
गोष्ट शिवसेनेच्या पहिल्या महापौरपदाच्या रस्सीखेचाची
नुकतेच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर पहिल्यांदाच मुंबईत ठाकरेंचा महापौर न बसता महायुतीचा पहिला महापौर बसणार आहे. मात्र, मुंबईत ठाकरेंचा पहिला महापौर कसा बसला यामागची बाळासाहेब ठाकरेंची राजकीय खेळी तुम्हाला ठाऊक आहे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.
मोठी बातमी! छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून दिलासा, मनी लाँड्रिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त
1973 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडे बहुमत होते. तर दुसरीकडे, शिवसेनेकडे केवळ 40 जागा होत्या. त्यामुळे शिवसेनेचा महापौर बसणार का? असा सर्वांनाच प्रश्न पडला होता. मात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या मनात एक वेगळीच राजकीय खेळी आकार घेत होती.
मुंबईत काँग्रेसचा महापौर बसू नये म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी एक वेगळीच राजकीय खेळी खेळली. शिवसेनेचा महापौर मुंबईत यावा यासाठी बाळासाहेबांनी चक्क मुस्लिम लीग इतर लहान पक्षांसोबत युती केली. यामुळे अर्थातच राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली. विरोधकांनी ठाकरेंना धारेवर धरले. मोठी टीकेची झोड उठली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले,”काँग्रेस नावाच्या सापाला ठेवण्यासाठी आम्ही मुस्लिम लीग नावाच्या नागाचा वापर करत आहोत.”
बाळासाहेबांच्या याच राजकीय खेळीमुळे शिवसेना उमेदवार सुधीर जोशी हे मुंबईचे महापौर बनले. त्यामुळे अवघ्या 40 जागा जिंकून सुद्धा मुंबईत शिवसेनेचा भगवा फडकला. इथूनच पुढे मग शिवसेना आणि मुंबई महापौर एक जणू एक समीकरण बनले.
सदर माहिती ही हलकं फुलकं या इंस्टाग्राम पेजवरून घेण्यात आली आहे.