Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात उभं राहतंय ‘पक्ष्यांचं गाव’! ‘या’ गावाने निर्माण केला पर्यावरण संवर्धनाचा आदर्श

स्वराज्यकालीन वारसा लाभलेल्या या गावाने आता निसर्गसंवर्धनाच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण केली आहे. डोंगरदऱ्या, जंगल आणि नैसर्गिक अधिवास यामुळे पक्षी, फुलपाखरं आणि विविध वनस्पतींचा मोठ्या प्रमाणावर वावर येथे आढळतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 07, 2026 | 02:35 AM
पुण्यात उभं राहतंय ‘पक्ष्यांचं गाव’! 'या' गावाने निर्माण केला पर्यावरण संवर्धनाचा आदर्श

पुण्यात उभं राहतंय ‘पक्ष्यांचं गाव’! 'या' गावाने निर्माण केला पर्यावरण संवर्धनाचा आदर्श

Follow Us
Close
Follow Us:

पिसावरे गाव पहिले पक्ष्यांचे गाव’ बनण्याच्या उंबरठ्यावर
पिसावरे गावाला लाभला आहे स्वराज्यकालीन वारसा
पक्षी, फुलपाखरं आणि विविध वनस्पतींचा मोठ्या प्रमाणावर वावर

सुनयना सोनवणे /पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील पिसावरे गाव पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण करत ‘पहिले पक्ष्यांचे गाव’ (Birds) बनण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. गेल्या दशकभरातील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गावात तब्बल १९० हून अधिक पक्षी आणि १३० पेक्षा अधिक फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद झाली असून, ही जैवविविधतेची समृद्धी राज्यात दुर्मीळ मानली जाते.

स्वराज्यकालीन वारसा लाभलेल्या या गावाने आता निसर्गसंवर्धनाच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण केली आहे. डोंगरदऱ्या, जंगल आणि नैसर्गिक अधिवास यामुळे पक्षी, फुलपाखरं आणि विविध वनस्पतींचा मोठ्या प्रमाणावर वावर येथे आढळतो. विशेष म्हणजे, गावातील प्रत्येक घराबाहेर लावण्यात आलेल्या कृत्रिम घरट्यांमुळे चिमण्यांचे अस्तित्व पुन्हा बहरले आहे.

या परिवर्तनाची सुरुवात २०१३ मध्ये शिक्षक संतोष दळवी आणि धनंजय कोठावळे यांनी विद्यार्थ्यांना पक्षीनिरीक्षणाची गोडी लावण्यापासून केली. ‘पिसांवरून पक्षी ओळखा’ या उपक्रमातून सुरू झालेली चळवळ पुढे ‘चिमण्यांची शाळा’ आणि शाळेतील छायाचित्र दालनापर्यंत पोहोचली. विद्यार्थ्यांनी पक्ष्यांची नोंद, छायाचित्रण आणि संवर्धन यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. दळवी यांच्या बदलीनंतरही ही चळवळ थांबली नाही. माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत ‘बार्न आउल बर्डिंग ग्रुप’ आणि ‘फ्रेंड्स सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून काम अधिक व्यापक केले. आज गावात शाळेच्या परिसरात ५०० हून अधिक आणि घरांबाहेर सुमारे १२०० कृत्रिम घरटी आहेत. चिमण्यांच्या कुटुंबांची नोंद ठेवणे, पिल्लांच्या वाढीवर लक्ष ठेवणे अशी शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलनाची प्रक्रिया येथे राबवली जाते.

राणीबागेत ग्रे पोपटांनी विदेशी पर्यटकांना केले आकर्षित! देशी, विदेशी पर्यटकांची वाढली संख्या

पिसावरेत केवळ पक्ष्यांपुरतेच नव्हे, तर फुलपाखरे, वनस्पती आणि सर्प यांच्याही संवर्धनावर भर देण्यात आला आहे. ब्लू मॉर्मन, कॉमन क्रो, जेजेबेल, टायगर, कॉमन रोझ यांसारख्या आकर्षक फुलपाखरांच्या प्रजाती येथे सहज पाहायला मिळतात. तसेच विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षीही दरवर्षी येथे येतात.

या उपक्रमामुळे पिसावरे हे अभ्यास सहलींसाठी आकर्षण ठरत असून, राज्यभरातील विद्यार्थी, संशोधक आणि निसर्गप्रेमी येथे भेट देत आहेत. स्थानिकांच्या मते, शासनमान्यता आणि निधी मिळाल्यास पर्यावरण संवर्धनाला अधिक चालना मिळेल, पर्यटन वाढेल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. लोकसहभाग, विद्यार्थ्यांची जिद्द आणि शिक्षकांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले पिसावरे आज ‘पक्ष्यांचे गाव’ बनण्याच्या दिशेने झेपावत असून, पर्यावरण संवर्धनाचा आदर्श नमुना ठरत आहे.

‘दळवी सरांच्या प्रयत्नातून गावात पक्षी संवर्धनाची चळवळ सुरू झाली. आता हे काम अधिकृत व्हावे, याला शासनमान्यता आणि निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’
-अनिकेत साप्ते, संस्थापक सदस्य, बार्न आउल बर्डिंग ग्रुप आणि फ्रेंड्स फॉर सोशल संस्था, पिसावरे, ता. भोर

गावाने निवडली स्वतःची मानचिन्हे!
गावाने निवडणूक घेऊन मानचिन्हांची निवड करत संवर्धनाची अनोखी परंपरा निर्माण केली आहे.

Jayakwadi Bird Census: जायकवाडीत परदेशी पाहुण्यांचा किलबिलाट! ७९ प्रजातींच्या ३२ हजार पक्ष्यांची नोंद

गावपक्षी – भारतीय चष्मेवाला पक्षी
गावफुलपाखरू – पट्टेरी वाघ
गावसर्प – धामण
गाव पतंग – ॲटलास
गाव औषधी वनस्पती – कंबरमोडी (दगडी पाला)
गाव फुल – अग्निशिखा

Web Title: Pisavare village famous for village of birds bhor taluka pune navarashtra special story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • birds
  • navarashtra special
  • pune news

संबंधित बातम्या

ऑनलाइन प्रक्रियेमुळे अर्जदारांना मोठा दिलासा; दोन वर्षांत 4.39 लाख वाहन परवाने वितरित
1

ऑनलाइन प्रक्रियेमुळे अर्जदारांना मोठा दिलासा; दोन वर्षांत 4.39 लाख वाहन परवाने वितरित

Pune Water Crisis : उन्हाच्या तडाख्यात पुण्यात पाणी टंचाई; अनेक गावे, वस्त्या टँकरच्या भरोशावर, ‘या’ गावाला सर्वाधिक झळ
2

Pune Water Crisis : उन्हाच्या तडाख्यात पुण्यात पाणी टंचाई; अनेक गावे, वस्त्या टँकरच्या भरोशावर, ‘या’ गावाला सर्वाधिक झळ

11th Admission Process : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीत 39 हजारांहून अधिक प्रवेश
3

11th Admission Process : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीत 39 हजारांहून अधिक प्रवेश

पुण्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे आवाहन
4

पुण्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.