
pentagon releases new ufo files nasa audio recordings trump uap disclosure
Pentagon releases 72 new UFO files 2026 : अंतराळ, परग्रहवासी (Aliens) आणि उडत्या तशकाऱ्या (UFO) या विषयांबद्दल जगभरात नेहमीच प्रचंड उत्सुकता राहिलेली आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणातून आणि विज्ञान जगतातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट आदेशानंतर, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (Pentagon) अज्ञात उडणाऱ्या वस्तू अर्थात यूएफओ (ज्याला आता अधिकृत भाषेत Unidentified Anomalous Phenomena किंवा UAP म्हटले जाते) संदर्भातील अनेक गुप्त फायली सार्वजनिक केल्या आहेत. पेंटागॉनने प्रसिद्ध केलेल्या या तिसऱ्या ट्रॅन्च (Tranche 03) म्हणजेच दस्तऐवजांच्या संचामध्ये ७२ नवीन गुप्त फायलींचा समावेश आहे. यामध्ये केवळ लष्करीच नव्हे, तर नासा (NASA), सीआयए (CIA) आणि एफबीआय (FBI) कडील अत्यंत दुर्मिळ व्हिडिओ, छायाचित्रे आणि ऑडिओ रेकॉर्डिंगचा समावेश आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच आपल्या प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले होते की, अमेरिकन सरकारला परग्रहवासी आणि यूएफओबद्दल जी काही माहिती आहे, ती कोणतीही लपवाछपवी न करता संपूर्ण पारदर्शकतेसह जगासमोर आणली जावी. ट्रम्प यांच्या या ‘PURSUE’ (Presidential Unsealing and Reporting System for UAP Encounters) मोहिमेमुळे आतापर्यंत अनेक धक्कादायक गोष्टी जगासमोर आल्या आहेत. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनीही या ऐतिहासिक पावलाचे स्वागत केले असून, ट्रम्प प्रशासन हे जनतेला सत्य सांगण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. या सरकारी डेटाची विश्वासार्हता एवढी आहे की, अधिकृत वेबसाइट लाँच झाल्यापासून जगभरातून कोट्यवधी लोकांनी या फायली पाहिल्या आहेत.
🚨WATCH: Third UFO file drop just hit and it’s HUGE! 1948 Navy memo warned of flying discs on a “cycle of reappearance.” This is declassified proof Our Chief White House Correspondent Gary Franchi Reports @nextnews @TrumpDailyPosts pic.twitter.com/MOrYof1IHW — Commentary Donald J. Trump Posts From Truth Social (@TrumpDailyPosts) June 13, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Ban: ‘जग आता सुरक्षित आहे’ ट्रम्प-नेतान्याहू यांचा इराणच्या अणू महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम; आखाती देशांत येणार नवे युग
यापूर्वी अमेरिकन सरकारने जे व्हिडिओ किंवा माहिती प्रसिद्ध केली होती, ती प्रामुख्याने लढाऊ विमानांच्या वैमानिकांनी किंवा लष्करी रडारने रेकॉर्ड केलेली होती. परंतु, यावेळी पेंटागॉनने जे ६ नवीन व्हिडिओ जारी केले आहेत, त्यातील बहुतांश व्हिडिओ हे थेट सामान्य नागरिकांनी (Civilian Eyewitnesses) आपल्या आयफोन (iPhone) किंवा इतर स्मार्टफोन कॅमेऱ्यांमध्ये कैद केलेले आहेत. हे सर्व व्हिडिओ २०२१ ते २०२५ दरम्यान अमेरिकेच्या ईशान्येकडील (Northeastern US) एकाच भौगोलिक पट्ट्यात चित्रित करण्यात आले आहेत. संरक्षण विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव अचूक ठिकाणे जाहीर केली नसली, तरी वेगवेगळ्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीमध्ये प्रचंड साम्य आहे.
यातील सर्वात आश्चर्यकारक व्हिडिओ जुलै २०२५ मधील आहे, जो एका नागरिकाने रात्रीच्या वेळी आपल्या घराबाहेर गाडी पार्क करताना शूट केला होता. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या गडद आकाशात दोन अत्यंत तेजस्वी वस्तू (Orbs) कोणत्याही आवाजाशिवाय, अतिशय संथ आणि गुळगुळीत गतीने फिरताना दिसत आहेत. एफबीआयने जेव्हा या प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, हे दोन्ही प्रकाशगोल एकमेकांशी जोडलेले असल्यासारखे एका विशिष्ट रचनेत (Formation) प्रवास करत होते आणि नंतर ते अचानक एकमेकांमध्ये विलीन झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ras Laffan : इराण-कतार गुप्त डील अपयशी! जागतिक ऊर्जा बाजारपेठ हादरवण्याचा मोठा कट उघड; कतारचा ‘तो’ दावा अन् इराणचा थेट हल्ला
दुसरा एक थरारक व्हिडिओ ऑक्टोबर २०२४ मधील असून, तो पहिल्या घटनेच्या ठिकाणापासून अवघ्या ४० किलोमीटरच्या परिघात रेकॉर्ड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये एका शांत तलावाच्या पाण्यावर अगदी थोड्या उंचीवर एक अवाढव्य तेजस्वी वस्तू हवेत तरंगताना स्पष्टपणे दिसत आहे. पेंटागॉनच्या ऑल-डोमेन अॅनोमली रिझोल्यूशन ऑफिसच्या (AARO) अधिकाऱ्यांच्या मते, प्रत्यक्षदर्शींनी या वस्तूचे वर्णन करताना सांगितले की, तो एक ‘प्लाझ्मासारखा दिसणारा गोळा’ (Plasma-like sphere) होता, ज्याची चमक आणि आकार सातत्याने बदलत होता. काही वेळा तर त्या मुख्य मोठ्या प्रकाशातून छोटे-छोटे प्रकाशाचे बिंदू बाहेर पडत होते, जणू काही एखाद्या मोठ्या बास्केटबॉलमधून द्राक्षाचे दाणे बाहेर पडावेत. ती गूढ वस्तू अदृश्य होण्यापूर्वी तब्बल ४५ मिनिटे एकाच जागी स्थिर हवेत तरंगत होती.
लष्कराच्या काही विश्लेषकांनी असा अंदाज वर्तवला होता की, हिवाळ्यात डोंगरावरील बर्फावरून परावर्तित झालेला सूर्याचा प्रकाश ढगांवर पडल्यामुळे असा भास झाला असावा. परंतु, प्रत्यक्षदर्शींनी हा दावा फेटाळून लावला असून त्या दिवशी आकाश पूर्णपणे निरभ्र होते आणि तिथे कोणताही ढग नव्हता, असे सांगितले. त्यामुळे सरकारने अजूनही या केसला ‘अनरिजॉल्व्हड’ (Unresolved Case) म्हणजेच न उगलडलेले रहस्य म्हणून घोषित केले आहे.
या ७२ फायलींच्या खजिन्यामध्ये ५३ अत्यंत गुप्त कागदपत्रे, १० छायाचित्रे आणि ३ ऑडिओ क्लिप्सचा समावेश आहे, ज्या थेट नासा (NASA) कडून मिळाल्या आहेत. या ऑडिओ क्लिप्समध्ये १९६० आणि १९७० च्या दशकातील प्रसिद्ध अपोलो (Apollo) आणि जेमिनी (Gemini) अंतराळ मोहिमेदरम्यानच्या अंतराळवीरांच्या संभाषणाचे अंश आहेत. एका जुन्या रेकॉर्डिंगमध्ये अंतराळवीर अंतराळातून पृथ्वीकडे पाहताना अचानक काही विचित्र, निऑन सायन्ससारख्या चमकणाऱ्या आणि नागमोडी गतीने धावणाऱ्या प्रकाशरेषांबद्दल नियंत्रण कक्षाला माहिती देताना स्पष्ट ऐकू येत आहेत.
याशिवाय, या फायलींमध्ये १९५२-५३ मधील सीआयएच्या (CIA) एका अत्यंत गुप्त वैज्ञानिक सल्लागार समितीचा (Scientific Advisory Panel on UFOs) अहवालही समोर आला आहे. या अहवालात तत्कालीन अधिकाऱ्यांनी शिफारस केली होती की, यूएफओ किंवा उडत्या तशकाऱ्यांच्या मुद्द्यावरून जनतेमध्ये भीती किंवा अंधश्रद्धा पसरू नये, म्हणून सरकारने अधिकृतपणे या विषयाचे ‘डीबंकिंग’ (Debunking – म्हणजे या केवळ अफवा आहेत असे सांगून विषय दाबणे) करावे. शत्रू देश या राष्ट्रीय मानसिकतेचा गैरफायदा घेऊ शकतात, अशी भीती तेव्हा वर्तवण्यात आली होती. मात्र, आता ट्रम्प प्रशासनाने ही दशकांची जुनी लपवाछपवी संपवून सर्व डेटा थेट जनतेच्या हाती सोपवला आहे, ज्यामुळे परग्रहावर जीवन आहे की नाही, याच्या संशोधनाला गती मिळणार आहे.