फोटो सौजन्य- सोशल मीडिया
World Mental Health Day: जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी १० ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उघडपणे चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे, परंतु अजूनही समाजात मानसिक आरोग्याच्या समस्या दुर्लक्षित केल्या जातात.
समाजाने मानसिक आरोग्याबाबत असलेले गैरसमज दूर करून, एकमेकांना आधार देणे आणि मदत करण्याचे महत्त्व लक्षात ठेवावे. मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींना मदत मिळाली पाहिजे, हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.






