Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उर्दु साहित्यातील निर्भीड आणि क्रांतीकारी लेखक ‘सादत हसन मंटो’ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ११ मे चा इतिहास

Saadat Hasan Manto Birth Anniversary : आज मानवी वेदनेचे प्रखर भाष्यकार सादत हसन मंटो यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी आपल्या लेखनातून मानवी क्रूरता आणि असहायतेचे विदारक सत्य मांडले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2026 | 08:26 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

उर्दु साहित्यातील सर्वात प्रभावशाली, वादग्रस्त आणि वास्तववादी लेखकांपैकी एक म्हणजे सआदत हसन मंटो यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांनी मानवी स्वभाव, समाजातील ढोंगीपणा, लैंगिकता, हिंसा आणि फाळणीच्या वेदना यांचे निर्भीड चित्रण केले. त्यांनी २०० हून अधिक कथा, नाटके, निबंध, रेडिओ पटकथा आणि चित्रपटांसाठी संवादलेखन केले आहे. १९४७ची भारत-पाकिस्तान फाळणीवर लिहिलेल्या त्यांच्या कथा काळजाला भिडणाऱ्या होत्या. यात त्यांनी फाळणीतील हिंसा, स्थलांतर आणि मानवी शोकांतिका अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. याशिवाय टोबा टेक सिंह, ठंडा गोश्त, खोल दो आणि बू या कथा विशेष गाजल्या असून आजही लोकांच्या पसंतीस पडतात. त्यांच्या साहित्यावर चित्रपट, नाटके आणि संशोधनही झाले आहे.

11 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1502 : ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या चौथ्या व अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.
  • 1857 : 1857 चा राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी इंग्रजांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
  • 1858 : मिनेसोटा हे अमेरिकेचे 32 वे राज्य बनले.
  • 1867 : लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
  • 1888 : मुंबईतील मांडवी येथे समाजसुधारक जोतिबा फुले यांना राव बहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी प्रदान केली.
  • 1949 : इस्रायल संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1949 : सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड करण्यात आले.
  • 1985 : इंग्लंडच्या ब्रॅडफर्ड शहरात फुटबॉलचा सामना सुरू असताना आग, 56 ठार.
  • 1987 : गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
  • 1996 : एकाच दिवसात एव्हरेस्टवर चढाई करताना 8 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1998 : 24 वर्षांनंतर, भारताने राजस्थानमधील पोखरण भागात हायड्रोजन बॉम्ब तयार करण्याच्या साधनांसह पुन्हा तीन यशस्वी परमाणु चाचणी केल्या.
  • 1999 : टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफने जर्मन ओपन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये तिचा 1,000 वा सामना खेळून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.
  • 1998 : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
  • 2010 : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ-सर्वाधिक न्यायाधीश एस.एच. कपाडिया यांना राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी 38 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली. 29 सप्टेंबर 2012 पर्यंत ते या पदावर राहतील.
National Technology Day: वादळ येणार होतं आणि ते आलं! ट्रम्प युगाआधी भारताने ‘असा’ दाखवला आपला दरारा; बनला ‘अण्वस्त्रधारी महासत्ता’

11 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1904 : ‘साल्वादोर दाली’ – स्पॅनिश चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 23 जानेवारी 1989)
  • 1912 : ‘सादत हसन मंटो’ – भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 18 जानेवारी 1955)
  • 1914 : ‘ज्योत्स्‍ना भोळे’ – संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑगस्ट 2001)
  • 1918 : ‘रिचर्ड फाइनमन’ – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 15 फेब्रुवारी 1988)
  • 1946 : ‘रॉबर्ट जार्विक’ – कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट यांचा जन्म.
  • 1960 : ‘सदाशिव अमरापूरकर’ – अभिनेता यांचा जन्म.
11 मे रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1871 : ‘सर जॉन विल्यम हर्षेल’ – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 7 मार्च 1792)
  • 1889 : ‘जॉन कॅडबरी’ – कॅडबरी कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1801)
  • 2004 : ‘कृष्णदेव मुळगुंद’ – चित्रकार व नृत्यदिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 27 मे 1913)
  • 2009 : ‘सरदारिलाल माथादास नंदा’ – भारतीय नौसेनाधिपती यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1915)
Migratory Bird Day 2026: हजारो मैलांचा प्रवास अन् अस्तित्वाचा संघर्ष; वाचा का महत्त्वाचे आहेत हे स्थलांतरित पक्षी?

Web Title: Saadat hasan manto birthanniversary know the history of 11th may marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी ऋषी सुनक यांचा वाढदिवस; जाणून घ्या १२ मे चा इतिहास
1

भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी ऋषी सुनक यांचा वाढदिवस; जाणून घ्या १२ मे चा इतिहास

महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १० मे चा इतिहास
2

महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १० मे चा इतिहास

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास
3

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर
4

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.