Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सव्हाना गवताळ प्रदेशातील वृक्षारोपणाचे पक्षी जीवनावर संमिश्र परिणाम; संशोधकांचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष

पक्षीसमूहाची रचना मोठ्या प्रमाणावर बदलते. विशेषतः गवताळ प्रदेशाशी निगडित ‘सव्हाना-विशेष’ पक्ष्यांची संख्या घटते, तर जंगलाशी संबंधित ‘वुडलँड-विशेष’ आणि मधुरसावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांची संख्या वाढताना दिसते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 10, 2026 | 02:35 AM
सव्हाना गवताळ प्रदेशातील वृक्षारोपणाचे पक्षी जीवनावर संमिश्र परिणाम; संशोधकांचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष
Follow Us
Follow Us:

वृक्षारोपण पक्ष्यांच्या विविधतेसाठी ठरतेय परिणामकारक
15 ठिकाणी केलेल्या अभ्यासानंतर झाले स्पष्ट
गवताळ प्रदेशांच्या संवर्धनाबाबत नव्याने विचार करण्याची गरज

सुनयना सोनवणे/पुणे: महाराष्ट्रातील सव्हाना (गवताळ प्रदेश) भागात मोठ्या प्रमाणावर केले जाणारे वृक्षारोपण हे पक्ष्यांच्या विविधतेसाठी संमिश्र परिणाम करणारे ठरत असल्याचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील (Navarashtra Special) पुणे आणि सातारा जिल्ह्यातील एकूण १५ ठिकाणांवर केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे. ‘कंझर्व्हेशन सायन्स अँड प्रॅक्टिस’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनामुळे गवताळ प्रदेशांच्या संवर्धनाबाबत नव्याने विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

सव्हाना सायन्स फाउंडेशन, फर्ग्युसन महाविद्यालयातील प्राणीशास्त्र व पर्यावरण विज्ञान विभाग, सिम्बायोसिस सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी तसेच मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी (यूएसए) येथील सिद्धांत म्हेत्रे, प्रभव बनारा, यश गायकवाड, आर्यन देओरे, आविष्कार मुंजे आणि आशिष नेरलेकर या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

अभ्यासानुसार, नैसर्गिक गवताळ प्रदेशांचे वृक्षलागवडीत रूपांतर केल्यास पक्ष्यांची एकूण संख्या किंवा प्रजातींची संख्या फारशी बदलत नाही. मात्र, पक्षीसमूहाची रचना मोठ्या प्रमाणावर बदलते. विशेषतः गवताळ प्रदेशाशी निगडित ‘सव्हाना-विशेष’ पक्ष्यांची संख्या घटते, तर जंगलाशी संबंधित ‘वुडलँड-विशेष’ आणि मधुरसावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांची संख्या वाढताना दिसते.

घरातील वातावरणात सकारात्मक आणि आनंदी ठेवण्यासाठी गॅलरीमध्ये लावा ‘या’ फुलांची झाडे, मन राहील ताजेतवाने

संशोधकांनी ४५९ ते १००७ मिमी पर्जन्यमान असलेल्या भागांचा अभ्यास केला. त्यातून असे दिसून आले की, मध्यम पर्जन्यमानाच्या (५६०-९२० मिमी) प्रदेशात वृक्षारोपणामुळे पक्षीविविधता सर्वाधिक घटते. याउलट, अतिशय कोरड्या किंवा अतिशय ओल्या भागांत वृक्षलागवड काही प्रमाणात ‘पूरक अधिवास’ म्हणून कार्य करू शकते.

विशेष म्हणजे, गिरिपुष्प या सारख्या परदेशी वृक्षांच्या लागवडीमुळे सूर्यपक्ष्यांसारख्या मधभक्षी पक्ष्यांची संख्या वाढल्याचेही आढळले आहे. मात्र, या प्रक्रियेमुळे गवताळ प्रदेशातील मूळ जैवविविधतेवर परिणाम होऊन परिसंस्थेचे स्वरूप बदलत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

मुख्य निष्कर्ष 
– एकूण पक्षीसंख्या आणि प्रजाती विविधतेत लक्षणीय बदल नाही.
– मध्यम पर्जन्यमान पट्ट्यात वृक्षारोपणामुळे विविधता घटते.
– सव्हाना-विशेष पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी.
– वुडलँड-विशेष व मधभक्षी पक्ष्यांची संख्या वाढ.
– पक्षीसमूहाची रचना पूर्णपणे बदलते.

ऐतिहासिक पार्श्वभूमीही कारणीभूत
भारतातील गवताळ प्रदेशांना पूर्वी ‘उजाड जमीन’ म्हणून चुकीची वागणूक देण्यात आली. औपनिवेशिक काळात लाकूड उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व नंतर वृक्षलागवड करण्यात आली. स्वातंत्र्यानंतरही उत्पादनवाढ, ग्रामीण विकास आणि पर्यावरणीय पुनरुज्जीवनाच्या नावाखाली हीच धोरणे पुढे चालू राहिली. या काळात गिरिपुष्प सारख्या परदेशी प्रजातींची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. १९१६ साली श्रीलंकेतून भारतात आलेली ही प्रजाती सुरुवातीला शोभेच्या झाडासाठी वापरली जात होती; मात्र नंतर ती कृषिवनशेती आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षलागवडीचा भाग बनली. पश्चिम महाराष्ट्रात तिचा प्रसार लक्षणीयरीत्या वाढला आहे.

Pune शहरात 57 लाख झाडांची नोंद; तरी सावली ‘शोभेची’च! हवा शुद्ध करणाऱ्या देशी….

संवर्धनासाठी दिशा 
संशोधकांच्या मते, गवताळ प्रदेशांचे संवर्धन करताना एकतर्फी वृक्षलागवडीऐवजी संतुलित आणि स्थानिक परिस्थितीनुसार धोरणे आवश्यक आहेत.
– नैसर्गिक सव्हाना प्रदेशात अनियंत्रित वृक्षारोपण टाळणे गरजेचे
– विद्यमान वृक्षलागवडीचे सूक्ष्म व्यवस्थापन करणे आवश्यक
– ‘मिश्र अधिवास’निर्माण करणे अधिक उपयुक्त

“गवताळ प्रदेश पृथ्वीवरील सुमारे २०% भूभाग व्यापतात आणि ते जैवविविधतेचे मोठे केंद्र आहेत. तरीही, वनसंवर्धनाच्या तुलनेत त्यांना कमी महत्त्व दिले जाते. कार्बन संकटावर उपाय म्हणून वृक्षलागवडीला प्रोत्साहन देताना गवताळ परिसंस्थांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.”
— सिद्धांत म्हेत्रे, संशोधक

Web Title: Mixed impact of tree plantation in savannah grasslands on birdlife important findings of pune researchers navarashtra special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • environment
  • navarashtra special
  • pune news

संबंधित बातम्या

Right To Know: लोकशाही बळकट करणारा आणि नागरिकांना सक्षम बनवणारा आंतरराष्ट्रीय दिवस; जाणून घ्या याचे मूळ उद्देश आणि महत्त्व
1

Right To Know: लोकशाही बळकट करणारा आणि नागरिकांना सक्षम बनवणारा आंतरराष्ट्रीय दिवस; जाणून घ्या याचे मूळ उद्देश आणि महत्त्व

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?
2

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा कहर! लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबलची नोंद; COEP चा अहवाल समोर
3

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा कहर! लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबलची नोंद; COEP चा अहवाल समोर

Google Foundation Day :  एका गॅरेजमधून सुरू झालेली ‘गुगल’ कशी बनली जागतिक टेक महासत्ता? 27 सप्टेंबर वर्धापन दिन विशेष वृत्त
4

Google Foundation Day : एका गॅरेजमधून सुरू झालेली ‘गुगल’ कशी बनली जागतिक टेक महासत्ता? 27 सप्टेंबर वर्धापन दिन विशेष वृत्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.