
indian army day 2026 history significance field marshal cariappa jaipur parade
Indian Army Day 2026 theme and significance : आज संपूर्ण भारत ‘७८ वा भारतीय लष्कर दिन’ (Indian Army Day 2026)(मोठ्या अभिमानाने साजरा करत आहे. सियाचीनच्या गोठवणाऱ्या थंडीपासून ते थरच्या रखरखत्या वाळवंटापर्यंत आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सलाम करण्याचा हा दिवस. पण तुम्हाला माहिती आहे का, की भारतीय लष्कराचा अधिकृत इतिहास स्वातंत्र्याच्या अनेक दशकांपूर्वी सुरू झाला होता? आजच्या दिवशी केवळ लष्करी ताकदच दाखवली जात नाही, तर भारतीयत्वाच्या त्या स्वाभिमानाचा उत्सव साजरा केला जातो, जो १९४९ मध्ये सुरू झाला होता.
भारतीय लष्कराची मुळे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात आहेत. १ एप्रिल १८९५ रोजी ब्रिटीशांनी ‘प्रेसिडेन्सी आर्मी’ (बंगाल, बॉम्बे आणि मद्रास) एकत्र करून अधिकृतपणे भारतीय लष्कराची स्थापना केली होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले, तरीही लष्कराचे नेतृत्व ब्रिटीश अधिकाऱ्यांच्याच हातात होते. अखेर १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल सर फ्रान्सिस बुचर यांनी भारतीय लष्कराची धुरा लेफ्टनंट जनरल के.एम. करिअप्पा यांच्याकडे सोपवली आणि खऱ्या अर्थाने भारतीय लष्कर ‘भारतीय’ झाले. हाच ऐतिहासिक क्षण ‘लष्कर दिन’ म्हणून साजरा केला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO: ‘हिंदूंची गळे कापूनच काश्मीर मिळेल…’ लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा भारताविरुद्ध कट्टरतावादी विषारी प्रचार
यंदाचा लष्कर दिन विशेष आहे, कारण भारतीय लष्कर आता ‘डिजिटल वॉरफेअर’च्या युगात प्रवेश करत आहे. २०२६ सालासाठी ‘Year of Networking and Data Centricity’ ही थीम निवडण्यात आली आहे. याचा अर्थ, आता युद्धभूमीवर केवळ बंदुका आणि रणगाडेच नाही, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सायबर सुरक्षा आणि रिअल-टाइम डेटाचा वापर करून शत्रूला चारी मुंड्या चीत केले जाईल. ‘ऑपरेशन सिंदूर’ सारख्या मोहिमांतून लष्कराने आधीच आपली ताकद सिद्ध केली आहे.
#ArmyDay 2026 Indian Army today celebrates the 78th #ArmyDay with unwavering resolve & commitment to safeguard the sovereignty and territorial integrity of the Nation. On this solemn occasion, we also pay homage to the #Bravehearts who made the supreme sacrifice in the service… pic.twitter.com/553Uw2PgwM — ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) January 15, 2026
दरवर्षी दिल्लीत होणारी मुख्य परेड गेल्या काही वर्षांपासून देशाच्या वेगवेगळ्या भागात आयोजित केली जात आहे. यंदा राजस्थानची राजधानी जयपूर या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार बनली आहे. जयपूरच्या मातीतील शौर्याचा वारसा आणि आधुनिक लष्करी तंत्रज्ञान यांचा संगम आजच्या परेडमध्ये पाहायला मिळत आहे. या परेडमध्ये टी-९० भीष्म रणगाडे, पिनाक रॉकेट सिस्टम आणि स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकॉप्टर्सचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS2026 : ब्रिक्समध्ये मोठी फूट! ट्रम्पच्या भीतीमुळे दक्षिण आफ्रिकेने घेतली माघार; इराणबाबत घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय
ज्यांना प्रेमाने ‘किप्पर’ म्हटले जायचे, त्या के.एम. करिअप्पा यांनी लष्कराला राजकारणापासून दूर ठेवण्याची आणि शिस्तीची महत्त्वाची शिकवण दिली. १९८३ मध्ये त्यांना ‘फील्ड मार्शल’ या सर्वोच्च मानाच्या पदाने गौरवण्यात आले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज भारतीय लष्कर जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली सैन्य बनले आहे.