
India's first woman Dr. Anandibai Joshi Jayanti 31 March History
Dr. Anandibai Joshi : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांची आज जयंती. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास धरली आणि समाजातील रूढी-परंपरांना आव्हान दिले. लहान वयातच विवाह झाल्यानंतरही त्यांच्या पती गोपाळराव जोशी यांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्या काळात महिलांना शिक्षण घेणेही कठीण असताना त्यांनी परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले. अमेरिकेतील ‘वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेंसिल्वेनिया’ येथून त्यांनी डॉक्टर पदवी मिळवली. त्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि धैर्यामुळे त्या भारतीय महिलांसाठी प्रेरणास्थान ठरल्या. अल्पायुष्यातही त्यांनी समाजात मोठा बदल घडवून आणला. त्यांचे कार्य आजही सर्वांना प्रेरणा देते. (Dinvishesh)
31 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
31 मार्च रोजी जन्म दिनविशेष
31 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष