Hilsa Diplomacy Bangladesh alone accounts for 70% of exports
ढाका : सध्या लोकांचा जागतिक राजकारणातील रस वाढत चाललेला दिसतो, पण त्या विषयावरील गंभीर लेख वाचकांना समजण्यास अवघड आणि वाचण्यास रुक्ष वाटू शकतात. त्यापेक्षा जागतिक राजकारणातील आणि देशोदेशींच्या नेत्यांविषयी काही गंमतीशीरकिस्से वाचण्यास लोकांना अधिक आवडू शकते. त्या माध्यमातून या विषयातील गोडीही वाढू शकते. त्यासाठीच असे रंजक किस्से देणारे हे सदर सुरू करत आहोत.
बांगलादेशात काही महिन्यांपूर्वी झालेले सत्तांतर, पंतप्रधान शेख हसीना यांचे भारतात पलायन, त्यानंतर अलीकडेच तेथील काळजीवाहू सरकारचे प्रमुख मोहम्मद मुनूस यांनी केलेला चीन दौरा आणि त्यातील सूचक वक्तव्ये वा सगळ्यामुळे भारत-बांगलादेश संबंध पुन्हा चर्चेच आले आहेत. त्या अनुषंगाने एक छोटासा मासा दोन्ही देशांच्या संबंधांत किती मोठी भूमिका बजावतो हे पाहणे उद्बोधक ठरेल, पश्चिम बंगाल आणि बंगलादेश अशा दोन्हीकडील चंगाली नागरिकांच्या जीवनात हिल्या किंवा इलिश माशाला मोठे महत्व आहे. हा मासा सीमेच्या दोन्ही बाजूला तितक्याच चवीने खाल्ला जातो. दुर्गापूजा आणि अन्य सणा-समारंभांत हिलसाची पक्वान्ने हमखास बनतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हुकूमशाहीविरोधात मोठी चळवळ उभी राहताना; ट्रम्प सरकारविरोधात अमेरिकेत संतापाची लाट हजारो नागरिक रस्त्यावर
त्या निमित्ताने दोन्हीकडील बाजारांत त्याची मागणी बरीच वाढते आणि त्याची भरपू भरपूर उलाढाल चालते. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या अर्थकारणातही त्याचे महत्त्व मोठे आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पाच हिलसा माशाचा काटा भारत आणि बांगलादेश संबंधांत अडकला होता. त्यावरून दोन्हीकडचे राजकारण तापले होते. निमित्त होते गंगा, तीस्ता अशा भारतातून बांगलादेशात वाहत जाणा-या नद्यांच्या पाणीवाटपाचे. तसेच भारताने बांधलेल्या फराक्का धरणाचे. हिलसाची बाजारात मागणी मोठी असल्याने पश्चिम बंगाल आणि चांगलादेशातही तो खूप जास्त प्रमाणात पकडला जाऊ लागला होता. त्यामुळे त्याच्या पैदाशीवर परिणाम होऊन आचक घटू लागली होती. त्याशिवाय आणखी एक कारण बांगलादेशला सतावत होते.
जगातील हिलसाच्या एकूण निर्यातीपैकी ७० टक्के निर्यात एकटा बांगलादेश करतो, याशिवाय म्यानमार आदी देशही निर्यात करतात. भारतात बंगालशिवाय गुजरात आणि महाराष्ट्रातही काही प्रमाणावर हिलसाची पैदास होते. पण बांगलादेशीहिलसा सर्वोत्कृष्ट मानला जातो. त्याचा जसा समाजकारण, अर्थकारणावर परिणाम होतो, तसाच तो राजकारणावरही होत आहे. शेख हसीना यांनी आजवर त्याचा प्रभावीपणे वापर करून घेतला आहे. – सचिन दिवाण
हिलसा मासे अंडी मालण्यासाठी समुद्रातून उलटा प्रवास करून नदीच्या घरच्या बाजूला जातात. त्यासाठी ते बंगालच्या उपसागरातून भारतातील नद्यांच्या मुखाद्वारे वरील भागात उलटा प्रवास करतात, अंडी घालून नंतर जन्माला आलेली पिले पुन्हा समुद्राकडे प्रवास करतात. पण भारताने वाटेत नद्यांवर बांधलेल्या धरणांमुळे हिलसा माशांना हा प्रवास करताना अडबव्य येऊ लागल्याचे बांगलादेशचे म्हणणे होते. या प्रश्नावर दोन्ही देशांमध्ये चर्चा होत असे. बेसुमार मासेमारी रोखण्यासाठी निबंध घालण्यात आले. मार्च-एप्रिल महिन्यात माशांची पिले लहान असतात. ती पकडली गेल्याने पुढील पैदाशीवर परिणाम होतो. म्हणून या काळात ५०० ग्रॅम पेक्षा कमी वजनाचे मासे पकडण्यावर बंदी पातली गेली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेश पोलिसांचा मोठा निर्णय; शेख हसीना यांच्याविरुद्ध इंटरपोलकडे ‘Red Corner Notice’ची मागणी
बांगलादेशनेहिलसनिर्यातीवरही बंधने घातली. शेख हसीना यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखी कल्पना लढवली. त्यांनी पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती वसू, तसेच नंतर ममता बॅनर्जी यांना हिलसा मासे भेट म्हणून पाठवले, हसीना यांच्या भारतभेटीच्या काव्यत चांगलादेशनेहिलसा माशांवरील निर्यातबंदी उठवली आणि भारतीय बाजारपेठेत काही प्रमाणात मासे पाठवले. दुर्गापूजेसारख्या सणांच्या दरम्यानही सद्भावना व्यक्त करण्यासाठी अशीच पावले उचलली गेली. इतकेच नव्हे तर काही वेळा भारतभेटीत हसीना यांनी चक्क राष्ट्रपती भवनात हिलसाशिजवून भारतीयांना खाऊ घातला. त्यांची ही कृती हिलसाडिप्लोमसी म्हणून ओळखली जाऊ लागली. बांगलादेशचे म्हणणे आहे की, भारताला आणि अन्यत्र निर्यात केली जात असल्याने देशांतर्गतहिलसा माशाचे दर फारच वाढत आहेत. त्यामुळे सामान्य बांगलादेशी नागरिकांना हिलसा विकत घेणे परवडत नाही, गतवर्षी बांगलादेशात दीड किलो हिलसाची किंमत १८०० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे निर्यातीवर बंदी घालावी लागत आहे.