Is Russia rising as a superpower from the flames of war
रशिया-युक्रेन : रशिया-युक्रेन युद्धाने संपूर्ण जागतिक समीकरणे बदलली आहेत. जगभरातील राष्ट्रे युद्धाच्या परिणामांवर चर्चा करत असताना, रशियाने मात्र संकटांवर मात करत स्वतःला नव्या स्वरूपात घडवले आहे. रशिया हा केवळ भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा देश नसून, युद्धाच्या आणि संकटांच्या धगीतून अधिक मजबूत होत जाणारी महासत्ता आहे.
2022 मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाने नव्या आंतरराष्ट्रीय संघर्षाचे स्वरूप घेतले आहे. सुरुवातीला हा रशिया विरुद्ध युक्रेनचा संघर्ष वाटत असला तरी, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर त्याला नवा कलाटणी मिळाली. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यातील चर्चेनंतर अमेरिका-युक्रेन संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि युद्ध अधिक गुंतागुंतीचे झाले.
युद्धाच्या प्रारंभी रशियाला कठोर आर्थिक निर्बंधांचा सामना करावा लागला. अमेरिकेसह नाटो राष्ट्रांनी रशियावर अभूतपूर्व निर्बंध लादले. व्हिसा आणि मास्टरकार्डने रशियामधील सेवा बंद केल्या, जागतिक बाजारपेठेतून रशियाला वेगळे करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, रशियाने या सर्व अडचणींवर मात करत स्वतःच्या प्रणाली विकसित केल्या आणि निर्बंधांचा प्रभाव कमी केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China News: अंतराळातही ड्रॅगनचे वर्चस्व! अवघ्या पाच दिवसांत दोन रॉकेट प्रक्षेपण, सहा उपग्रह कक्षेत
रशियाने गेल्या काही वर्षांत आपले क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणावर वाढवले आहे. 2014 मध्ये क्रिमिया रशियाचा भाग बनला आणि 2022 नंतर डोनेस्तक, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिझिया हे चार प्रांत अधिकृतपणे रशियामध्ये समाविष्ट झाले. या प्रदेशांच्या समावेशामुळे रशियाचा आकार वाढला असून, त्याची भू-राजकीय ताकदही अधिक दृढ झाली आहे.
युद्धाच्या सुरुवातीला अनेक रशियन नागरिक युद्धाच्या नैतिकतेवर प्रश्न विचारत होते. मात्र, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जनतेशी सतत संवाद साधून परिस्थिती स्पष्ट केली. त्यांनी देशातील लष्करी भरती प्रक्रिया पारदर्शक केली आणि सैन्याला आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. युद्धाच्या रणांगणावरही रशियन सैन्याने उल्लेखनीय बदल घडवले. सुरुवातीला काही प्रदेशांत माघार घ्यावी लागली असली तरी, त्यानंतरच्या काळात सैन्याच्या रणनीतीमध्ये मोठा बदल करण्यात आला. सैनिकांना वेळेवर वेतन, उत्तम सुविधा आणि गरम भोजन देण्यात येऊ लागले. हे पाहून तज्ज्ञांनी स्पष्ट मत मांडले की, जो देश रणांगणावर आपल्या सैनिकांची काळजी घेतो, तो कधीही सहज पराभूत होऊ शकत नाही.
मारियुपोल हे शहर युद्धामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाले होते. 2022 मध्ये अझोव्ह स्टील प्लांटच्या लढाईने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. मात्र, अवघ्या तीन वर्षांत हे शहर पुन्हा उभे करण्यात आले. क्रेमलिनच्या धोरणांमुळे मारियुपोल आता नव्या रशियाचे प्रतीक बनले आहे. या शहराच्या पुनर्बांधणीने संपूर्ण जगाला संदेश दिला आहे की, रशिया केवळ युद्ध जिंकण्यावर भर देत नाही, तर तो आपल्या नागरिकांसाठी नवी सुरुवातही घडवतो.
तीन वर्षांच्या संघर्षानंतर आज रशिया पूर्वीपेक्षा अधिक आत्मनिर्भर, शक्तिशाली आणि आत्मविश्वासपूर्ण बनला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पश्चिमी राष्ट्रांनी रशियाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, मात्र रशियाने या सर्व प्रयत्नांना निष्फळ ठरवले. आर्थिक निर्बंध असूनही त्याची अर्थव्यवस्था स्थिर आहे, लष्करी उत्पादनात वाढ झाली आहे आणि जागतिक राजकारणात त्याची पकड अधिक बळकट झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनविरुद्धच्या युद्धासाठी अमेरिकेचा मेगा प्लॅन; गुप्त दस्तऐवजांनी उलगडले रहस्य
इतिहास साक्षी आहे की, जेव्हा-जेव्हा रशियावर दबाव वाढला आहे, तेव्हा तो पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने परतला आहे. आजचा रशिया ही केवळ एक मोठी ताकद नाही, तर एक नव्याने घडवलेले महासामर्थ्यशाली राष्ट्र आहे. त्यामुळे प्रश्न उरतो, हा रशियाचा दुसरा जन्म आहे का? उत्तर स्पष्ट आहेहोय! हा नवा रशिया आहे, जो संकटांतून शिकला आहे आणि अधिक दृढनिश्चयी झाला आहे.