Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघोली पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; धक्कादायक कारणही समोर

आयटी क्षेत्रातील तरुणी-तरुणीला मध्यरात्री पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडून धमकावून पैसे उकळल्याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यातील तीन पोलिसांचे एकाचवेळी तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 09, 2026 | 01:35 PM
सातारा पोलिस दलात बदल्यांचा मोठा फेरबदल; सहा नवे निरीक्षक जिल्ह्यात दाखल, आयजींचे आदेश

सातारा पोलिस दलात बदल्यांचा मोठा फेरबदल; सहा नवे निरीक्षक जिल्ह्यात दाखल, आयजींचे आदेश

Follow Us
Follow Us:
  • पोलिस दलात खळबळ
  • तीन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन
  • धक्कादायक कारणही समोर
पुणे : आयटी क्षेत्रातील तरुणी-तरुणीला मध्यरात्री पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडून धमकावून पैसे उकळल्याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यातील तीन पोलिसांचे एकाचवेळी तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांना सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी देऊन पैसे घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, दहा हजार रुपये फोन पेद्वारे घेतले होते.

 

पोलिस हवालदार किरण अब्दागिरे, पोलिस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी निलंबीत केलेल्या पोलिसांची नावे आहेत. परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. अब्दागिरे, खाडे आणि कांबळे हे तिघे वाघोली पोलिस ठाण्यात नेमणूकीस आहेत. गेल्या आठवड्यात (दि. २ एप्रिल) खाडे आणि कांबळे हे दोघे वाघोली गावठाण बिट मार्शल म्हणून कर्तव्यावर होते.

दरम्यान, रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास त्यांना नियंत्रण कक्षाकडून (डायल ११२) कॉल आला की, वाघोलीतील एका सोसायटीत काही मुले रुमवर राहतात आणि मुली आणून व्हिडीओ तयार करतात. त्यानुसार खाडे आणि कांबळे हे दोघे तेथे गेले. तेथील एका २४ वर्षीय तरुणाला घेऊन हे दोघे पोलिस ठाण्यात आले. त्या रात्री ठाणे अंमलदार म्हणून अब्दागिरे हे कर्तव्यावर होते. कॉलच्या अनुषंगाने जर असा काही प्रकार होता तर, योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे होते. मात्र तिघांनी अशी कोणतीच कार्यवाही केली नाही. उलट अब्दागिरे यांनी तरुण-तरुणीला तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सेक्स रॅकेटमध्ये अडकवितो, तुमची नोकरी घालवितो, नातेवाईकांना बोलावून घेतो अशा धमक्या दिल्या. तर खाडे याने तरुणाला हाताने चापटा मारल्या.

पोलिस दलात खळबळ

तिघा पोलिसांनी पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला आहे. त्यानंतर या दोघा आयटी अभियंता तरुण-तरुणीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे धाव घेत तक्रार केली. प्राथमिक चौकशीत या तिन पोलिसांचा रात्रीचा कारनामा समोर आला. त्यानंतर आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

हे सुद्धा वाचा : खळबळजनक ! 10 वर्षांच्या बालिकेवर 52 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; चॉकलेटचे आमिष दाखवत घरी नेलं अन् नंतर…

Web Title: Three policemen from wagholi police station have been suspended abruptly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.