Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: ‘सुगंधात न्हालेली दिवाळी’; सेंटेड मेणबत्यांना बाजारात वाढली मागणी

ऑनलाईन खरेदीतही लक्षणीय वाढ झाली आहे. विक्रेत्यांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 21, 2025 | 09:48 PM
Diwali 2025: 'सुगंधात न्हालेली दिवाळी'; सेंटेड मेणबत्यांना बाजारात वाढली मागणी

Diwali 2025: 'सुगंधात न्हालेली दिवाळी'; सेंटेड मेणबत्यांना बाजारात वाढली मागणी

Follow Us
Close
Follow Us:
सुनयना सोनवणे/पुणे:  या वर्षीची दिवाळी फक्त प्रकाश आणि रंगांनी नव्हे, तर सुगंधाने उजळली आहे. पारंपरिक मातीचे दिवे आणि रंगीबेरंगी लायटिंगसोबतच आता सुगंधी मेणबत्या सणाच्या सजावटीचा नवा ट्रेंड बनल्या आहेत. प्रत्येक घरात आता प्रकाशासोबत मोहक सुवास दरवळत असून, बाजारपेठेत सेंटेड कँडल्सची विक्री झपाट्याने वाढत आहे.
ग्राहकांच्या पसंतीस नव्या प्रकारांच्या मेणबत्या

या वर्षी बाजारात अनेक नवीन प्रकारच्या मेणबत्या उपलब्ध झाल्या आहेत. सोया वॅक्सपासून बनवलेल्या इको-फ्रेंडली कँडल्स, गुलाब, लॅव्हेंडर, चंदन, ऊद आणि व्हॅनिला या सुगंधांच्या थीम कलेक्शन्स, तसेच मिठाईच्या आकाराच्या आकर्षक मेणबत्या, ज्या गिफ्टिंगसाठी विशेष लोकप्रिय ठरल्या आहेत.
सुगंधात गुंफलेला उत्सवभाव

ग्राहकांमध्ये यंदा सर्वाधिक मागणी ऊद, चंदन आणि व्हॅनिला या सुगंधांच्या मेणबत्यांची आहे. “व्हॅनिला आणि मसाल्यांचा सुगंध थंड हवेत उबदारपणा आणतो, तर चंदन आणि ऊद घरात शांतता आणि पारंपरिक भाव निर्माण करतात, असे विक्रेते सांगतात.

Diwali 2025: दिवाळी सण माणसांसाठी आनंदाचा मात्र पक्ष्यांसाठी ठरतोय ‘कर्दनकाळ’; नेमके कारण काय?

ऑनलाईन खरेदीतही लक्षणीय वाढ झाली आहे. विक्रेत्यांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ग्राहकांना नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या, धूररहित आणि पुनर्वापरयोग्य पॅकेजिंग असलेल्या कँडल्स अधिक आवडत आहेत.
सस्टेनेबल कँडल्सचा ट्रेंड

पर्यावरणपूरक उत्पादनांकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे. सोया वॅक्स, बीस्वॅक्स आणि कोकोनट वॅक्सपासून तयार केलेल्या मेणबत्या पारंपरिक पराफिनच्या तुलनेत कमी धूर आणि अधिक टिकाऊपणा देतात. हाताने बनवलेल्या आर्टिसनल कँडल्सही भेटवस्तू म्हणून लोकप्रिय होत आहेत.
वाढती बाजारपेठ
भारतातील मेणबत्ती बाजार २०२५ पर्यंत सुमारे ३३७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमेझॉन, नायका, फ्लिपकार्टसह अनेक ऑनलाईन मार्केटप्लेसवर आणि स्थानिक व्यावसायिकांच्या इंस्टाग्राम पेजेस व वेबसाईट्सवर सेंटेड कँडल गिफ्ट सेट्सची विक्री उच्चांक गाठत आहे.
‘लोक आता फक्त दिवे लावून समाधानी राहत नाहीत. प्रत्येक खोलीला, प्रत्येक क्षणाला एक ‘मूड’ द्यायचा असतो. त्यामुळे मूड-बेस्ड सुगंधी मेणबत्याना अधिक मागणी येत आहे.’
 प्रज्ञा गायकवाड, संस्थापक, इरा मर्चंटाईज

Diwali 2025: काळानुसार बदलले रांगोळीचे स्वरूप; पारंपरिकतेपासून थेट…

‘पूर्वी मी दिवाळीत फुलं आणि अगरबत्ती वापरत असे. पण आता मला प्रत्येक खोलीला वेगळा सुगंध द्यायचा असतो. त्यामुळे मी प्रत्येक वर्षी नवीन सुगंधाच्या मेणबत्या घेत असते — या छोट्या गोष्टी सणाला खरोखर खास बनवतात.’
अस्मिता जाधव, ग्राहक

Web Title: Demand for scented candles increased significantly traditional lights during diwali navarashtra special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 09:48 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • pune news

संबंधित बातम्या

Diwali 2025: लक्ष्मीपूजनानिमित्त सजले ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी’ मंदिर; परिसरात भव्य फुलांची सजावट
1

Diwali 2025: लक्ष्मीपूजनानिमित्त सजले ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी’ मंदिर; परिसरात भव्य फुलांची सजावट

प्रवाशांसाठी दिवाळी-छठ पूजा बंपर भेट! मध्य रेल्वे चालवणार तब्बल १९९८ विशेष फेऱ्या; ३० लाखाहून अधिक प्रवाशांना मोठा दिलासा
2

प्रवाशांसाठी दिवाळी-छठ पूजा बंपर भेट! मध्य रेल्वे चालवणार तब्बल १९९८ विशेष फेऱ्या; ३० लाखाहून अधिक प्रवाशांना मोठा दिलासा

Diwali 2025 Sales: या दिवाळीत विक्रीचा नवा विक्रम, 6.05 लाख कोटींचा व्यवसाय, बाजारात “व्होकल फॉर लोकल” चा आवाज
3

Diwali 2025 Sales: या दिवाळीत विक्रीचा नवा विक्रम, 6.05 लाख कोटींचा व्यवसाय, बाजारात “व्होकल फॉर लोकल” चा आवाज

Diwali Business News: ‘स्वदेशी’ची लाट! दिवाळीत ६.०५ लाख कोटींचा बंपर व्यवसाय, चीनच्या उत्पादनांना मोठा फटका
4

Diwali Business News: ‘स्वदेशी’ची लाट! दिवाळीत ६.०५ लाख कोटींचा बंपर व्यवसाय, चीनच्या उत्पादनांना मोठा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.