
Din Vishesh
आज २४ मार्च, मराठी साहित्यातील प्रसिद्ध कथालेखक व कादंबरीकार श्रीपदा नारायण पेंडसे (शिरुभाऊ) यांची पुण्यतिथी आहे. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९१९ मध्ये झाला होता. त्यांनी गारंबीचा बापू, हत्या, यशोदा, कलंदर असा कादंबऱ्यांची रचना केली आहे. गारंबीचा बापू लेखनातून त्यांनी कोकणातील निसर्ग आणि तेथील माणसांचे जिवंत चित्रण केले आहे. त्यांनी आपल्या लेखनाचा श्रीगणेशा केला तो जीवनकला या कादंबरीतून. रथचक्रासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय तुंबाडाचे खोत ही देखील त्यांची अजरामर कलाकृती आहे. आजही त्यांचे लेखन वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. नाटक आणि कादंबरी अशा दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.
24 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1836: कॅनडाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.
1855 : आग्रा आणि कलकत्ता शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
1883 : शिकागो आणि न्यूयॉर्क यांच्यात पहिले दूरध्वनी संभाषण झाले.
1896 : ए.एस. पोपोव्हने इतिहासात प्रथमच रेडिओ सिग्नल प्रसारित केला.
1923 : ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
1929 : लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.
1962 : जागतिक क्षय रोग दिन
1977 : मोरारजी देसाई यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.
1993: धूमकेतू शूमाकर-लेव्ही-9 चा शोध लागला. हा धूमकेतू जुलै महिन्यात गुरू ग्रहावर आदळला होता.
1998 : टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी 11 ऑस्कर पुरस्कार मिळाले.
2008: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले आणि प्रथमच निवडणुका झाल्या.
24 मार्च रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)
1775 : ‘मुथुस्वामी दीक्षीतार’ – तामिळ कवी व संगीतकार यांचा जन्म.
1901 : ‘अनब्लॉक आय्व्रेक्स’ – अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते यांचा जन्म.
1951 : ‘टॉमी हिल्फिगर’ – अमेरिकन फॅशन डिझायनर यांचा जन्म.
1984 : ‘एड्रियन डिसूझा’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
1979 : ‘इमरान हाशमी’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्मदिन.
1984 : ‘एड्रियन डिसूझा’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
24 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष
1603 : ‘एलिझाबेथ पहिली’ – इंग्लंडची व आयर्लंडची राणी
1849 : ‘योहान वुल्फगँग डोबेरायनर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 डिसेंबर 1780)
1882 : ‘एच. डब्ल्यू. लाँगफेलो’ – अमेरिकन नाटककार व कवी यांचे निधन. (जन्म: 27 फेब्रुवारी 1807)
1905 : ‘ज्यूल्स व्हर्न’ – फ्रेन्च लेखक यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1828)
2007 : ‘श्रीपाद नारायण पेंडसे’ – मराठी कथालेखक व कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1913)