Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Maharashtra Breaking News Today 2026: आज ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा द्विगुणित उत्साह राज्यभरात पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे नेपाळ-चीन सीमेवरील हिमकडा कोसळल्याने आलेल्या प्रलयंकारी महापुरात मृतांचा आकडा १,३०० च्या जवळ पोहोचला असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 05, 2026 | 05:57 PM
Maharashtra Breaking News Today 23.10.2026

Maharashtra Breaking News Today 23.10.2026

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News: 

आज ५ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.  राज्यभरात आज शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह असून दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र गोविंदा पथकांची तयारी पूर्ण झाली आहे.

जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट/शरद पवार गट) ११ नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालध झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील १७ राज्यांमध्ये ५० ते ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा सतर्कतेचा इशारा (Alert) दिला आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी सामन्याच्या पार्श्वभूमीवर हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि रणनीतीची क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

The liveblog has ended.
  • 05 Sep 2026 05:59 PM (IST)

    05 Sep 2026 05:59 PM (IST)

    Neeraj Chorpa बाहेर अन् अचानक Asian Games 2026 मध्ये ‘या’ खेळाडूची एन्ट्री

    आशियाई क्रीडा २०२६ (Asian Games 2026 ) स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यावेळी भारताच्या प्रमुख पदक दावेदारांपैकी एक असलेला स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा, आपल्या विजेतेपदाचा डिफेन्ड करण्यासाठी मैदानात उतरणार नाही. नीरज चोप्रा दुखापतीमुळे २०२६ च्या हंगामातील उर्वरित सर्व स्पर्धांमधून बाहेर पडला आहे. त्याने सोशल मीडियावर ही घोषणा केली होती. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने त्याच्या जागी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता भालाफेकपटू यशवीर सिंग याची निवड केली आहे.

  • 05 Sep 2026 05:50 PM (IST)

    05 Sep 2026 05:50 PM (IST)

    पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त

    पुणे शहरात कलम 144 लागू करण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि पुणे पोलिसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन, MPSC पेपरफुटी प्रकरण, पोलीस आयुक्तांची भूमिका, राजकीय नेत्यांच्या मृत्यूंबाबत उपस्थित करण्यात येणाऱ्या शंका आणि दिशा सालियन प्रकरणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

  • 05 Sep 2026 05:40 PM (IST)

    05 Sep 2026 05:40 PM (IST)

    Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

    महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि आक्रमक भारतीय प्रशासकीय तुकारम मुंढेना पाहील जातं. कडक प्रशासकीय कार्यशैलीमुळे सातत्याने चर्चेत राहणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे आता सोशल मीडियावरही मोठी लोकप्रियता मिळवत असल्याचे दिसत आहे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, रेस्टॉरंटमधील स्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील FDAच्या कारवायांमुळे तुकाराम मुंडे यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 05 Sep 2026 05:30 PM (IST)

    05 Sep 2026 05:30 PM (IST)

    पेपरफुटीमुळे MPSC ला दणका! औषध निरीक्षक परीक्षा रद्द, तर कृषी सेवेच्या गुणदानावर विद्यार्थ्यांचे गंभीर आक्षेप

    हाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आयोगाने २२ मार्च २०२६ रोजी घेतलेली औषध निरीक्षक (गट-ब) पदाची संपूर्ण भरती परीक्षा पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे रद्द केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात प्रश्नपत्रिका आधीच काही उमेदवारांपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले असून, यात आयोगातील काही वरिष्ठ अधिकारी सामील असल्याचे उघड झाल्याने मोठा गदारोळ झाला आहे.

  • 05 Sep 2026 05:20 PM (IST)

    05 Sep 2026 05:20 PM (IST)

    दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

    मुंबईत उत्साहात सुरू असलेल्या दहीहंडी उत्सवाला मालाड पश्चिममध्ये एका दुर्दैवी घटनेने गालबोट लागले आहे. मालवणी परिसरात दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना विटांचा खांब अचानक कोसळल्याने 7 वर्षीय रुद्र कदम याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

  • 05 Sep 2026 05:10 PM (IST)

    05 Sep 2026 05:10 PM (IST)

    शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

    राज्याच्या शालेय शिक्षण विभागातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णय प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. शिंदे सेनेकडे असलेल्या शालेय शिक्षण विभागाचे मंत्री दादा भुसे यांच्याकडे असलेले अधिकार कमी करण्यात आले असून ते थेट विभागाचे सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे सोपव्यात आले आहेत. दादा भुसेंकडे असलेले अधिकार कमी करण्यात आल्यामुळे हा शिंदे गटाला धक्का मानला जात आहे.

  • 05 Sep 2026 03:59 PM (IST)

    05 Sep 2026 03:59 PM (IST)

    Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

    Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ‘DDRCs’ आणि ‘CRCs’ संशोधन प्रकल्पांतर्गत रिसर्च असोसिएट आणि फिल्ड इन्व्हेस्टिगेटर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०२६ आहे.

  • 05 Sep 2026 03:55 PM (IST)

    05 Sep 2026 03:55 PM (IST)

    Sugar Price Mystery : दर कोसळले, 67 ची साखर 50 वर… तरीही सर्वसामान्यांना महागच खरेदी का करावी लागतेय? हा आहे बाजारातील खरा खेळ

    Sugar Price Mystery : सणासुदीच्या काळात महागाईने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. लोकं साखरेच्या दरात घट होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरात घट झाली असल्याच्या बातमी तर येत आहेत पण ही घट केवळ २ ते ३ रुपयांचीच झाली आहे. मग एवढी मोठी आकडेवारीतील घट सामान्यांच्या खिशांना का मिळत नाहीये? काय आहे नेमकं गणित? ( Sugar Price Mystery ) 

  • 05 Sep 2026 03:50 PM (IST)

    05 Sep 2026 03:50 PM (IST)

    Ratnagiri News: कातळशिल्प संवर्धन आणि पर्यटनाला वेग! रत्नागिरीसाठी १४ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा

    रत्नागिरी/Uday Samant: रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी कातळशिल्प संवर्धन व विकासासाठी १४ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीचा निधी पूर्णपणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीच वापरला गेला पाहिजे.

  • 05 Sep 2026 03:45 PM (IST)

    05 Sep 2026 03:45 PM (IST)

    Nagpur News : भाजप नेत्यांची हायव्होल्टेज दंगल ; डीजेवरून रंगला कलगीतुरा

    नागरिकांना सर्वाधिक त्रासदायक ठरणाऱ्या तसेच मोठ्या प्रमाणात व्हायब्रेशन आणि ध्वनी प्रदूषण निर्माण करणाऱ्या बेस साऊंडवर निर्बंध कायम ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, टॉप आणि मिडल साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी राहणार नाही, असे आश्वासन नागपूर पोलिस आयुक्तांनी दिल्याचे भाजपने म्हटले आहे.

  • 05 Sep 2026 03:25 PM (IST)

    05 Sep 2026 03:25 PM (IST)

    Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

    Mumbai Dahi Handi 2026: राज्यभर दहीहंडीचा जल्लोष सुरू असताना मुंबईतही विविध ठिकाणी मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र या उत्सवादरम्यान (Mumbai Dahi Handi 2026) काही ठिकाणी मानवी मनोरे कोसळल्याने गोविंदांना दुखापती झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

  • 05 Sep 2026 03:15 PM (IST)

    05 Sep 2026 03:15 PM (IST)

    आजवर कुणालाच जमलं नाही ते Harmanpreet Kaur करणार! IND vs PAK सामन्यात रचणार ऐतिहासिक विश्वविक्रम; अशी कामगिरी करणारी पहिली कर्णधार

    महिला आशिया कप २०२६ ( Womens Asia Cup 2026) मध्ये आज, ५ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील. हा सामना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी अत्यंत खास असेल. पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच, हरमनप्रीत एक अशी मोठी कामगिरी करेल, जी पुरुष आणि महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इतर कोणत्याही खेळाडूने केलेली नाही.

  • 05 Sep 2026 03:01 PM (IST)

    05 Sep 2026 03:01 PM (IST)

    Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

    पंजाबमध्ये गायक बलजीत सिंग यांच्या मृत्यूची चर्चा सुरू असतानाच मेक्सिकोमधून एक अतिशय भयंकर बातमी आली आहे. मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये एका प्रसिद्ध संगीतकाराच्या पूर्ण कुटुंबाला गोळ्या घालून मारण्यात आलं आहे.

  • 05 Sep 2026 02:59 PM (IST)

    05 Sep 2026 02:59 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर अवैध दारू अड्यावर पोलिसांची कारवाई

    छत्रपती संभाजीनगर शहरातील अवैध दारू अड्डयांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. टीव्ही सेंटर परिसरातील प्यासा वाईन शॉपच्या खाली सुरू असलेल्या अवैध दारू अड्यावर सिडको पोलिसांनी छापा टाकत अड्डा उद्ध्वस्त केला.

