Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँक्रीटच्या जंगलात रुजतेय शेतीची हिरवाई; गच्चीपासून बाल्कनीपर्यंत शहरी शेतीचे प्रयोग, कचऱ्यापासून खत, मातीविना शेतीकडेही कल

Urban agriculture terrace farming: पुण्यासारख्या वाढत्या शहरात मोकळ्या जागांची कमतरता असतानाही गच्ची, बाल्कनी आणि सोसायट्यांच्या जागेत शहरी शेतीचे प्रयोग वाढत आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 26, 2026 | 08:38 PM
Urban farming

Urban farming

Follow Us
Follow Us:

सुनयना सोनवणे

  • काँक्रीटच्या जंगलात रुजतेय शेतीची हिरवाई
  • शहरी शेतीचे प्रयोग
  • उभ्या पद्धतीने लागवडीचे प्रयोग
घरातून सकाळी बाहेर पडताना हातात बाजाराची पिशवी घेण्याऐवजी गच्चीवर जाऊन दोन मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि मूठभर मेथी तोडता आली तर? पुण्यासारख्या वाढत्या शहरात ही कल्पना आता प्रत्यक्षात उतरत आहे. शहर विस्तारले, मोकळ्या जागा कमी झाल्या, अंगणे आणि परसबागा हरवल्या; मात्र मातीशी असलेले नाते संपले नाही. त्यामुळे गच्ची, बाल्कनी आणि सोसायट्यांच्या सामायिक जागेत शहरी शेतीचे (अर्बन फार्मिंग) प्रयोग वाढत आहेत.

Dog Day 2026 : निस्वार्थ प्रेम, सुरक्षा आणि माणसाचा ‘हा’ सर्वात प्रामाणिक मित्र; जाणून घ्या ‘या’ खास दिवसाचा रंजक इतिहास

कुंड्या, पिशव्या आणि छोट्या वाफ्यांमध्ये टोमॅटो, मिरची, पालक, मेथी, कोथिंबीर, वांगी यांसारख्या भाज्या घेतल्या जात आहेत. काही नागरिक मातीविना शेती आणि उभ्या पद्धतीने लागवडीचे प्रयोगही करीत आहेत. कमी जागेत अधिक लागवड करण्यासाठी या पद्धती उपयुक्त ठरत आहेत.

शहरी शेतीची विशेष बाब म्हणजे यात घरातील ओल्या कचऱ्याचा पुनर्वापर होतो. भाजीपाल्याच्या साली, फळांचे अवशेष आणि चहाचा चोथा यापासून कंपोस्ट तयार करून त्याचा वापर झाडांसाठी केला जातो. त्यामुळे कचरा – खत – शेती – अन्न अशी छोटी साखळी तयार होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा छंद आणि समाधानाचा स्रोत ठरत असून, मुलांनाही शेतीची प्रत्यक्ष ओळख होत आहे.

शहरी शेतीतून मोठे आर्थिक उत्पन्न मिळेलच असे नाही; मात्र घरच्या वापरातील काही भाजीपाला पिकवल्याने खरेदीचा खर्च कमी होतो. त्याहून महत्त्वाचे म्हणजे कचरा कमी करणे, हिरवाई वाढविणे आणि नागरिकांना निसर्गाशी जोडणे हे या प्रयोगाचे मोठे फायदे आहेत.

शहरी शेती करणारे स्थानिक नागरिक नागेश पाटील म्हणाले की, ‘आम्ही काही कुंड्यांपासून सुरुवात केली. आता घरच्या वापरासाठी मिरची, कोथिंबीर, मेथी पिकवतो. स्वतः पिकविलेली भाजी ताटात येण्याचा आनंद वेगळाच आहे . ओला कचरा कमी करण्यासाठी कंपोस्ट सुरू केले. त्यातून तयार झालेले खत सोसायटीच्या बागेसाठीही वापरतो. आता रहिवाशांचा सहभागही वाढत आहे.’

ज्येष्ठ नागरिक, उषा सावंत म्हणाले की ‘गावाकडची शेती शहरात स्थायिक झाल्यानंतर मागे राहिली होती. गच्चीवरील झाडांमुळे पुन्हा मातीशी जोडले गेल्यासारखे वाटते आणि सोबतच विरंगुळाही मिळतो.

कृषी अभ्यासक, डॉ. उत्कर्ष गायकवाड म्हणाले की, ‘कमी जागेत शेती शक्य आहे; मात्र गच्चीची क्षमता, पाण्याचा वापर, योग्य पिकांची निवड आणि पोषकद्रव्यांचे व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’

August 26 history: आज नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांची जयंती; जाणून घ्या २६ ऑगस्टचा इतिहास..

Web Title: Urban agriculture terrace farming pune rooftop balcony gardening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • Farming
  • Natural Farming

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.