Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रुडोंच्या राजिनाम्यामुळे सत्तापरिवर्तनाची शक्यता; भारत-कॅनडा संबंध सुधारणार?

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी नुकताच पंतप्रधानपदाचा आणि लिबिलरल पार्टीच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ट्रुडोंच्या कार्यकाळात भारत आणि कॅनडाच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये मोठी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 07, 2025 | 09:52 AM
ट्रुडोंच्या राजिनाम्यामुळे सत्तापरिवर्तनाची शक्यता; भारत-कॅनडा संबंध सुधारणार?

ट्रुडोंच्या राजिनाम्यामुळे सत्तापरिवर्तनाची शक्यता; भारत-कॅनडा संबंध सुधारणार?

Follow Us
Close
Follow Us:

ओटावा: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी नुकताच पंतप्रधानपदाचा आणि लिबिलरल पार्टीच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ट्रुडोंच्या कार्यकाळात भारत आणि कॅनडाच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये मोठी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र, ट्रुडो यांच्या निर्णयानंतर भारतात आशावाद निर्माण झाला आहे की, आगामी काळात या संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते. विशेषतः खालिस्तानवादाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर दोन्ही देशांमधील संबंध जवळपास तुटल्यासारखे झाले होते. आता सत्तापरिवर्तनाने परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

जस्टिन ट्रुडोंच्या भारतावरील टिका

जस्टिन ट्रूडो पंतप्रधानपदावर असताना खालिस्तानवादी शक्तींना अप्रत्यक्ष समर्थन दिल्याचे आरोप वारंवार करण्यात आले आहेत. 2020 मध्ये भारतीय शेतकरी आंदोलनावर त्यांची टिका आणि 2023 मध्ये खालिस्तानी नेते हरदीप निज्जर यांच्या हत्येसाठी भारतीय अधिकाऱ्यांवर थेट आरोप करणे या घटनांमुळे भारत-कॅनडा संबंध अधिक ताणले गेले.

त्याचबरोबर, जगमीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील न्यू डेमोक्रॅटिक पार्टीसोबत केलेल्या राजकीय सहकार्यामुळेही खालिस्तान समर्थक गटांना बळ मिळाल्याचा आरोप झाला. परिणामी, भारताने कडक पावले उचलत कॅनडामधील आपल्या राजनैतिक उपस्थितीला आळा घातला.

जागतिक घडामोडी संबंधित – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी दिला राजीनामा; पक्षाचे नेतेपदही सोडले म्हणाले…

पियरे पोइलिवर सत्तेत येण्याची शक्यता

सध्या, कॅनडामध्ये पियरे पोइलिवर यांच्या नेतृत्वाखाली कन्झर्वेटिव्ह पक्ष सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोइलिवरे यांनी ट्रुडो यांच्या भारविरोधी भूमिकेवर अनेक टिका केल्या आहेत. तसेच त्यांनी भारतासोबत व्यावसायिक आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे. त्यांनी जाहीर केले आहे की कॅनडाने भारतासोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

कॅनडा भारतीय संबंध सुधारण्याची आशा

कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांना परस्पर हिताच्या आर्थिक आणि धोरणात्मक गरजांमुळे एकमेकांशी जवळीक राखणे आवश्यक आहे. भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा अर्थव्यवस्था असलेला देश आहे, तर कॅनडाला विविध व्यापारिक आणि उर्जेच्या गरजांसाठी भारतासोबत भागीदारी करणे उपयुक्त ठरू शकते. ट्रूडो यांच्या राजीनाम्यामुळे सत्तेत आलेल्या नवीन नेतृत्वाकडून अपेक्षा आहे की, त्यांनी राजकीय मतभेद सोडून व्यावसायिक आणि धोरणात्मक हितसंबंधांना प्राधान्य द्यावे.

पियरे पोइलिवरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून भारताशी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली गेल्यास भारत-कॅनडा संबंध नव्या उंचीवर पोहोचू शकतात. शेवटी, या सत्तापरिवर्तनाने भारत आणि कनाडा यांच्यातील संबंधांच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल अशी आशा बाळगूया. खालिस्तानसंबंधित वाद मागे टाकत दोन्ही देशांनी विश्वास आणि सहकार्यावर आधारित संबंध विकसित करणे गरजेचे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाक-तालिबान संघर्षाला धोकादायक वळण; अफगाणिस्तानने TTP सोबत आखली हल्ला करण्याची योजना

Web Title: Trudeaus resignation raises possibility of power change will india canada relations improve nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • Canada
  • india
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.