  • 05 Sep 2026 02:50 PM (IST)

    05 Sep 2026 02:50 PM (IST)

    विद्यानंद बापट यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या खात्यांवरून विविध पोस्ट आणि मजकूर प्रसारित केला जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, बापट यांनी स्वतः या प्रकाराचा खुलासा करत त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेली सोशल मीडिया खाती बनावट असल्याचे स्पष्ट केले. "माझ्या नावाने सर्व खाते बनवत आहेत. सध्या एआयचा जमाना आहे, त्यामुळे कोणी काहीही करत आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या नावाने सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या पोस्टबाबत नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे

  • 05 Sep 2026 02:39 PM (IST)

    05 Sep 2026 02:39 PM (IST)

    दहीहंडी उत्सवासाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

    पुण्याच्या जुन्या सांगवीत दहीहंडी उत्सवासाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सलमा सलाउद्दीन पठाण असं मृत महिलेचं नाव असून रात्री विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं. यावेळी अचानक लोखंडी भाग सलमा यांच्या डोक्यावर पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, मृत महिलेचा मुलगा मंडळात असल्याने कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिला आहे. इतर मुलं अडचणीत येऊ नयेत, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली असून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करू नये, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

  • 05 Sep 2026 02:30 PM (IST)

    05 Sep 2026 02:30 PM (IST)

    नियोजन समितीचा १०० टक्के निधी वेळेत खर्च करा : पालकमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश

    रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त होणारा संपूर्ण नियतव्यय १०० टक्के वेळेत खर्च करा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शासकीय नियमांनुसार जिल्ह्यातील १२९ नोंदणीकृत मजूर संस्थांना एकूण कामांपैकी ३३ टक्के कामे वाटप झालीच पाहिजेत. सर्व तालुक्यांमध्ये या नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत पालकमंत्र्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले.

  • 05 Sep 2026 02:21 PM (IST)

    05 Sep 2026 02:21 PM (IST)

    सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद, चार महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक

    सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली असून केवळ चार महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकयन यांनी दिली आहे. त्यांनी जिल्ह्यातील चारा टंचाईच्या संदर्भात बैठक घेतली. यानंतर ही बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, आणि अक्कलकोटमध्ये तीन महिने पुरेल इतका तर अन्य तालुक्यांमध्ये चार महिने पुरेल इतका चारा शिल्लक असल्याचे उघड झाले आहे. यामुळे चारा टंचाई होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकन यांनी केले आहे. तसेच त्यांनी चारा टंचाई रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरू असल्याची माहिती देखील दिली आहे.

  • 05 Sep 2026 02:10 PM (IST)

    05 Sep 2026 02:10 PM (IST)

    हातात गदा घेऊन खासदार सुनील तटकरे यांनी धरला गोविंदाचा फेर

    रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोविंदाचा उत्सवाला प्रारंभ झाला असून पारंपरिक वाद्य असणाऱ्या खालू बाजाच्या तलावावर खासदार सुनील तटकरे यांनी फेर धरून गोविंदा खेळण्याचा आनंद लुटला.

  • 05 Sep 2026 02:00 PM (IST)

    05 Sep 2026 02:00 PM (IST)

    पुण्यात शिक्षकांचे धरणे आंदोलन; संचमान्यतेचा फेरआढावा घेण्याची जोरदार मागणी

    उच्च माध्यमिक स्तरावरील प्रस्तावित अन्यायकारक संचमान्यता धोरणाविरोधात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांच्या वतीने शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन व जोरदार निदर्शने करण्यात आली. शासनाच्या प्रस्तावित संचमान्यता मसुद्याचा यावेळी तीव्र निषेध करून प्रचलित निकषांनुसार संचमान्यता करण्याची मागणी करण्यात आली.

  • 05 Sep 2026 01:55 PM (IST)

    05 Sep 2026 01:55 PM (IST)

    मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेच्या ‘शुद्धीकरण’; भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा

    उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील ८ ऑगस्ट २०२६ रोजी रामलीला मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर झालेल्या कथित शुद्धीकरण विधी झाला होता. या विरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. या शुद्धीकरण विधी प्रकरणी आता कर्नाटकची राजधानी बंगळूर येथील विधान सौध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांचे नाव आहे.

  • 05 Sep 2026 01:50 PM (IST)

    05 Sep 2026 01:50 PM (IST)

    सनी लिओनी बनली ‘शांताबाई’! मराठमोळ्या अंदाजात भन्नाट जलवा

    बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीला तुम्ही आतापर्यंत ग्लॅमरस अंदाजात बघितलं असेल. पण आता ती एकदम वेगळ्या मराठमोळ्या लूकमध्ये आली आहे. लोकांना तिचा हा अंदाज खूप आवडतोय. ‘शांताबाई’ नावाचं तिचं गाणं नुकतंच प्रदर्शित असून त्याची चर्चा सर्वत्र आहे. या गाण्याची छोटी झलक आधीच आली होती, तेव्हापासून लोक पूर्ण गाण्याची वाट बघत होते. फायनली आता पूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून सनी लिओनीने शांताबाईचा एकदम मॉडर्न आणि झक्कास अवतार केला आहे. तिचा डान्स, तिचे एक्सप्रेशन आणि गाण्याचा ठेका सगळंच भन्नाट आहे. Sunny Leone:

  • 05 Sep 2026 01:45 PM (IST)

    05 Sep 2026 01:45 PM (IST)

    गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी?

     राज्यभर आज (5 सप्टेंबर 2026) दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांत गोविंदा पथके मानाच्या आणि बक्षिसांच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. ढोल-ताशांचा गजर आणि गोविंदांच्या उत्साहात यंदा वरुणराजाचीही साथ मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांत रात्रीपासूनच पावसाची रिमझिम सुरू असून, आज काही जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा (Rain Update) अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नाशिक तसेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • 05 Sep 2026 01:40 PM (IST)

    05 Sep 2026 01:40 PM (IST)

    गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये नेमका फरक काय?

    कोणत्याही वळणावर मार्गदर्शन करणाऱ्याचे स्थान नेहमीच सर्वोच्च असते. मग ते वर्गात ब्लॅकबोर्डवर शिकवणारे शिक्षक असोत किंवा आयुष्याच्या चढ-उतारांमध्ये योग्य वाट दाखवणारे गुरु असोत. बऱ्याचदा लोक ‘गुरुपौर्णिमा’ आणि ‘शिक्षक दिन’ एकाच पारड्यात मोजतात. या दोन्हीचा उद्देश गुरुंचे आभार मानणे हाच आहे, असे त्यांना वाटते. पण खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती आणि इतिहासामध्ये या दोन्ही सणांच्या भावात, पार्श्वभूमीत आणि महत्त्वात खूप रंजक फरक आहे.

  • 05 Sep 2026 01:35 PM (IST)

    05 Sep 2026 01:35 PM (IST)

    ‘मला खरंच भांडता येत नाही, म्हणून…’ बिग बॉस मराठीबाबत जान्हवी किल्लेकरचा मोठा खुलासा

    बिग बॉस मराठी सीझन 5 सगळ्यांनाच आठवत असेल. जान्हवी किल्लेकर त्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत होती. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ती चर्चेत होती. तिची भांडणं, तिचा राग, मोठ्या कलाकारांना बोलणं, यामुळेच तो सीझन गाजला. पण आता त्याच जान्हवीने असं काही सांगितलं आहे की ऐकून सगळेच चकित झाले आहेत.नुकत्याच एका मुलाखतीत जान्हवीने सांगितलं की मला तर बिग बॉसमध्ये जायचंच नव्हतं. कारण मला भांडता येत नाही. हे ऐकल्यावर लोकांनी तिला पुन्हा ट्रोल करायला सुरुवात केली आहे. जी बाई घरात सगळ्यांशी भांडली तीच आता म्हणते मला भांडता येत नाही.

  • 05 Sep 2026 01:25 PM (IST)

    05 Sep 2026 01:25 PM (IST)

    काय सांगता…1 शेअरवर 46 Bonus Share फ्री! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा

    आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. या सगळ्यात तेजीच्या वातावरणात शेअर बाजारीत नामांकि कंपनीने आपल्या भागधारकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एका शेअरवर तब्बल 46 बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट देखील निश्चित केली आहे. त्यामुळे या ऑफरचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर झुंबड पाहायला मिळत आहे. बोनस प्रेफर्ड शेअर्ससाठीची रेकॉर्ड डेट जवळ येत असल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी आली आहे. नेमकी कोणती आहे ही कंपनी जिने थेट एवढा मोठा बोनस दिला आहे?

  • 05 Sep 2026 01:18 PM (IST)

    05 Sep 2026 01:18 PM (IST)

    मुंबईत दहीहंडी उत्सवात दुपारी 12 वाजेपर्यंत 22 गोविंदा जखमी

    मुंबईत दहीहंडी उत्सवात दुपारी 12 वाजेपर्यंत 22 गोविंदा जखमी

    एका जखमी गोविंदावर उपचार सुरू

    21 जखमी गोविंदांना मिळाला डिस्चार्ज

    बीएमसी आणि सरकारी रुग्णालयांकडून जखमी गोविंदांची माहिती प्रसिद्ध

  • 05 Sep 2026 01:15 PM (IST)

    05 Sep 2026 01:15 PM (IST)

    शिक्षक दिनी दिल्ली विद्यापीठाला मोठी भेट

    दिल्ली विद्यापीठातील प्रतिष्ठित श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) ला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ५ सप्टेंबर रोजी शताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विशेष प्रसंगी कॉलेजला भेट देतील आणि सोहळ्याला संबोधित करतील. शिक्षक दिनाचे औचित्य साधून होणारा हा कार्यक्रम कॉलेजच्या इतिहासाच्या आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

  • 05 Sep 2026 01:05 PM (IST)

    05 Sep 2026 01:05 PM (IST)

    आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट

    मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर एका नवीन फीचरची चाचणी सुरु आहे. या फीचरमध्ये यूजर्सना थर्ड-पार्टी AI एजेंट्स आणि बॉट्सला थेट मेसेजिंग ॲपसोबत कनेक्ट करण्याची सुविधा मिळू शकते. या फीचरअंतर्गत व्हॉट्सॲपवर जोडण्यात आलेल्या प्रत्येक एजेंटसाठी एक वेगळी चॅट विंडो मिळणार आहे. यामुळे यूजर्स ॲपमधून बाहेर न येता देखील विविध एआय चॅटबोट्ससोबत संवाद साधू शकणार आहेत. हे फीचर सध्या निवडक अँड्रॉईड यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. येत्या काही महिन्यात कंपनी सर्वच यूजर्ससाठी हे फीचर रोलआऊट करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र सर्वांसाठी हे फीचर कधी रोलआऊट केलं जाणार, याची तारीख अद्याप जाहिर करण्यात आली नाही.

  • 05 Sep 2026 01:01 PM (IST)

    05 Sep 2026 01:01 PM (IST)

    दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली

    पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा काढताना त्याचा काही भाग अंगावर पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जुन्या सांगवी परिसरात हळहळ आणि शोक व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी रात्री विघ्नहर्ता मंडळाचा दहीहंडी उत्सव संपल्यानंतर कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू होते.याचवेळी लोखंडी सांगाड्याचा एक भाग अचानक सलमा यांच्या डोक्यावर कोसळला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

  • 05 Sep 2026 12:48 PM (IST)

    05 Sep 2026 12:48 PM (IST)

    बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

    भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून १६ वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ४) पहाटे घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे पाच वाजता तिचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीने देखील अशाच प्रकारे गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती, या घटनेनंतर ही दुसरी आत्महत्या आहे, त्यामुळे बारामती परिसरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 05 Sep 2026 12:36 PM (IST)

    05 Sep 2026 12:36 PM (IST)

    लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

    भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नोटीस टप्पा व दावे-हरकतींचा निपटारा करण्यात येणार असून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

  • 05 Sep 2026 12:24 PM (IST)

    05 Sep 2026 12:24 PM (IST)

    अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली

    अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून कमावलेल्या पैशातून खरेदी केलेली तब्बल ५५ लाख १६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गोठवली आहे. सांगवी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील टोळीप्रमुख आणि त्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या या मालमत्तेवर NDPS Act मधील कलम 68F(1) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात २०२६ मधील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • 05 Sep 2026 12:12 PM (IST)

    05 Sep 2026 12:12 PM (IST)

    आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

    त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काथवडपाडा येथील अवघ्या १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी शाळेच्या गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे हरसूल व बोरीपाडा परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. लावण्या लहुदास भोंडवे (वय १३, रा. काथवडपाडा, पो. देवडोंगरा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

  • 05 Sep 2026 12:00 PM (IST)

    05 Sep 2026 12:00 PM (IST)

    डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक

    तुम्ही आजवर माणसांची बर्थडे पार्टी तर अनेकदा पाहिली असेल पण तुम्ही कधी म्हशीची बर्थडे पार्टी (Buffalo Birthday) पाहिली आहे का? सोशल मिडियावर एक अनोखा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात मालक आपल्या पाळीव म्हशीचा वाढदिवस साजरा करताना दिसला. या बर्थडे पार्टीसाठी मालकाने अनेकांना आमंत्रण देखील दिले होते. मोठ्या थाटामाटात, टाळ्यांच्या गजरात आणि उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला आणि याचा व्हिडिओ तिथे उपस्थित लोकांनी आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करुन घेतला. हेच दृष्य आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. म्हशीचा वाढदिवस पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं तर काहींनी हे मालकाचे म्हशीप्रतीचे प्रेम आहे असं म्हटलं. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

  • 05 Sep 2026 11:50 AM (IST)

    05 Sep 2026 11:50 AM (IST)

    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण किती झाले होते?

    Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस देशाचे महान दार्शनिक, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पाळला जातो. त्यांचे जीवन या गोष्टीचे उत्तम उदाहरण आहे की शिक्षण आणि ज्ञान एखाद्या व्यक्तीला समाजात मान मिळवून देण्यासोबतच देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचवू शकतात. डॉ. राधाकृष्णन १९६२ ते १९६७ या काळात भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. पण, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन नेमके किती शिकलेले होते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला चला तर मग जाणून घेऊया.

  • 05 Sep 2026 11:40 AM (IST)

    05 Sep 2026 11:40 AM (IST)

    कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

    Suraj Chavan and Sanjana: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणच्या घरी जन्माष्टमीच्या दिवशी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सूरज चव्हाण बाबा झाला आहे. सूरज चव्हाण आणि संजना यांच्या घरी लक्ष्मी आली आहे. याचा आनंद आता सर्वत्र व्यक्त केला जात आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @vetal7379 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हॉस्पिटलमधील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सर्वजण आनंदी दिसत आहेत. सूरज, संजना आणि हॉस्पिटलमधील इतर सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे.

  • 05 Sep 2026 11:30 AM (IST)

    05 Sep 2026 11:30 AM (IST)

    बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट

    दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया (Bolivia) देशातून एक अत्यंत भीषण बातमी समोर आली आहे. शुक्रवारी (४ सप्टेंबर) स्थानिक वेळेनुसार दुपारी अंदाजे २:३० वाजता वियाचा (Viacha) शहरातील एका लष्करी तळावरील संकुलात भयंकर स्फोट झाला. प्रशासकीय राजधानी ला पाझ (La Paz) पासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या या तळावर स्फोटक आणि फटाक्यांचा साठा (Fireworks Stockpile) ठेवण्यात आला होता, जिथे हा अपघात घडला. या भीषण घटनेत आतापर्यंत किमान १० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • 05 Sep 2026 11:10 AM (IST)

    05 Sep 2026 11:10 AM (IST)

    सणासुदीतील ‘या’ पदार्थांवर असणार आता FDA ची नजर; तुकाराम मुंढेंकडून कॅलेंडरच जारी

    सध्या सणासुदीचे दिवस येत आहेत. त्यातच राज्यात अन्न भेसळीविरोधातील कारवाई अधिक तीव्र होणार आहे. आयएएस तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सण, जत्रा, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांदरम्यान होणाऱ्या अन्न भेसळीवर देखरेख ठेवण्यासाठी वर्षभराचे ‘उत्सव अंमलबजावणी दिनदर्शिका’ विकसित केली आहे. महाराष्ट्रातील अशा प्रकारची ही पहिलीच दिनदर्शिका आहे.

  • 05 Sep 2026 11:00 AM (IST)

    05 Sep 2026 11:00 AM (IST)

    आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!

    वेगाने होणाऱ्या बॉक्स-ऑफिसची चर्चा आणि आर. माधवनसारखा कलाकार कायम वैविध्यपूर्ण भूमिकामुळे चर्चेत असतो आणि त्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो भारतीय सिनेमातील सर्वाधिक टिकाऊ पॅन-इंडिया पॉवरहाऊसमधील एक उत्तम अभिनेता आहे.

    पॅशन प्रोजेक्ट GDN हा दिग्गज संशोधक जी.डी. नायडू यांच्या जीवनावर आधारित हृदयस्पर्शी चरित्रात्मक चित्रपट असून तो सध्या थिएटरमध्ये चौथ्या आठवड्यातही दमदार कामगिरी करत आहे. 7 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या माधवनच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतलं असून इंडस्ट्रीत सातत्यपूर्ण काम करणारा अभिनेता देखील आहे.

  • 05 Sep 2026 10:55 AM (IST)

    05 Sep 2026 10:55 AM (IST)

    आठ महिन्यांनंतर इस्रोची मोठी झेप! ‘नॉटी बॉय’चे दमदार कमबॅक

    भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएसएलव्ही-एफ१७रॉकेटद्वारे अत्याधुनिक ईओएस ०५ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून पुन्हा एकदा अवकाशात आपला झेंडा रोवला आहे. तब्बल ८ महिन्यांच्या दीर्घ विरामानंतर, इस्रोच्या या ऐतिहासिक पुनरागमन मोहिमेत २,३६७ किलोग्राम वजनाचा उपग्रह पहाटे २:५५ वाजता दुसऱ्या प्रक्षेपण तळावरून अवकाशात झेपावला. ‘नॉटी बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीएसएलव्ही रॉकेटच्या या १९व्या उड्डाणामुळे भारत आता अवकाशातून शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास, तसेच नैसर्गिक आपत्तींवर अचूकपणे लक्ष ठेवण्यास पूर्णपणे सक्षम झाला आहे.

  • 05 Sep 2026 10:45 AM (IST)

    05 Sep 2026 10:45 AM (IST)

    आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती; जाणून घ्या ५ सप्टेंबरचा इतिहास..

    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. ते एक महान तत्त्वज्ञ, व्यासंगी लेखक आणि देशातील एक आदराचे स्थान असलेले थोर शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म आज म्हणजेच ५ सप्टेंबर १८८८ रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांनी आपल्या जीवनकाळात भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार जागतिक पातळीवर केला. शिक्षणाप्रती असलेले त्यांचे अफाट प्रेम आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस देशात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९५४ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान असलेल्या ‘भारतरत्न’ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

  • 05 Sep 2026 10:35 AM (IST)

    05 Sep 2026 10:35 AM (IST)

    संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

    ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाचा यंदा २१वा वर्ष मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘संकल्प दहीहंडी उत्सव, संकल्प नव्या उंचीचा!’ या ब्रीदवाक्यानुसार आयोजित या महोत्सवात विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी तब्बल २१ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

  • 05 Sep 2026 10:25 AM (IST)

    05 Sep 2026 10:25 AM (IST)

    अरेरे, नंबर चुकला अन् रिचार्जचा खेळ बिघडला! पैसे परत मिळणार कसे? Jio, Airtel, Vi यूजर्ससाठी लागू आहेत ‘हे’ नियम

    रिचार्जशिवाय मोबाईल म्हणजेच चहाशिवाय बिस्कीट! मोबाईल हातात आहे पण कॉल नाही, इंटरनेट नाही, फक्त पाहत बसायचं! मोबाईलमध्ये रिचार्ज नाही म्हणजेच इंटरनेट नाही, आऊटगोईंग कॉल किंवा मेसेज नाही. याच सर्व कारणांमुळे आपल्या फोनमध्ये रिचार्ज असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा असं होतं की, आपला रिचार्ज संपतो आणि आपण घाईघाईत रिचार्ज करून आपल्या कामासाठी निघतो. पण नंतर आपल्या लक्षात येते की, आपण चुकीच्या नंबरवर रिचार्ज केला आहे.

  • 05 Sep 2026 10:15 AM (IST)

    05 Sep 2026 10:15 AM (IST)

    शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचा अतिरिक्त भार होणार आता कमी; शिक्षण विभागाकडून कडक सूचना जारी

    विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तके, वह्या आणि दिवसासाठी आवश्यक असलेले इतर अभ्यासाचे साहित्य आणावे, ज्यामुळे त्यांच्या दप्तरांचे वजन त्यांच्या शरीराच्या वजनाच्या १०% पर्यंत कमी होईल, असे निर्देश शिक्षण आयुक्तांनी सर्व शासकीय आणि खासगी शाळांना दिले आहेत. शाळांनी आपल्या वर्गांचे वेळापत्रक अशाप्रकारे करण्यावर आयुक्तांनी भर दिला. हा निर्देश शालेय दप्तरांचे वजन कमी करण्यासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ देतो.

  • 05 Sep 2026 10:05 AM (IST)

    05 Sep 2026 10:05 AM (IST)

    सोनं पुन्हा महागलं, चांदी झाली स्वस्त; मुंबईसह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या

    भारतात 5 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,667 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,361 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,750 रुपये आहे. भारतात 5 सप्टेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,43,610 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,56,670 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,17,500 रुपये आहे. भारतात 5 सप्टेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 249.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,49,900 रुपये आहे.

