• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Fisherman Lost At Sea For 3 Months Survived On Rainwater Turtles

International Fishermen’s Day : ‘पावसाचे पाणी प्यायलो, कासवालाही खाल्ले…’ तीन महिने समुद्रात भटकत राहिला मच्छीमार

International Fishermen's Day : वयाच्या 61व्या वर्षी त्यांनी अशक्यप्राय संकटांशी सामना करत तब्बल 95 दिवस समुद्रात भटकत राहून मृत्यूला हरवलं आणि अखेर जिवंत किनाऱ्यावर पोहोचले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 29, 2025 | 09:45 AM
Fisherman lost at sea for 3 months Survived on rainwater turtles

‘पावसाचं पाणी प्यायलो, कासवही खाल्लं…’ समुद्रात ९५ दिवस हरवलेला मच्छीमार अखेर जिवंत परतला! ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

International Fishermen’s Day : एखाद्या थरारक चित्रपटाला लाजवेल अशी ही कहाणी आहे मॅक्सिमो नापा कॅस्ट्रो यांची. वयाच्या ६१व्या वर्षी त्यांनी अशक्यप्राय संकटांशी सामना करत तब्बल ९५ दिवस समुद्रात भटकत राहून मृत्यूला हरवलं आणि अखेर जिवंत किनाऱ्यावर पोहोचले. समुद्रात हरवलेला हा मच्छीमार तीन महिन्यांनंतर इक्वेडोरच्या जहाजाच्या मदतीने वाचवण्यात आला, आणि सध्या त्यांच्या धैर्याचं कौतुक पेरूभर केलं जात आहे.

मार्ग चुकल्यानं सुरु झाली मृत्यूशी झुंज

कॅस्ट्रो ७ डिसेंबर रोजी पेरूमधील मार्कोना बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. परंतु, अचानक खराब हवामानामुळे त्यांच्या बोटीचा मार्ग बदलला गेला आणि ते सागराच्या विशालतेत हरवले. ना दिशेचा ठाव, ना किनाऱ्याचा पत्ता… कॅस्ट्रोची बोट दिवसेंदिवस समुद्रात भरकटत राहिली. अखेर ११ मार्च रोजी, उत्तर पेरूच्या किनाऱ्याजवळ एका इक्वेडोरियन मच्छीमार जहाजाने त्यांना पाहिलं आणि वाचवलं. तेव्हा कॅस्ट्रो अत्यंत अशक्त, उपाशी आणि तहानलेले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पैता शहरातील नुएस्ट्रा सेनोरा डी लास मर्सिडेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराण हट्टाला पेटला! अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही ‘Fordow Nuclear Power Plant’च्या सॅटेलाईट प्रतिमा पाहून इस्रायल अस्वस्थ

समुद्रात जगण्यासाठी ‘असे’ केले प्रयत्न

कॅस्ट्रो यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “बोटीत साचलेलं पावसाचं पाणी पिऊन तहान भागवत होतो. खाण्यासाठी कीटक, पक्षी आणि एकदा तर कासवही खाल्लं.” शेवटचे १५ दिवस अत्यंत कठीण होते कारण त्या काळात काहीही खाण्यास मिळालं नव्हतं. त्यांनी असेही नमूद केलं की, “हे सर्व सहन करणं सोपं नव्हतं, पण जगायचं ठरवलं होतं.”

‘माझी आई, माझी नात… म्हणून मी जिवंत राहिलो’

कॅस्ट्रोच्या या जगण्यामागे त्यांचं धैर्य आणि कुटुंबावरील प्रेम हे प्रमुख कारण होतं. “माझ्या आईसाठी मी जगलो. तिची काळजी वाटत होती. माझी एक छोटी नात आहे, तिच्यासाठी मी परतायचं ठरवलं. दररोज स्वतःला सांगायचो, की अजूनही घरी जायचं आहे, मी हार मानू शकत नाही.”

सोशल मीडियावरून मुलीची आर्त विनंती

कॅस्ट्रोच्या मुलीने इनेस नापा टोरेसने वडिलांसाठी तीन महिन्यांपर्यंत शोध मोहीम राबवली. ३ मार्च रोजी तिने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहून त्यांच्या शोधासाठी लोकांकडे मदत मागितली होती. “प्रत्येक दिवस आमच्यासाठी अधिक वेदनादायक ठरत आहे. आईसाठी आणि आजीसाठी हा काळ अत्यंत त्रासदायक आहे”, असं तिने लिहिलं होतं.

