Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra Politics- अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने बिनविरोधची शक्यता धूसर झाली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 09, 2026 | 11:35 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:
  • 09 Apr 2026 12:00 PM (IST)

    09 Apr 2026 12:00 PM (IST)

    1200 शिक्षकांना ‘DCPC’ योजना, BMC कडून परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे परिपत्रक जारी

    मुंबई महापालिकेतील माध्यमिक शाळांमधील १२०० शिक्षकांना शिक्षक नेते अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्यामुळे न्याय मिळाला असून शिक्षकांच्या ‘परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन’ (डीसीपीएस) योजनेचे परिपत्रक मुंबई मनपाने निर्गमित केले आहे. मुंबई मनपाच्या संपूर्ण मुंबईमध्ये २५१ माध्यमिक शाळा असून त्यापैकी ५१ शाळा अनुदानित व २०० शाळा विनाअनुदानित आहेत. अनुदानित शाळांसाठी शासन अनुदान देते व विनाअनुदानित शाळा मनपा स्वखर्चाने चालवते. या शाळांमध्ये जवळपास १५०० शिक्षक कार्यरत असून सन २००८ पासून सर्व शिक्षक आपले काम जबाबदारीने पार पाडत आहेत.

  • 09 Apr 2026 11:50 AM (IST)

    09 Apr 2026 11:50 AM (IST)

    १५ हजार कोटींचा निधी आणि कमिशनचा खेळ? कुंभमेळा टेंडरमध्ये गिरीश महाजनांचा उल्लेख

    राज्य आणि केंद्र सरकारने नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १५,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या रकमेपैकी काही हजार कोटी रुपये आधीच मिळाले आहेत.

  • 09 Apr 2026 11:40 AM (IST)

    09 Apr 2026 11:40 AM (IST)

    धक्कादायक घटना! वॉटर पार्कमधील निष्काळजीपणामुळे महिलेचे अर्धे शरीर निकामी; गुन्हा दाखल

    पुण्यातील शिरूर तालुक्यात वॉटर पार्कमध्ये स्लाइडवरून घसरताना कमी पाण्यामुळे 37 वर्षीय महिलेचा भीषण अपघात झाला. पाठीच्या मणक्याचे चार तुकडे होऊन अर्धे शरीर निकामी झाले. निष्काळजीपणाप्रकरणी गुन्हा दाखल.

  • 09 Apr 2026 11:35 AM (IST)

    09 Apr 2026 11:35 AM (IST)

    ‘दुसरे गांधी’ अण्णा हजारेंचा निर्धार यशस्वी; लोकपाल आंदोलनाचा शेवट गाजला, जाणून घ्या 09 एप्रिलचा इतिहास

    आण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे सरकारवर लोकपाल विधेयक आणण्याचा दबाव वाढला आणि भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती झाली. अण्णा हजारे यांच्या या आंदोलनाने देशातील जनतेला एकत्र आणले

  • 09 Apr 2026 11:30 AM (IST)

    09 Apr 2026 11:30 AM (IST)

    बाहेरची औषधे लिहिल्यास डॉक्टरांवर होणार कारवाई! सरकारी रुग्णालयांतूनच औषध देण्याचे वैद्यकीय अधिष्ठातांना स्पष्ट निर्देश

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या डॉक्टरांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. रुग्णालयात औषधे उपलब्ध असतानाही बाहेरील प्रिर्सक्रप्शन देण्याच्या प्रकारांवर राज्य सरकारने लगाम घालण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने सर्व अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

  • 09 Apr 2026 11:20 AM (IST)

    09 Apr 2026 11:20 AM (IST)

    नेपाळमध्ये भारतीय पर्यटकाला रस्त्यावर थुंकणं पडलं महागात; स्थानिकाने भरस्त्यात साफ करुन घेतला गुटख्याचा डाग, VIDEO VIRAL

    सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतके संतापजनक असतात की पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. सध्या असाच एक संतापजनक कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय पर्यटकांनी नेपाळमध्ये केलेल्या घाणरेड्या कृत्यामुळे पुन्हा एकदा देशाची प्रतिमा खराब झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • 09 Apr 2026 11:10 AM (IST)

    09 Apr 2026 11:10 AM (IST)

    नाशिकमधील आयटी पार्कमध्ये ‘धर्मांतर रॅकेट’? ८ तरुणींवर अत्याचार आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न

    या कंपनीत जवळपास २०० कर्मचारी काम करतात. सर्व पीडिता पदवीधर, उच्च पदवीधर असून, त्यांना फारतर १८ ते २२ हजार रुपयापर्यंत वेतन मिळते. या घटनेतील एका युवतीने एचआरकडे लेखी तक्रार केली होती.

