इराण हट्टाला पेटला! अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही 'Fordow Nuclear Power Plant'च्या सॅटेलाईट प्रतिमा पाहून इस्रायल अस्वस्थ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Fordow uranium enrichment active : अमेरिकेच्या कठोर इशाऱ्यांनंतर आणि ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ अंतर्गत अणुऊर्जा केंद्रांवर झालेल्या हवाई हल्ल्यांनंतरही इराण आपल्या अणुऊर्जा कार्यक्रमावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने समोर आलेल्या उपग्रह प्रतिमांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली असून, इस्रायलच्या सुरक्षाव्यवस्थेवरही चिंता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेने २१ आणि २२ जूनच्या रात्री इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुऊर्जा केंद्रांवर बंकर-बस्टर बॉम्ब फेकून मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला होता. यामागे उद्देश स्पष्ट होता. इराणच्या अणुऊर्जा क्षमतेला रोखणे. मात्र, मॅक्सार टेक्नॉलॉजीजच्या उपग्रह प्रतिमांनुसार, फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात पुन्हा खोदकाम आणि बांधकाम सुरू झाले आहे. नवीन प्रतिमांमध्ये बुलडोझर, ट्रक, क्रेन्स आणि जड यंत्रसामग्री स्पष्टपणे कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. बोगद्यांच्या जवळ नवे रस्ते तयार होताना आणि ताजी माती टाकलेली असल्याचे संकेत मिळाले आहेत. या घडामोडींनी अमेरिका आणि इस्रायलची डोकेदुखी वाढवली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सिंधू पाणी करारावरून भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने; लवाद न्यायालयाच्या निर्णयाने पाकिस्तान आनंदित, भारताचा स्पष्ट नकार
तज्ञांच्या मते, अमेरिकेच्या हल्ल्याआधीच इराणने आपल्या संवेदनशील अणुसाहित्याला सुरक्षित स्थळी हलवले असण्याची शक्यता आहे. काही बोगद्यांना मातीने भरून, बॉम्बहल्ल्यांपासून संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा उभारणी होणे म्हणजे, इराणने अणुकार्यक्रम फक्त तात्पुरते थांबवले होते आणि तो पुन्हा सुरू करण्याचा इरादा स्पष्ट करत आहे.
BREAKING: 🇮🇷 🇺🇸
Most of the highly enriched uranium at Fordow was transferred to an undisclosed location before the American attack – Reuters
16 trucks gathered on 19- 20 June with heavy machinery near the entrance to the main facility.
Trump failed. pic.twitter.com/z5bV75cXEf
— ADAM (@AdameMedia) June 22, 2025
credit : social media
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले की, “फोर्डोमध्ये 60% समृद्ध युरेनियम होते, पण हल्ल्याच्या वेळी ते प्रत्यक्षात तिथे होते की नाही, हे निश्चित सांगता येत नाही.” अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी मात्र दावा केला की, “आमचा हल्ला अत्यंत अचूक होता आणि आम्ही साइटची कार्यक्षमता पूर्णतः नष्ट केली आहे.” त्याचवेळी, IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी) नेही एक निवेदन जाहीर करून सांगितले की, “फोर्डो येथील सेंट्रीफ्यूज सध्या कार्यरत नाहीत.” मात्र त्यांनी हेही स्पष्ट केले की, “प्रत्यक्ष तपासणी किंवा गुप्तचर माहिती मिळाल्याशिवाय परिस्थितीबाबत खात्रीपूर्वक काही सांगता येणार नाही.”
इराणमधील राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये सूड घेण्याचे संकेत दिले जात आहेत. इस्रायलच्या विरोधात कारवाई होऊ शकते, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. इराण आता दोन पर्यायांवर काम करत आहे. अणुऊर्जा क्षमतेची पुनर्स्थापना किंवा ती लपविण्याची रणनीती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्ध आहे की Meme War! ‘Daddy शिवाय पर्याय नाही…’ इराणने डोनाल्ड ट्रम्पचे नाव घेऊन इस्रायलला डिवचले
इराणच्या फोर्डो प्रकल्पातील हालचाली आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही दिसणारा इराणचा हट्ट हे दर्शवतो की, संभाव्य आण्विक संघर्षाकडे जग पुन्हा झुकत आहे. अमेरिकेचा दबाव, इस्रायलची अस्वस्थता आणि इराणचा जिद्दीपणा यामुळे पुढील काही दिवस मध्य पूर्वेत तणावाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरातील अणुशक्तीविषयक यंत्रणांची आणि शांततेच्या प्रयत्नांची मोठी कसोटी लागणार आहे.