अखेर सुखद शेवट

इक्वेडोरच्या मच्छीमारांनी कॅस्ट्रोला वाचवल्यानंतर, कुटुंबीयांना दिलासा मिळाला. इनेसने फेसबुकवर पुन्हा एकदा पोस्ट लिहीत त्यांचे आभार मानले आणि आपल्या वडिलांची परतफेर ही एक ‘चमत्कारीक भेट’ असल्याचं म्हटलं.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘डेथ टू इजरायल, डेथ टू अमेरिका…’ इस्रायली हल्ल्यात जीव गमावलेल्या लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांना इराणचा अंतिम निरोप

धैर्य, आशा आणि कुटुंबप्रेमाची प्रेरणादायक कथा

ही कहाणी धैर्य, आशा आणि कुटुंबप्रेमाची प्रेरणादायक कथा आहे. मृत्यूशी थेट झुंज देत कॅस्ट्रो जिवंत परतले आणि त्यांच्या संघर्षाने संपूर्ण जगाला खिळवून ठेवलं आहे. हे प्रकरण केवळ एक बातमी नसून, मानवी इच्छाशक्तीचा विजय आहे.

Web Title: Fisherman lost at sea for 3 months survived on rainwater turtles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 09:29 AM

Topics:  

  • Fishermen community
  • fishing boat
  • navarashtra special story
  • sea

संबंधित बातम्या

Dr. Zakir Hussain: ‘भारत हेच माझे घर!’ तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या ‘त्या’ एका वाक्याने अवघे विश्व झाले होते स्तब्ध
1

Dr. Zakir Hussain: ‘भारत हेच माझे घर!’ तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या ‘त्या’ एका वाक्याने अवघे विश्व झाले होते स्तब्ध

Periodic Table Day: ‘राष्ट्रीय आवर्त सारणी दिन’ ही विज्ञानाची बाराखडी; वाचा रसायनशास्त्रातील या ‘जादूई’ तक्त्याचा रंजक इतिहास
2

Periodic Table Day: ‘राष्ट्रीय आवर्त सारणी दिन’ ही विज्ञानाची बाराखडी; वाचा रसायनशास्त्रातील या ‘जादूई’ तक्त्याचा रंजक इतिहास

End FGM : बापरे! अंगावर काटा आणणारी प्रथा; पाहा काय आहे ‘महिला जननेंद्रियांबद्दलची विकृती’ आणि का आवश्यक आहे त्याविरुद्ध लढा
3

End FGM : बापरे! अंगावर काटा आणणारी प्रथा; पाहा काय आहे ‘महिला जननेंद्रियांबद्दलची विकृती’ आणि का आवश्यक आहे त्याविरुद्ध लढा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

Feb 12, 2026 | 09:35 PM
हिमालयाच्या साक्षीने बांधल्या सात जन्माच्या गाठी! लग्न हुरकलं, अक्षया-विशालने केलं हटके फोटोशूट

हिमालयाच्या साक्षीने बांधल्या सात जन्माच्या गाठी! लग्न हुरकलं, अक्षया-विशालने केलं हटके फोटोशूट

Feb 12, 2026 | 09:24 PM
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी

Feb 12, 2026 | 09:20 PM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा! ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहांचे होणार बांधकाम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा! ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहांचे होणार बांधकाम

Feb 12, 2026 | 09:14 PM
Washim News :कुतूहल प्रदर्शनाने जिल्ह्यात इतिहास घडविला! ४० हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट

Washim News :कुतूहल प्रदर्शनाने जिल्ह्यात इतिहास घडविला! ४० हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट

Feb 12, 2026 | 09:00 PM
IND vs NAM, T20 World Cup Live: दिल्लीत इशान किशन अन् हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी, नामिबियासमोर ठेवले २१० धावांचे लक्ष्य

IND vs NAM, T20 World Cup Live: दिल्लीत इशान किशन अन् हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी, नामिबियासमोर ठेवले २१० धावांचे लक्ष्य

Feb 12, 2026 | 08:46 PM
Ishan Kishan Fifty: ६, ६, ६, ६, ६, अरुण जेटली स्टेडियमवर इशान किशनचे वादळ; घातक फलंदाजीने ‘इतक्या’ चेंडूत झळकावले अर्धशतक

Ishan Kishan Fifty: ६, ६, ६, ६, ६, अरुण जेटली स्टेडियमवर इशान किशनचे वादळ; घातक फलंदाजीने ‘इतक्या’ चेंडूत झळकावले अर्धशतक

Feb 12, 2026 | 08:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.