिंग्ज झळकू लागतात.

दहीहंडीचा संबंध भगवान श्रीकृष्णाशी असला तरी काही फलकांवर श्रीकृष्णाचे चित्र तुलनेने लहान आणि आयोजक अथवा राजकीय नेत्यांची छायाचित्रे अधिक ठळक दिसतात. त्यामुळे ‘उत्सव कृष्णाचा की राजकीय नेत्यांचा?’ अशी चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे.

दहीहंडी राजकीय शक्तिप्रदर्शनाचे व्यासपीठ?

दहीहंडी उत्सवाला अनेक राजकीय नेते हजेरी लावतात. मोठ्या मंडळांकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये नेत्यांचे स्वागत, सत्कार आणि भाषणेही पाहायला मिळतात. त्यामुळे सांस्कृतिक उत्सवासोबत राजकीय उपस्थिती आणि जनसंपर्कालाही महत्त्व प्राप्त झाले आहे.

विशेषतः स्थानिक राजकारणात दहीहंडीच्या माध्यमातून युवकांशी संपर्क साधणे, मंडळांशी संबंध मजबूत करणे आणि परिसरात आपली राजकीय उपस्थिती अधोरेखित करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा असते. त्यामुळे दहीहंडी ही केवळ धार्मिक-सांस्कृतिक परंपरा न राहता सामाजिक आणि राजकीय शक्तिप्रदर्शनाचे व्यासपीठ बनत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

स्पर्धा वाढली; मूळ परंपरा मागे पडतेय?

भव्य आयोजन, मोठी बक्षिसे, सेलिब्रिटी, डीजे आणि राजकीय बॅनरच्या गर्दीत दहीहंडीमागील श्रीकृष्णाच्या बाललीलेचा मूळ संदर्भ कुठेतरी मागे पडत आहे, अशी भावना व्यक्त केली जाते.

उत्सव आधुनिक पद्धतीने साजरा करण्यात गैर काहीच नाही; मात्र त्यामागील सांस्कृतिक परंपरा आणि मूळ उद्देशही जपला जाणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडीच्या जल्लोषात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो—सण-उत्सव, स्पर्धा की बॅनरबाजी? दहीहंडी कृष्णाची, मग फलकांवर सर्वाधिक जागा कुणाची? असा सवाल उपस्थित राहत आहे.

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती

Web Title: Dahi handi 2026 festival political banner competition lord krishna photos maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Dahi Handi
  • Maharashtra Politics
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
1

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध
2

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा
3

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
4

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.