
Din Vishesh
आज मराठी रंगभूमीतील पहिल्या महिल्या नाटककार, गायिका आणि संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्मदिवस. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपल्या उत्तम अभिनय, गायनाने आपले स्वत:चे एक स्थान निर्माण केले. त्यावेळी रंगमंचावर महिलांनी काम करणे हे अत्यंत दुर्मिळच होते. पण त्यांनी जयद्रथ विडंबन आणि दुसरे संगीत दामिनी अशी दोन नाटके लिहिली. ही दोन्ही नाटके त्या काळात खूप गाजली. जवळपास चार वर्षे रंगमंचावर याचे सादरीकरण झाले, ज्यातून हिराबाई यांनी स्त्री-पुरुष समानतेवर आपले विचार मांडले. त्यांच्या कार्याची इतिहासात फारशी नोंद नाही. पण त्यांच्या योगदानामुळे मराठी रंगभूमीमध्ये त्यांना आद्य स्त्री नाटककार म्हणून ओळखले जाऊ लागले.
२२ नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
२२ नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष