देशाला स्वातंत्र्य मिळून आता 79 वर्ष पूर्ण होत आहेत. गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक क्रांतिकारकांनी स्वत:च्या रक्ताचे पाट वाहिले. त्याचं स्मरण आणि त्यांचे विचार हे आजयागत आणि पुढे देखील कायमच अमर असणार आहे. मात्र याच बरोबर स्वातंत्र्य दिन म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते शाळेत होणारं झेंडावंदन, परेड आणि भाषण. याच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने क्रांतिकारकांनी गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आणि देशाबाबतचं प्रेम आणि आपुलकी जागृत व्हावी म्हणून आपल्या लिखाणातून आणि भाषणातून प्रत्येक भारतीयाला प्रेरित केलं आहे. त्यांच्या याच भाषणामागचे विचार जाणून घेऊयात.
वयाच्या तेवीसाव्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चढले होते. भगत सिंह त्यांच्या भाषणातून कायम एक गोष्ट सांगत असायचे. “स्वातंत्र्य ही कुणी दान करून देण्याची वस्तू नाही, ती तर आपण स्वतःच्या शक्तीने मिळवायची असते”. अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरीविरुद्ध लढणं हेच खऱ्या अर्थाने देशभक्ती आहे.” असं ते आपल्य़ा भाषणातून कायमच भारतीयांना प्रेरित करत होते.
“तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूँगा”, सुभाषबाबूंचं हे वाक्य कायम अमर राहिलं आहे. हे वाक्य ते कायमच म्हणायचे कारण त्यांना भारतीयांना पटवून द्यायचं होतं की स्वातंत्र्य मागून मिळणार नाही तर अन्यायाविरोधात उभं राहून मिळवावं लागणार आहे. : स्वातंत्र्यासाठी बलिदानाशिवाय पर्याय नाही. देशहितासाठी स्वत:चं बलिदान देणं हेचं आपलं कर्तव्य आहे असं ते आपल्या भाषणातून गुलामगिरीतून व्हा देशाला स्वांतंत्र्य़ मिळवून देण्य़ासाठी लढा हे सांगत असे.
“देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण या देशाचे देणं लागतो”. म्हणजेच जन्माला आल्यानंतर कधी ना कधी आपल्याला मोक्ष हा मिळणार आहे. हा देह कधी ना कधी मातीत मिसळणार आहे. मात्र त्याआधी आपण ज्या देशात वाढलो, मोठे झालो त्या देशाच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी प्रयत्नशील असायला हवं हे सावरकरकरांनी त्यांच्या साहित्यातून आणि भाषणातून कायमच प्रेरणा दिली आहे.
या आणि अशा अनेक क्रांतीकारकांनी स्वत:च्या प्रणांची आहुती दिली आणि म्हणूनच आज हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यांनी मिळवून दिलेलं स्वातंत्र्य जपणं हे आज प्रत्येकाची जबाबदारी आहे. झेंडावंदन, उत्तोमोत्तम भाषणं, राष्ट्रगीत गाणं म्हणजे देशाप्रती एका दिवसाचा आदर व्यक्त करणं आहे. ज्या देशात आपणं राहतो तो देश स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करतो ते काम प्रामाणिकपणे करणं, समाजातील स्त्री आणि पुरुषांना सामाजिदृष्ट्या संरक्षण देणं ही फक्त पोलीसांचीच नाही तर देशाचा नागरिक म्हणून प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि याची जाणिव जेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजेल त्यावेळी प्रत्येक दिवस हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाईल.