Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात रुजतेय ‘सायलेंट रीडिंग’ची नवी क्रेझ; ग्रंथालयांच्या चार भिंतींऐवजी उद्याने बनली ‘ओपन एअर लायब्ररी’

पुण्यातील बदलत्या वाचनसंस्कृतीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पुस्तकांच्या निमित्ताने अनोळखी माणसे एकत्र येत आहेत. कोणते पुस्तक वाचावे, कोणत्या लेखकाचे लिखाण आवडते, पुढचे पुस्तक कोणते घ्यावे, यावर चर्चा रंगते.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 09, 2026 | 12:30 PM
पुण्यात रुजतेय ‘सायलेंट रीडिंग’ची नवी क्रेझ; ग्रंथालयांच्या चार भिंतींऐवजी उद्याने बनली ‘ओपन एअर लायब्ररी’
Follow Us
Follow Us:

 किरण ढोणे:  एकीकडे मोबाइलच्या स्क्रीनवर रील्सचा अखंड स्क्रोल, तर दुसरीकडे हातात पुस्तक घेऊन शांतपणे बसलेली तरुणाई… पुण्यातील हे चित्र सध्या लक्ष वेधून घेत आहे. वाचनासाठी आता ग्रंथालयाच्या चार भिंतींची गरज राहिलेली नाही. शहरातील उद्याने, कॅफे, पुस्तक महोत्सव आणि वाचनगट हेच नव्या पिढीचे ‘रीडिंग स्पॉट’ बनत आहेत. आज साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुस्तकप्रेमी दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बदलती वाचनसंस्कृती विशेष लक्षवेधी ठरत आहे.

सकाळची वेळ… पार्कमध्ये कुणी फेरफटका मारत आहे, कुणी व्यायाम करत आहे; तर एका कोपऱ्यात काही जण पुस्तक घेऊन शांतपणे बसलेले. कुणाच्या हातात कादंबरी, कुणाकडे आत्मचरित्र, तर कुणी इतिहासाच्या पुस्तकात रमलेले. मोबाइलचे नोटिफिकेशन नाही, गप्पांचा गोंगाट नाही; फक्त पुस्तकाची पाने आणि वाचनाचा अनुभव. सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने एकत्र येऊन वाचन करण्याची संस्कृती पुण्यात आकार घेत आहे.

FSSAIच्या कारवाईमुळे चर्चेत आली ‘Old Monk’ रम; जाणून घ्या जालियनवाला बाग हत्याकांडाशी कसा आहे ‘या’ ब्रँडचा ऐतिहासिक संबंध?

पार्क झाले ‘ओपन एअर लायब्ररी’ :

पुण्यातील ‘Pune Reads’सारख्या सायलेंट रीडिंग कम्युनिटीमुळे सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन शांतपणे पुस्तक वाचण्याची संकल्पना पुढे आली आहे. शनिवारच्या सकाळी नागरिक पुस्तक घेऊन उद्यानात एकत्र येतात. प्रत्येक जण आपापल्या पुस्तकात रमतो; मात्र आजूबाजूला असलेली सामूहिक शांतता या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरते. म्हणजेच, वाचनासाठी आता लायब्ररी कार्डपेक्षा हातात एखादे पुस्तक आणि बसण्यासाठी हिरवीगार जागा पुरेशी ठरत आहे.

‘एकट्याने वाचायचे; पण अनुभवायचे सगळ्यांसोबत’

पारंपरिक वाचनात व्यक्ती आणि पुस्तक एवढेच दोन घटक असतात. मात्र पुण्यातील नव्या बुक क्लब आणि रीडिंग कम्युनिटीमुळे त्याला सामाजिकतेची जोड मिळाली आहे. एकत्र वाचन, पुस्तकांवर चर्चा, आवडलेल्या पुस्तकांची देवाणघेवाण आणि नवीन पुस्तकांची ओळख असा या गटांचा फॉर्म्युला आहे.
काही वाचनगट पार्कमध्ये, तर काही कॅफेमध्ये भेटतात. त्यामुळे वाचन ही केवळ वैयक्तिक सवय न राहता ‘वीकेंड सोशल अॅक्टिव्हिटी’ बनत आहे. कॉफीच्या कपासोबत पुस्तक वाचणे, त्यावर चर्चा करणे आणि समान आवडीच्या व्यक्तींशी संवाद साधणे, यामुळे पुस्तकांभोवती नवा सामाजिक कट्टा तयार होत आहे.