  • 09 Apr 2026 10:56 AM (IST)

    09 Apr 2026 10:56 AM (IST)

    ‘समजूतदारीने खेळले असते तर…’, Axar Patel ने कोणाच्या डोक्यावर फोडले खापर?

    IPL 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला विजयांची हॅटट्रिक साधता आली नाही. बुधवारी अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या हंगामातील १४ व्या सामन्यात, डीसीला गुजरात टायटन्सकडून १ धावेने निसटता पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २१० धावा केल्या. दिल्लीला शेवटच्या दोन चेंडूंवर दोन धावांची गरज होती, पण त्यांना पराभव पत्करावा लागला.

    गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये अगदी शेवटपर्यंत सामना रंगला आणि दिल्लीला केवळ १ धावाने सामना गमवावा लागला. मिलरच्या एका चुकीमुळे दिल्लीला विजयाची हॅटट्रीक साधता आली नाही. एक वेळ अशी होती की, दिल्ली सामना गमावणार हे निश्चित होते मात्र तरीही दिल्लीच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत सामना खेचून आणला होता. मात्र क्रिकेट हा खेळ अनिश्चित असतो आणि कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यानुसारच अगदी शेवटपर्यंत रंगलेल्या या खेळात गुजरात टायटन्सने यश प्राप्त केले. याबाबत प्रेझेंटेशनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कप्तान अक्षर पटेलने आपले स्पष्ट मत मांडले, जाणून घ्या.

  • 09 Apr 2026 10:46 AM (IST)

    09 Apr 2026 10:46 AM (IST)

    ‘भाजीत केस’ कारण ठरलं जीवावर! रात्रभर निर्दयी मारहाण, 25 वर्षीय महिलेने संपवले आयुष्य

    छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवतांना भाजीत केस निघाला म्हणून निर्दयी पतीने आपल्या २५ वर्षीय पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्यांनतर पती आणि सासरच्याछळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. ईश्वरी बनकर (वय २५) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

  • 09 Apr 2026 10:36 AM (IST)

    09 Apr 2026 10:36 AM (IST)

    दोघांचे भांडण तिसऱ्याला लाभ! इराणमधील युद्धविरामानंतर Gautam Adani ना लॉटरी

    पश्चिम आशियातील शस्त्रसंधीमुळे बुधवारी शेअर बाजारात मोठी तेजी आली. बीएसई सेन्सेक्स २,९०० हून अधिक अंकांनी वधारला, ज्यामुळे गुंतवणूकदारांना १७ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा औद्योगिक समूह असलेल्या अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये व्यवहारादरम्यान १३% वाढ झाली, ज्यामुळे ग्रुपच्या बाजार भांडवलात ९६,००० कोटी रुपयांची वाढ झाली. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या निव्वळ संपत्तीत ६.०६ अब्ज डॉलर्स किंवा अंदाजे ५६,००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

  • 09 Apr 2026 10:26 AM (IST)

    09 Apr 2026 10:26 AM (IST)

    धक्कादायक ! आयटी कंपनीतच धर्मांतरण; अत्याचाराचा गुन्हाही दाखल, पोलिसांकडून तपास सुरु

    एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणाऱ्या आठ तरुणींसोबत जवळीक साधून एकीवर अत्याचार तिच्यासह एका तरुणाचे बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही घटना इंदिरानगर परिसरातील आयटी पार्कमधील कंपनीत झाली. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांसह कंपनीच्या एचआर असलेल्या महिलेलाही आरोपी केले असून, राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच अशाप्रकारे बहुराष्ट्रीय कंपनीतील गंभीर प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

  • 09 Apr 2026 10:16 AM (IST)

    09 Apr 2026 10:16 AM (IST)

    खाकी वर्दीचा बनाव, AI चा वापर, प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलांची फसवणूक; आरोपी गजाआड

    नाशिक येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून, खाकी वर्दीचा बनाव करून महिलांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने स्वतःचे पोलीस गणवेशातील बनावट फोटो तयार करून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी गजाआड केल्याचे समोर आले आहे.

  • 09 Apr 2026 10:07 AM (IST)

    09 Apr 2026 10:07 AM (IST)

    रणवीर सिंगच्या चित्रपटाची धडाकेबाज कामगिरी; चित्रपटाने गाठला कोटींचा टप्पा

    बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा चित्रपट ‘धुरंधर: द रिव्हेंज’ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. ‘धुरंधर’च्या यशानंतर, निर्मात्यांनी १९ मार्च रोजी ‘धुरंधर: द रिव्हेंज’ प्रदर्शित केला. तेव्हापासून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. केवळ सात दिवसांत हा चित्रपट जगभरात ₹१,००० कोटींची कमाई करेल, याची निर्मात्यांना कल्पनाही नव्हती. आता पाहूया, रणवीर सिंगच्या या चित्रपटाने २१ दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपये कमावले आहेत.

  • 09 Apr 2026 09:55 AM (IST)

    09 Apr 2026 09:55 AM (IST)

    भोंदू अशोक खरातकडून भक्तांनाच बनावट अधिकारी बनवून कोट्यवधींची लूट

    नाशिक: महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी कारागृहात असलेल्या भोंदू बाबा अशोक खरातच्या कारनाम्यांचे एकापेक्षा एक धक्कादायक खुलासे होत आहेत. खरातने चक्क 'स्पेशल २६' चित्रपटाचा आधार घेत आपल्याच भक्तांची फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या १३२ बनावट बँक खात्यांच्या चौकशीतून हा नवा पैलू उघड झाला आहे. खरात आपल्या काही विश्वासातील भक्तांना बनावट 'इन्कम टॅक्स अधिकारी' बनवायचा. हे बनावट अधिकारी खरातच्याच इतर श्रीमंत भक्तांच्या घरी किंवा कार्यालयावर धाड टाकल्याचा बनाव करायचे. भीतीचे वातावरण निर्माण करून मग 'आर्थिक तडजोडी'चा खेळ सुरू व्हायचा.

  • 09 Apr 2026 09:50 AM (IST)

    09 Apr 2026 09:50 AM (IST)

    पुणे रेल्वेचा 'मास्टर प्लॅन'! मांजरी स्थानकाचा कायापालट होणार 

    पुणे: पुणे शहरातील रेल्वे वाहतुकीचा वाढता ताण आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुणे रेल्वे विभागाने दोन मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. पुणे-दौंड मार्गावरील मांजरी स्थानकाचा दर्जा वाढवण्याचा आणि पुणे-मिरज मार्गावर रामटेकडी येथे नवीन 'ब्लॉक स्टेशन' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे गाड्यांच्या विलंबाची समस्या सुटणार असून रेल्वेच्या वक्तशीरपणात सुधारणा होणार आहे.

    सध्या मांजरी हे केवळ एक 'हाल्ट' (Flag Station) असून तिथे फक्त डेमू गाड्या थांबतात. आता या स्थानकाचा समावेश 'B' कॅटेगरीमध्ये केला जाणार आहे.सध्या हडपसर ते लोणी या १२ किमीच्या अंतरात एकावेळी एकच गाडी धावू शकते. मांजरी स्थानकाच्या अपग्रेडेशनमुळे या अंतराचे ६-६ किमीच्या दोन भागांत विभाजन होईल. यामुळे एकाच वेळी दोन गाड्या या मार्गावरून धावू शकतील, परिणामी गाड्यांची वारंवारता (Frequency) वाढेल.

  • 09 Apr 2026 09:45 AM (IST)

    09 Apr 2026 09:45 AM (IST)

      शेअर बाजार गुंतवणुकीच्या बहाण्याने ७५ वर्षीय ज्येष्ठाला १२.३१ कोटींचा गंडा

    पुणे: पुण्यातील हडपसर (Hadapsar) परिसरात सायबर फसवणुकीची एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेअर बाजारात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी ७५ वर्षीय निवृत्त व्यावसायिकाची तब्बल १२ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. तक्रारदारांना जानेवारी महिन्यात एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप मेसेज आला होता. त्यात "शेअर बाजारात गुंतवणूक करा आणि भरघोस परतावा मिळवा," असे आमिष दाखवण्यात आले होते.

