The first journalist in Marathi, Balshastri Jambhekar, passed away History of 18th May.
मराठी पत्रकारितेने आज विश्वासहार्तची वेगळी उंची गाठली आहे. याच मराठी पत्रकारितेचे आद्य पत्रकार म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरु केले. हे पहिले मराठी वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार देखील म्हटले जाते. बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान झाला होता. जांभेकरांनी प्राचीन लिपींचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली. अशा बाळशास्त्री जांभेकर यांचा 18 मे 1846 रोजी निधन झाले. मात्र त्यांनी सुरु केलेल्या मराठी पत्रकारितेच्या बीजाचे आज वटवृक्ष झाले आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
1808 : बोर्नबॉन व्हिस्कीचे निर्माते एलीया क्रेग यांचे निधन.
1846 : मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. (जन्म: 6 जानेवारी 1812)
1966 : वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन. (जन्म: 9 नोव्हेंबर 1904)
1997 : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे निधन. (जन्म: 6 सप्टेंबर 1901)
1999 : पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.
2009 : एल. टी. टी. ई. चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचे निधन. (जन्म: 26 नोव्हेंबर 1954)
2012 : भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.
2017 : भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन. (जन्म: 21 जुन 1958)
2020 : मराठी लेखक, रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन.