फोटो सौजन्य- सोशल मीडिया
August 26 history: आज मदर तेरेसा यांचा मॅसिडोनिया येथे १९१० मध्ये जन्म झाला, परंतु त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतामधील दीनदलित, गरीब आणि अनाथ लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी कोलकाता येथे येऊन शिक्षिका म्हणून कार्य सुरू केले. कोलकातामधील गरिबी आणि लोकांची दयनीय अवस्था पाहून त्यांनी ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कुष्ठरोगी, अनाथ मुले, बेघर आणि उपेक्षित लोकांसाठी आश्रमी व रुग्णालये सुरू केली. त्यांच्या या अजोड मानवी सेवेचा गौरव म्हणून त्यांना १९७९ मध्ये नोबेल शांतता पुरस्कार आणि १९८० मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. ५ सप्टेंबर १९९७ रोजी त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचे मानवतावादी विचार आणि कार्य आजही संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे.