  • 09 Apr 2026 09:45 AM (IST)

    09 Apr 2026 09:45 AM (IST)

    बारामती पोटनिवडणूक: अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस 

    बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत असून, ही निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची लढत रंगणार, याचे चित्र आज स्पष्ट होईल. दरम्यान, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला माघार घेण्याचे आवाहन केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून विनंती केली आहे. यापूर्वीही त्यांनी सपकाळ यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष आपले उमेदवार आकाश मोरे यांचा अर्ज मागे घेणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

  • 09 Apr 2026 09:40 AM (IST)

    09 Apr 2026 09:40 AM (IST)

    Assembly Elections : केरळ, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात

    नवी दिल्ली : दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता उर्वरित काही राज्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यात आसाम आणि केरळ या दोन राज्यांमध्ये आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

    आसाममधील १२६, केरळमधील १४० आणि पुदुचेरीमधील ३० जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. आसाम विधानसभा निवडणुकीत एकूण ७२२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई, विरोधी पक्षनेते देबब्रता सैकिया, एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल, रायझर दलचे नेते अखिल गोगोई आणि एजेपीचे अध्यक्ष लुरिंज्योती गोगोई यांसारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.

  • 09 Apr 2026 09:35 AM (IST)

    09 Apr 2026 09:35 AM (IST)

    Akola Crime: अकोल्यात क्रूर हत्याकांड! ८ दिवसांच्या बाळाच्या आईची गळा दाबून हत्या

    अकोला: अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडला त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवणे मोठे आवाहन होते. मात्र पोलिसांनी या घटनेची सखोल तपासणी करत या प्रकरणाचा उलगडा केला.

  • 09 Apr 2026 09:32 AM (IST)

    09 Apr 2026 09:32 AM (IST)

    US Iran Ceasefire : इराणचा प्रस्ताव थेट कचऱ्यात! ट्रम्प यांचे सूर पुन्हा बदलले

    Trump Rejects Iran’s 10 Point Proposal : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण युद्धविरामाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराणने सादर केलेला १० कलमी प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी फेटाळून लावला आहे. व्हाईट हाऊसने इराणच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे दोन आठवड्यांचा युद्धविराम धोक्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इस्रायलचे लेबनॉनवरही हल्ले सुरुच आहे. यामुळे तणाव वाढला असून इराणने हल्ले थांबले नाही तर युद्धविराम कारारतून बाहेर पडू असा इशारा दिला होता. यामुळे पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.

Maharashtra to World Breaking News:  आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे

Maharashtra Politics : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला

पुणे : महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. बारामती उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये दाखल झालेल्या ५९ अजर्जापैकी ५३ अर्ज वैध ठरले आहेत, तर ६ अर्ज फेटाळण्यात आले. आज, गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, नेमके किती उमेदवार माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती व राहुरीत २३ रोजी मतदान होणार असून, निकाल ४ मे रोजी आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी उमेदवार न देता या निवडणुकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काँग्रेसने अचानक आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर करून ‘जातीय कार्ड’ खेळले आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यापुढील आव्हान वाढले असून, ही लढत आता वाटते तितकी सोपी राहिलेली नाही.

Web Title: Maharashtra desh videsh live news 9th april breaking news politics economy top news live blog marathi breaking news maharashtra political news economice entertainment ipl 2026 live

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • national news
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला; उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
1

Maharashtra Politics : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला; उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

मुंबईकरांना कोकणी हापूसची मेजवानी! गिरगाव चौपाटीवर २४ एप्रिलपासून ‘मँगो फेस्टिव्हल’ व ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शन
2

मुंबईकरांना कोकणी हापूसची मेजवानी! गिरगाव चौपाटीवर २४ एप्रिलपासून ‘मँगो फेस्टिव्हल’ व ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शन

Mumbai News : आदिवासी विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी! गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार
3

Mumbai News : आदिवासी विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी! गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार

SNDT विद्यापीठात विद्यार्थिनींच्या संख्येत वाढ; मुलींसाठी शुल्कमाफीचा निर्णय ठरला लक्षवेधी
4

SNDT विद्यापीठात विद्यार्थिनींच्या संख्येत वाढ; मुलींसाठी शुल्कमाफीचा निर्णय ठरला लक्षवेधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.