  • 05 Sep 2026 09:55 AM (IST)

    05 Sep 2026 09:55 AM (IST)

    Joymoti Elephant Airlift at Vantara: आसाम-नागालँडच्या पुरातून बचावलेल्या 'जॉयमोती' हत्तीणीला एअरलिफ्ट 

    Joymoti Elephant Airlift at Vantara: जुलै महिन्यात नागालँड आणि आसाममध्ये आलेल्या भीषण पुराच्या महापुरातून बचावलेल्या ५३ वर्षीय 'जॉयमोती' या मादी हत्तीणीला एअरलिफ्ट करून गुजरातच्या जामनगर येथील 'वंतारा' (Vantara) केंद्रात हलवण्यात आले आहे. तेथे तिच्यावर विशेषज्ज्ञ पथकाकडून तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

    जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पुराच्या वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात जॉयमोती वाहून गेली होती. स्थानिक नागरिक व सरकारी यंत्रणांनी तिची सुखरूप सुटका केली असली, तरी या दुर्घटनेत तिच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. कपाळ, उजवा कान, पोटासह जननेंद्रियाच्या भागात खोलवर जखम होऊन त्यात अळ्या पडल्याने तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती.

  • 05 Sep 2026 09:42 AM (IST)

    05 Sep 2026 09:42 AM (IST)

    Mumbai Dahi Handi Festival: मुंबईत सुट्टीच्या दिवशी दहीहंडीचा मोठा उत्साह 

    Mumbai Dahi Handi Festival:  मुंबईत आज सुट्टीचा दिवस आणि दहीहंडीच्या उत्साहामुळे सर्वत्र गोविंदामय वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासूनच विविध भागांत गोविंदा पथकांची धावपळ, आयोजकांची तयारी आणि ढोल-ताशांचा गजर पाहायला मिळत आहे. मानवी मनोऱ्यांचे थर पाहण्यासाठी आणि गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मुंबईकर नागरिकही कुटुंबीयांसह रस्त्यावर उतरले आहेत.

    यंदाच्या दहीहंडी उत्सवात अनेक पथकांनी विक्रम रचण्याचे ध्येय ठेवले आहे. साईलीला क्रीडा मंडळाचे सुमारे ३०० गोविंदा सकाळी ८ वाजल्यापासूनच ठाणे, घाटकोपर, विक्रोळी आणि गोरेगाव परिसरातील हंड्या फोडण्यासाठी रवाना झाले आहेत. गेल्या वर्षी आठ थरांची यशस्वी सलामी देणारे हे पथक यंदा तब्बल नऊ थरांचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरले आहे.

  • 05 Sep 2026 09:36 AM (IST)

    05 Sep 2026 09:36 AM (IST)

    Bhusawal  Politics: शरद पवार गटाला भुसावळमध्ये  मोठा धक्का; १२ पैकी ११ नगरसेवकांचा  शिंदेंसेनेत प्रवेश

    Bhusawal  Politics:  भुसावळ नगरपालिकेमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षात न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत राष्ट्रवादीच्या १२ पैकी तब्बल ११ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या धक्कादायक घडामोडीमुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 05 Sep 2026 09:30 AM (IST)

    05 Sep 2026 09:30 AM (IST)

    Ghatkopar MNS Dahi Handi:  मनसेच्या ५१ लाखांच्या दहीहंडीला मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारली 

    Ghatkopar MNS Dahi Handi:   राज्यभरात आज दहीहंडीचा मोठा उत्साह असतानाच मुंबई पोलिसांनी घाटकोपर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) दहीहंडी उत्सवाला मोठा झटका दिला आहे. ऐन उत्सवाच्या आदल्या दिवशी पोलिसांनी या दहीहंडीला परवानगी नाकारली आहे.मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या पुढाकाराने घाटकोपर येथील अमृतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांचा नकार असला तरी गणेश चुक्कल हे दहीहंडी साजरी करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

Web Title: Maharashtra national to international sports to crime breaking live news in marathi 5 september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • India news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा
1

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा

Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा
2

Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा

Pune Voter List Form 6 Form: मतदार नोंदणी सुलभ; प्रक्रियेला गती, नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी ८३ हजार अर्ज
3

Pune Voter List Form 6 Form: मतदार नोंदणी सुलभ; प्रक्रियेला गती, नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी ८३ हजार अर्ज

Pune MLC Election: पुण्यात पदवीधर, शिक्षक मतदारांचा उत्साह; मतदानासाठी केंद्रांवर गर्दी
4

Pune MLC Election: पुण्यात पदवीधर, शिक्षक मतदारांचा उत्साह; मतदानासाठी केंद्रांवर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.