Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्योगविश्वातील शुक्रतारा रतन टाटा यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 ऑक्टोबरचा इतिहास

Ratan Tata death anniversary : भारताच्या उद्योगजगातील एक अजरामर व्यक्तीमत्त्व म्हणजे रतन टाटा. रतम टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला यशाच्या उंच शिखरावर पोहचवले. आज रतन टाटा यांच्या पुण्यतिथी आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 09, 2025 | 10:53 AM
Death anniversary of Ratan Tata marathi informationChairman of Tata Group and successful entrepreneur

Death anniversary of Ratan Tata marathi informationChairman of Tata Group and successful entrepreneur

Follow Us
Follow Us:

Ratan Tata death anniversary : असे एक उद्योगपती ज्यांची जागा भारतीयांच्या मनामध्ये कायमची कोरली गेली आहे ते म्हणजे रतन टाटा. रतन टाटा यांचा जन्म मुंबई येथे एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई आणि अमेरिकेत झाले. पदवी प्राप्त करून ते १९६१ मध्ये टाटा समूहात सामील झाले. सुरुवातीच्या काळात ते टाटा एअरलाइन्स आणि टाटा इंडस्ट्रीजमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा एअर इंडिया ही भारताची आघाडीची विमान कंपनी बनली. रतन टाटा यांनी भारतीय उद्योगाला दिशा दिली आणि त्यांच्या दूरदृष्टीने टाटा समूहाला जागतिक स्तरावर नेले. मागील वर्षी आजच्या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा हे त्यांच्या समाजसेवा आणि उद्योगनाविन्यासाठी नेहमीच स्मरणात राहतील. 

09 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1410 : प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला.
  • 1446 : हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली.
  • 1604 : केपलरचा सुपरनोव्हा हा आकाशगंगेमध्ये पाहण्यात आलेला सर्वात अलीकडील सुपरनोव्हा आहे.
  • 1806 : पर्शिया ने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1960 : विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
  • 1962 : युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1981 : फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.
  • 2006 : उत्तर कोरियाने पहिली आण्विक चाचणी घेतली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

09 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1850 : ‘हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर’ – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 17 सप्टेंबर 1936)
  • 1877 : ‘गोपबंधु दास’ – भारतीय लेखक यांचा जन्म.
  • 1889 : ‘कॉलेट ई. वूल्मन’ – डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 11 सप्टेंबर 1966)
  • 1891 : ‘शंकरराव वासुदेव किर्लोस्कर’ – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 1 जानेवारी 1975)
  • 1922 : ‘गोपालसमुद्रम नारायण रामचंद्रन’ – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 7 एप्रिल 2001)
  • 1924 : ‘थिरूनलूर करुणाकरन’ – भारतीय कवि आणि स्कॉलर यांचा जन्म. (मृत्यू : 5 जुलै 2006)
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

09 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1892 : ‘रावबहादूर गोपाळ हरी देशमुख’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 1823)
  • 1914 : ‘विनायक कोंडदेव ओक’ – बालवाङ्‌मयकार यांचे निधन. (जन्म : 25 फेब्रुवारी 1840)
  • 1955 : ‘गोविंदराव टेंबे’ – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक यांचे निधन. (जन्म : 5 जून 1881)
  • 1987 : ‘गुरू गोपीनाथ’ – कथकली नर्तक यांचे निधन. (जन्म : 24 जून 1908)
  • 1998 : ‘जयवंत पाठारे’ – छायालेखक यांचे निधन.
  • 1999 : ‘अनंत दामले’ – नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी यांचे निधन.
  • 2000 : ‘पॅट्रिक अँथनी पोर्टिअस’ – व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त इंडियन-स्कॉटिश कर्नल यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1918)
  • 2006 : ‘कांशी राम’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 15 मार्च 1934)
  • 2015 : ‘रवींद्र जैन’ – भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1944)
  • 2024 : ‘रतन टाटा’ – पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतीय उद्योगपती यांचे निधन.

Web Title: Death anniversary of ratan tata marathi informationchairman of tata group and successful entrepreneur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh
  • Ratan Tata Death

संबंधित बातम्या

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
1

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
2

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
3

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
4

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.