Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Bhasha Din : ‘ष’ आणि ‘श’ यांतील नेमका फरक काय ? 99 टक्के सुशिक्षितांना देखील याचं कारण माहित नसेल

मराठी भाषा बोलणारे अनेक जण आहे पण समजून उमजून बोलणारे थोडकेच. वर्षानुवर्षे मराठी बोलणाऱ्यांना देखील माहित नसावी अशी मराठी भाषेतील एक गमतीदार गोष्ट आज जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 26, 2026 | 06:04 PM
Marathi Bhasha Din : ‘ष’ आणि ‘श’ यांतील नेमका फरक काय ? 99 टक्के सुशिक्षितांना देखील याचं कारण माहित नसेल
Follow Us
Follow Us:
  • मराठी भाषेची गंमत
  • ष आणि श यांतील नेमका फरक काय ?
वळवावी तशी वळली जाणारी भाषा कोणती तर ती मराठी. कधी विनोदी तर कधी चुकीच्या उच्चाराने किंवा लिहीताना चूक झाली तर अर्थाचा अनर्थ होऊन गैरसमज देखील वाढतात बरं का? भाषेची हीच तर खरी गंमत आणि भिती सुद्धा आहे. आता हे सांगायचं कारण काय तर मराठी भाषा दिन. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कुसुमाग्रजांचा जन्मदिन. मराठी भाषा बोलणारे अनेक जण आहे पण समजून उमजून बोलणारे थोडकेच. वर्षानुवर्षे मराठी बोलणाऱ्यांना देखील माहित नसावी अशी मराठी भाषेतील एक गमतीदार गोष्ट आज जाणून घेऊयात.

शाळेत असताना प्रत्येकाला मुळाक्षरं शिकवली गेली आहेत पण आजही आपण अशी काही अक्षरं आहेत ज्यांचा उच्चार अगदी सुशिक्षित माणसं देखील चुकीचा करतात. ही अक्षरं म्हणजे ‘ष’ आणि ‘श’. या दोन्ही अक्षरांचा अर्थ वेगवेगळा जसा आहे तसंच त्यांचा उच्चार देखील वेगळा आहे. म्हणजे भाषा लिहिताना यातला ष हा पोटफोड्या ष आहे. लिहिताना तो ष असाच लिहिला जातो पण उच्चारताना मात्र या श चा उच्चार होतो. आता दोन्हीमध्ये खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. हा श म्हणजे शहामृगाचा ‘श’.

Marathi Bhasha Din : ‘मराठी भाषा गौरव दिन’ अन् ‘मराठी राजभाषा दिनात गल्लत होतेय; जाणून घ्या काय फरक आहे?

दोन्ही अक्षरांना नेमकं म्हणतात तरी काय ?


शहामृगातला ‘श’ उच्चारताना आपली जीभ टाळूला लागली जाते. याला तालव्य असं म्हणतात. तर पोटफोड्या ष उच्चारताना टाळूच्या कठीण भागाला जीभ लागते त्याला मूर्धन्य म्हणतात. श उच्चारताना तोंडावाटे निघणारा आवाज पातळ असतो तर ष उच्चारताना तोच आवाज जड होतो. श चा उच्चार हा मराठीत मोठ्या प्रमाणात वापरला जातो तर ष हे अक्षर हे संस्कृतात जास्त वापरलं जातं. एकंदरित सांगायचं झालं तर ‘श’ उच्चारताना जीभ टाळूच्या पुढच्या भागाला लागते तर ‘ष’ उच्चारताना जीभ टाळूच्या मागच्या बाजूला लागते. त्यामुळेच ‘ष’ आणि ‘श’ यांच्यात खूप जास्त फरक आहे. मग आहे की नाही मायमातीच्या भाषेची गंमत.

 

मराठी भाषा बोलताना तिचा अभ्यास तिचा इतिहास आणि त्या भाषेची गंमत कळली की ती समजण्यास देखील सोपी वाटते. हे आधीच संत ज्ञानेश्वरांनी हेरलं होतं. ज्या काळात संस्कृत शिकणं विशिष्ट समाजाच्य़ा लोकांचा हक्क समजला जायचा तिथे लोककल्याणासाठी ज्ञानोबारायांनी मराठी भाषेतून जीवनाचं सार सांगितलं. तुम्हा आम्हा सारख्या माणसांना कळावं यासाठी त्यांनी मराठीतून साहित्य लिहिलं. या मराठीचं कौतुक करताना ज्ञानोबाराया म्हणतात की, “माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके” . ज्ञानेश्वरी, अध्याय ६ मधील ही ओळ असून मराठी भाषेचा गोडवा आणि सामर्थ्य सांगणारी आहे. याचा अर्थ असा की, “माझी मराठी भाषा कौतुकाने बोलली जाणारी आहे, ती अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे” असं वर्णन संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलं.

Marathi Bhasha Din : मराठी भाषा कशी निर्माण झाली ? साहित्य ते बोलीभाषा आतापर्यंतचा मराठीचा प्रवास खूपच रंजक

 

Web Title: Marathi bhasha din marathi word difference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Marathi Bhasha Gaurav Din
  • Navrashtra
  • special stories

संबंधित बातम्या

Goa News  : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा
1

Goa News : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल
2

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?
3

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?

Chakra Upcoming Movie: पोस्टर पाहूनच अंगावर येईल काटा! ‘मृत्यूचक्र’ची रहस्यमय झलक प्रदर्शित
4

Chakra Upcoming Movie: पोस्टर पाहूनच अंगावर येईल काटा! ‘मृत्यूचक्र’ची रहस्यमय झलक प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.