1998 मध्ये 1 जून रोजी गोपाल नीलकंठ दांडेकर यांचा मृत्यू झाला होता (फोटो - सोशल मीडिया)
गडकिल्ल्याची भटकंती आणि त्यातून साहित्यनिर्मिती करणारे गोपाल नीलकंठ दांडेकर. त्यांनी सहयाद्रीच्या कुशीमध्ये आयुष्य घालवले. त्यांनी कडेकपाऱ्या, गड-किल्ले आणि डोंगर दऱ्या धुंडाळून काढल्या. भटकी आयुष्य जगून अनुभवांची शिदोरी बाळगलेले गो.नी.दांडेकर यांनी अनेकांना प्रेरणा दिली. गोपाल नीलकंठ दांडेकर ऊर्फ अप्पांचा जन्म ८ जुलै १९१६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे झाला. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी घर सोडले. यानंतर त्यांनी केलेली नर्मदा परिक्रमा ही त्यांच्या आयुष्याची महत्त्वाची पायरी ठरली. 1998 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी लिहिले आहे, ‘मी मेल्यावर माझी रक्षा सहयाद्रीतील शिवछत्रपतींच्या रायगडावर, बाजीप्रभूंच्या पावनखिंडीत, आणि सिंहगडाच्या तानाजी कडयावर, उधळून टाकावी. हे काम बाबासाहेब पुरंदरे यांनी करावे, अशी शेवटची इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती.
01 जून जन्म दिनविशेष
01 जून मृत्यू दिनविशेष






