राज्याच्या विद्यमान पसुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे यांची आज महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात मोठी ओळख निर्माण झाली आहे. पंकजा मुंडे या भारताच्या एक प्रसिद्ध राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनीदेखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकीय प्रवास सुरू केला आणि आज भारताच्या राजकारणात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरात पंकजा मुंडे यांचा जन्म २६ जुलै १९७९ रोजी झाला. मंत्रीपदापूर्वी त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारीदेखील सांभाळली आहे. सध्या त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री म्हणून काम पाहत आहेत.
Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धात भारताने किती खर्च केला; सर्वाधिक नुकसान कुणाचे?
पंकजा मुंडे यांनी अमेरिकेतून शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर त्यांनी एमबीएदेखील केले. पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे योगदान दिले आहे. पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात ग्रामीण विकास, महिला आणि बाल कल्याण मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीव्यतिरिक्त, त्यांनी साखर कारखाना आणि बँकिंगमध्येही काम केले आहे. २०१७ मध्ये, त्यांच्या नेतृत्व क्षमतेसाठी त्यांना ‘द पॉवरफुल पॉलिटिशियन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२००९ मध्ये, त्या परळी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या. २०१२ मध्ये, पंकजा मुंडे यांनी भाजपची युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) च्या प्रदेशाध्यक्षा म्हणून काम पाहिले. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी, त्यांनी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांना ग्रामीण विकास, महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. पंकजा मुंडे यांना प्रज्ञा मुंडे आणि यशश्री मुंडे या दोन बहिणी देखील आहेत. यशश्री मुंडे यांनी अलिकडेच बँक निवडणुकीद्वारे राजकारणात प्रवेश केला आहे. पंकजा ही प्रमोद महाजन यांची भाची आणि राहुल महाजन आणि पूनम महाजन यांची चुलत बहीण आहे. अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे त्यांचे चुलत बंधू आहेत.
MBBS डॉक्टरने बाबा रामदेवांसमोर जोडले हात, शुगर झाली ‘एकदम ओके’, कसा मिळाला फायदा?
२०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या अपघातानंतर त्यांनी त्यांच्या सामाजिक व राजकीय वारशाचे उत्तरार्ध स्व-प्रेरणादायीपणे सांभाळले, जसे की ‘गोपीनाथ गड’ मेमोरियलची स्थापना केली. २०१९ विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी हरवले, त्यानंतर दोन भाऊ–बहिणींमधील राजकीय मतभेद राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रमुख चर्चेचा विषय ठरला. २०२४ लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पुढे आले, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांनी त्यांना फक्त ६,५५३ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यानतंर १२ जुलै २०२४ रोजी पंकजा मुंडे महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या. सध्या त्या राष्ट्रीय सचिव (भाजप) आणि मध्य प्रदेशच्या प्रभारी पदावर देखील आहेत
पंकजा मुंडे यांना साखर कारखाना उद्योग व बँकिंग क्षेत्रात ‘बिझनेस वुमन’ म्हणूनही ओळखले जाते. वैद्यनाथ साखर कारखान्याच्या त्या चेअरमन देखील आहेत. हे. विविध कंपन्यांमध्ये त्यांची व त्यांच्या कुटुंबाची गुंतवणूक आहे. महिला सशक्तीकरणासाठी बचतगटांच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण व रोजगार संदर्भातील योजना चालवल्या आहेत. तसेच त्यांच्या ‘लेक वाचवा’आणि ‘माझी कन्या भाग्यश्री’ यासारख्या सामाजिक प्रकल्पांमध्येही त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.