Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Blood Donor Day : एक थेंब आशेचा! रक्तदानात महाराष्ट्र आघाडीवर; 10 लाखांचा आकडा होतोय पार

World Blood Donor Day : महाराष्ट्रात स्वैच्छिक रक्तदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. राज्यातील नोंदणीकृत रक्तदात्यांची संख्या १० लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. यामध्ये पुणे सर्वात आघाडीवर आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 14, 2026 | 09:56 AM
World Blood Donor Day

World Blood Donor Day

Follow Us
Follow Us:
  •  रक्तदानात महाराष्ट्र आघाडीवर
  • 9.88 लाख नोंदणीकृत रक्तदाता
  • पुणे अव्वल स्थानी
World Blood Donor Day : सुनयना सोनवणे : रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये वाढणारी प्रतीक्षा, ऑपरेशन थिएटरबाहेरची अस्वस्थ नजर आणि त्याच वेळी कुठेतरी शांतपणे पुढे आलेला एका रक्तदात्याचा हात… आरोग्य व्यवस्थेतील अनेक कथा अशाच अदृश्य धाग्यांनी जोडलेल्या असतात. रक्ताची गरज अचानक निर्माण होते; पण रक्तदाता एका दिवसात तयार होत नाही. त्यामागे असते सातत्याने उभी राहिलेली सामाजिक जाणीव, नियमित सहभाग आणि स्वैच्छिक रक्तदानाची चळवळ.

जागतिक रक्तदाता दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील रक्तदानाचे चित्र आश्वासक दिसत आहे. राज्यातील नोंदणीकृत रक्तदात्यांची संख्या ९ लाख ८८ हजार ८११ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्य आता १० लाख रक्तदात्यांच्या टप्प्याच्या उंबरठ्यावर उभे आहे.

World Eye Donation Day : अंधत्वावर आशेचा किरण! नेत्रदानाला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदानाचे महत्त्व आणि गरज

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात दरवर्षी १२ कोटींहून अधिक रक्तदान संकलित केले जाते. सुरक्षित आणि पुरेसा रक्तपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एखाद्या देशातील किमान १ ते २ टक्के लोकसंख्येने नियमित रक्तदान करणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे अनेक देशांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार मानले जाते.

ई-रक्तकोषामुळे रक्तदातांच्या संख्येत वाढ

भारतात रक्तसंकलन आणि उपलब्धतेसाठी केंद्र सरकारचे ‘ई-रक्तकोष’ हे राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ कार्यरत आहे. रक्तपेढ्या, रक्तदान शिबिरे आणि रक्तदात्यांची माहिती या प्रणालीद्वारे एकत्रित केली जाते. या पोर्टलवरील ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत १ कोटी २ लाख ७९ हजार १६३ नोंदणीकृत रक्तदाते आहेत.

तर महाराष्ट्रातील नोंदणीकृत रक्तदात्यांची संख्या ९ लाख ८८ हजार ८११ वर पोहोचली असून २२ आगामी शिबिरे नियोजित आहेत. स्वैच्छिक रक्तदानाला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.

रक्तदानात पुणे जिल्हा आघाडीवर

रक्तदानाबाबत पुणे जिल्ह्याचे योगदान विशेष ठरत आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माहितीनुसार, २०२५ च्या जानेवारी ते मे या कालावधीत पुणे जिल्ह्यात २,१२७ रक्तदान शिबिरांमधून सुमारे १.५८ लाख युनिट रक्त संकलित झाले असून हा आकडा राज्यातील सर्वाधिक आहे.

जागतिक रक्तदाता दिवस

दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो. २००४-०५ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून या दिनाला अधिकृत मान्यता देण्यात आली. यंदाची थीम ही मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेवर आधारित आहे.

रक्तदानाची आकडेवारी

रक्तदान भारत महाराष्ट्र
नोंदणीकृत रक्तदाते १,०२,७९,१६३ ९,८८,८११
रक्तकेंद्रे ४,५७२ ४२८
आयोजित शिबिरे २,५६,६५३ ३०,४६२
आगामी शिबिरे १,१६९ २२

World Ocean Day : पुण्याच्या प्रदूषणाचा फटका महासागरांना? पर्यावरण अहवालातून मोठा इशारा

Web Title: World blood donor day maharashtra nears 10 lakh blood donors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • dinvishesh
  • maharashtra news
  • Marathi News
  • world blood donor day

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
3

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
4

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.