रांगोळीचे बदलते स्वरूप (फोटो - istockphoto)
रांगोळी काढण्याची प्रथा ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग
रांगोळी शुभ सौंदर्याचे आणि स्वागताचे प्रतीक
काळानुसार बदलत गेले रांगोळीचे स्वरूप
सुनयना सोनवणे/पुणे: दिवाळीच्या सणात रांगोळी काढण्याची प्रथा ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.भारतीय संस्कृतीत रांगोळी ही केवळ सजावट नसून ते शुभ सौंदर्याचे आणि स्वागताचे प्रतीक आहे. असे मानले जाते की रांगोळीने घरात लक्ष्मीचे आगमन होते. सकारात्मक ऊर्जा वातावरणात दरवळते. काळानुसार रांगोळीचे स्वरूप आणि प्रकार बदलले असले तरी तिचा उद्देश तोच आहे.
पारंपरिक रांगोळीचे प्रकार
साधेपणातले सौंदर्य जपत पूर्वीच्या काळात रांगोळी ही घरातील महिलांच्या दैनंदिन पारंपारिकचा भाग होती. अंगण झाडून, धुवून, स्वच्छ केले की त्या जमिनीवर तांदळाचे पीठ, हळद-कुंकू, गेरू अशा नैसर्गिक पदार्थांनी रांगोळी काढली जायची. या नैसर्गिक रंगांमुळे रांगोळीला शुद्धता आणि पारंपरिक सौंदर्य लाभते. पूर्वीच्या काळात रांगोळ्या अत्यंत साध्या, पण कलात्मक आणि प्रतीकात्मक असत.
पारंपरिक रांगोळीचे काही प्रमुख प्रकार
१. बिंदू रांगोळी – बिंदू जोडून तयार होणारी गणिती अचूक रचना.
२. पद्म रांगोळी – कमळाच्या आकारावर आधारित, लक्ष्मीपूजनासाठी लोकप्रिय.
३. शुभ-लाभ रांगोळी – स्वस्तिक, ओम, दीप, शुभ-लाभ अशी शुभ चिन्हे असलेली रांगोळी.
४. भूगोलावर आधारित रांगोळी – सममिती, आकृत्या आणि कोन वाप
Diwali 2025: दिवाळी सण माणसांसाठी आनंदाचा मात्र पक्ष्यांसाठी ठरतोय ‘कर्दनकाळ’; नेमके कारण काय?
आधुनिक काळातील रांगोळींचे वैविध्य
आजच्या काळात रांगोळी कलेने आधुनिकतेचा स्वीकार केला आहे. आता पारंपरिकतेसोबत नवीन प्रयोग दिसतात.
१. थीम आधारित रांगोळी – एखाद्या विषयावर, सामाजिक संदेशावर किंवा सणाच्या थीमवर आधारित रांगोळी.
२. थ्री डी रांगोळी – दृष्टीभ्रम निर्माण करणारी, त्रिमितीय परिणाम देणारी रांगोळी.
३. फुलांची रांगोळी – झेंडू, गुलाब, शेवंती यांच्या पाकळ्यांनी सजवलेली आकर्षक रचना.
४. कृत्रिम पावडर रंगांची रांगोळी – तयार केलेल्या रंगीत पावडरने काढलेली रांगोळी, जी अधिक चमकदार व टिकाऊ असते.
५. एलईडी, आरसे आणि ग्लिटर वापरून केलेली रांगोळी – आधुनिक सजावटीचे घटक वापरून तयार केलेली रांगोळी, जी रात्रीच्या उजेडात अधिक आकर्षक दिसते.
६. रेडीमेड रांगोळी – आजकाल रेडीमेड रांगोळी (पूर्वतयार डिझाइन्स, स्टेन्सिल किंवा स्टिकर स्वरूपात) देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. ती वापरण्यास सोपी, स्वच्छ आणि वेळ वाचवणारी असल्यामुळे गृहिणी व कामकाजात गुंतलेल्या लोकांमध्ये तिची मोठी मागणी आहे.
दिवाळीच्या आठवडाभर आधीच आमच्या दुकानात रंगांचा मेळा भरतो. निऑन, मेटॅलिक, सिल्वर, गोल्डश रंगांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. तसेच आता लोक डी.आय.वाय. रांगोळी किट्सही घेऊन जातात.
-संतोष पवार, रांगोळी विक्रेते
फुलांच्या रांगोळ्यांसाठी झेंडू, गुलाब, शेवंती या फुलांची मागणी प्रचंड वाढली आहे. आता लोक रांगोळीला फुलांचा सुगंध आणि आधुनिक सजावटीच्या रूपात रंगवतात.
– फुलविक्रेते, मंडई
दिवाळी पहाट सारख्या मोठ्या कार्यक्रमांना रांगोळी काढण्यासाठी जास्त मागणी वाढते. पारंपारिक कथेसोबतच नाविन्य असलेल्या रांगोळ्यां लोकांना जास्त आवडतात. सोशल मीडियामुळे रांगोळी अधिक लोकप्रिय होते. आधुनिक रंग, थ्रीडी, एम्बॉस अशा रांगोळ्यांची मागणी जास्त आहे.
-वर्षा भराटे, रांगोळी प्रशिक्षक आणि कलाकार