Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Biodiesel Day: आज आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिवस; जाणून घ्या १० ऑगस्टचा इतिहास….

International Biodiesel Day: १० ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिन साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व, बायोडिझेलचे फायदे तसेच १० ऑगस्ट रोजी घडलेल्या ऐतिहासिक घटना आणि जन्म-मृत्यू दिनविशेष जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 10, 2026 | 10:21 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

International Biodiesel Day: आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिवस साजरा केला जातो. बायोडिझेल हा पर्यावरणास अनुकूल इंधन आहे, या दिवशी बायोडिझेलचे फायदे आणि त्याच्या वापराचे महत्त्व यावर जागरूकता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते. बायोडिझेलचा वापर कमी कार्बन उत्सर्जन करतो आणि पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करतो. त्यामुळे हे इंधन वाहतूक क्षेत्रात, कृषी क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात वापरणे महत्वाचे आहे.

बायोडिझेलचा वापर पारंपारिक डिझेलच्या तुलनेत कमी प्रदूषण करणारा असल्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. तसेच, बायोडिझेलच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होण्यास हातभार लागतो. आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिवसाच्या निमित्ताने या इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

१० ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1519 : फर्डिनांड मॅगेलन पाच जहाजे घेऊन पृथ्वी प्रदक्षिणाला निघाले.
  • 1675 : चार्ल्स (द्वितीय) यांनी ग्रीनविच येथे जगप्रसिद्ध जगप्रसिद्ध वेधशाळा रॉयल ऑब्झर्व्हेटरीची पायाभरणी केली.
  • 1809 : इक्वेडोरची राजधानी क्विटोने स्पेनपासून स्वातंत्र्य घोषित केले.
  • 1810 : स्मिथसोनियन संस्थेची स्थापना झाली.
  • 1821 : मिसूरी अमेरिकेचे 24 वे राज्य बनले.
  • 1988 : राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान बेकायदेशीरपणे कैदेत ठेवलेल्या किंवा निर्वासित केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना प्रत्येकी $20,000 नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले.
  • 1990 : मॅगेलन अंतराळयान शुक्रावर पोहोचले.
  • 1999 : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने औषध दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या औषधांमध्ये प्राण्यांच्या घटकांचा उल्लेख करणे बंधनकारक असल्याचा निर्णय दिला.
  • 1999 : इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार, डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर.
शिक्षण क्षेत्रात करिअर करायचे आहे? ‘Teach For India’ फेलोशिपद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळणार..

१० ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1755 : ‘नारायणराव पेशवा’ – 5 वा पेशवा यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1773)
  • 1810 : ‘कॅमिलो बेन्सो’ – इटलीचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 6 जून 1861)
  • 1814 : ‘हेनरी नेस्ले’ – नेस्ले कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जुलै 1890)
  • 1855 : ‘उस्ताद अल्लादियाँ खाँ’ – जयपूर, अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गान सम्राट यांचा जन्म. (मृत्यू : 16 मार्च 1946)
  • 1860 : ‘पं. विष्णू नारायण भातखंडे’ – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 19 सप्टेंबर 1936)
  • 1874 : ‘हर्बर्ट हूव्हर’ – अमेरिकेचे 31 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 20 ऑक्टोबर 1964)
  • 1889 : ‘चार्ल्स डॅरो’ – मोनोपोली खेळाचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 28 ऑगस्ट 1968)
  • 1894 : ‘व्ही. व्ही. गिरी’ – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 23 जून 1980)
  • 1902 : ‘नॉर्मा शिअरर’ – कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 12 जून 1983)
  • 1913 : ‘डॉ. अमृत माधव घाटगे’ – संस्कृत व प्राकृत विद्वान यांचा जन्म. (मृत्यू : 8 मे 2003)
  • 1933 : ‘किथ डकवर्थ’ – कोसवर्थ कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 18 डिसेंबर 2005)
  • 1956 : ‘पेरीन वॉर्सी’ – भारतीय-इंग्रजी उद्योगपती यांचा जन्म.
  • 1960 : ‘देवांग मेहता’ – भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज चे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 12 जुलै 2001)
  • 1963 : ‘फुलन देवी’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 जुलै 2001)
  • 1979 : ‘दिनुशा फर्नान्डो’ – श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
Study in UK: युकेमध्ये शिकण्याचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ स्कॉलरशिपची पात्रता आणि अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या!

१० ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1945 : ‘रॉबर्ट गॉडार्ड’ – अमेरिकन रॉकेटतज्ञ.
  • 1950 : ‘खेमचंद प्रकाश’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म : 12 डिसेंबर 1907)
  • 1982 : ‘एम. के. वैणू बाप्पा’ – भारतीय खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 10 एप्रिल 1927)
  • 1986 : ‘अरुणकुमार वैद्य’ – महावीरचक्र प्राप्त जनरल यांचे निधन (जन्म : 27 जानेवारी 1926)
  • 1992 : ‘शंकरराव पांडुरंगराव थोरात’ – कीर्तिचक्र, पद्मश्री लेफ्टनंट जनरल यांचे निधन. (जन्म : 12 ऑगस्ट1906)
  • 1997 : ‘नारायण पेडणेकर’ – कवी व नाट्यसमीक्षक यांचे निधन.
  • 1999 : ‘आचार्य बलदेव उपाध्याय’ – भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक यांचे निधन. (जन्म : 10 ऑक्टोबर 1899)
  • 2012 : ‘सुरेश दलाल’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक यांचे निधन. (जन्म : 11 ऑक्टोबर 1932)

Web Title: International biodiesel day august 10 history marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

ऑगस्ट क्रांती दिन: आंदोलन, चळवळीने घडला संघर्षाचा इतिहास! ‘करो या मरो’च्या नाऱ्याने पेटली जनतेच्या मनात स्वातंत्र्याची मशाल
1

ऑगस्ट क्रांती दिन: आंदोलन, चळवळीने घडला संघर्षाचा इतिहास! ‘करो या मरो’च्या नाऱ्याने पेटली जनतेच्या मनात स्वातंत्र्याची मशाल

World Indigenous Peoples Day : मानवी संस्कृतीचे मूळ जपणार्‍या आदिवासी समुदायांचे अधिकार आणि अस्तित्वाचा संघर्ष जाणून घेण्याचा दिवस
2

World Indigenous Peoples Day : मानवी संस्कृतीचे मूळ जपणार्‍या आदिवासी समुदायांचे अधिकार आणि अस्तित्वाचा संघर्ष जाणून घेण्याचा दिवस

August Kranti Diwas: 9 ऑगस्ट 1942 ची ती ऐतिहासिक पहाट! काँग्रेस नेत्यांना अटक अन् आंदोलनाची सूत्रे जनतेच्या हाती; वाचा रंजक इतिहास
3

August Kranti Diwas: 9 ऑगस्ट 1942 ची ती ऐतिहासिक पहाट! काँग्रेस नेत्यांना अटक अन् आंदोलनाची सूत्रे जनतेच्या हाती; वाचा रंजक इतिहास

August 9 History: आज कांती दिवस; जाणून घ्या ९ ऑगस्टचा इतिहास..
4

August 9 History: आज कांती दिवस; जाणून घ्या ९ ऑगस्टचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.