International Cat Day : घरात मांजर पाळण्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचा ‘ही’ विशेष माहिती

‘स्क्रोल’ऐवजी ‘पान’ उलटण्याची सवय :

मोबाइलवर काही सेकंदांत एकापाठोपाठ एक रील पाहण्याची सवय वाढत असताना, तासभर एकाच पुस्तकासमोर बसणे ही तरुणांसाठी डिजिटल डिटॉक्सची नवी पद्धत ठरत आहे. सार्वजनिक वाचन सत्रांमध्ये तरुणांसह विविध वयोगटातील नागरिक सहभागी होत आहेत. काही जण मित्रांसोबत येतात, तर काही जण एकटेच पुस्तक घेऊन या गटात सहभागी होतात.
विशेष म्हणजे, या सत्रांमध्ये एकमेकांशी संवाद साधण्याची सक्ती नसते. ‘सोबत लोक, पण स्वतःचे पुस्तक’ ही या नव्या वाचनसंस्कृतीची खासियत आहे. गर्दीत असूनही स्वतःसाठी शांत वेळ मिळत असल्याने अशा उपक्रमांना प्रतिसाद मिळत आहे.

पुस्तक महोत्सवातही तरुणाईची गर्दी :

पुणेकरांची पुस्तकांशी असलेली नाळ केवळ छोट्या वाचनगटांपुरती मर्यादित नाही. २०२५ च्या पुणे पुस्तक महोत्सवाला १२.५ लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली, तर जवळपास ३० लाख पुस्तकांची विक्री झाली. या पुस्तक विक्रीतून ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली. विशेष म्हणजे महोत्सवात तरुण वाचकांची मोठी उपस्थिती होती.
यामुळे ‘तरुण पिढी पुस्तक वाचत नाही’ हा समज पुण्याच्या बाबतीत तितका सरळ राहिलेला नाही. पुस्तक वाचण्याची पद्धत बदलली आहे; मात्र पुस्तकाची गरज संपलेली नाही. उलट, पुस्तकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग अधिक खुले झाले आहेत.

पुस्तक आता ‘कनेक्शन’चे माध्यम :

पुण्यातील बदलत्या वाचनसंस्कृतीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पुस्तकांच्या निमित्ताने अनोळखी माणसे एकत्र येत आहेत. कोणते पुस्तक वाचावे, कोणत्या लेखकाचे लिखाण आवडते, पुढचे पुस्तक कोणते घ्यावे, यावर चर्चा रंगते. काही ठिकाणी ‘बुक स्वॅप’च्या माध्यमातून वाचलेली पुस्तके एकमेकांना देण्याची पद्धतही रुजत आहे. त्यामुळे पुस्तक आता केवळ एकट्याने वेळ घालवण्याचे साधन राहिलेले नाही. ते संवादाचे, मैत्रीचे, नव्या ओळखी निर्माण करण्याचे आणि धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याचे निमित्त बनत आहे. रील्सच्या वेगवान जगातही पुणेकरांनी पुस्तकांसाठी शांत कोपरा शोधला आहे. माध्यम बदलले, जागा बदलली; पण पुस्तकांच्या पानांशी असलेले पुण्याचे नाते अजूनही कायम आहे.

पुण्याचा नवा ‘रीडिंग ट्रेंड’ :

पार्कमध्ये वाचन : सार्वजनिक उद्यानांमध्ये एकत्र येऊन सायलेंट रीडिंग.
कॅफे रीडिंग : कॉफीसोबत पुस्तक आणि त्यावर चर्चा.
बुक क्लब : पुस्तक वाचन, चर्चा आणि लेखकांची ओळख.
बुक स्वॅप : वाचलेली पुस्तके देऊन आवडते दुसरे पुस्तक घेण्याची देवाणघेवाण.
पुस्तक महोत्सव : २०२५ मध्ये पुणे पुस्तक महोत्सवाला १२.५ लाखांहून अधिक वाचकांची भेट आणि जवळपास ३० लाख पुस्तकांची विक्री.

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

Web Title: Pune silent reading culture international book lovers day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Educational News
  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.