Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Creativity and Innovation Day : टाकाऊ वस्तू, कल्पक बुद्ध अन् यशाची भरारी! छोट्याशा कल्पनेतून तरुणी बनली यशस्वी उद्योजिका

World Creativity and Innovation Day : दरवर्षी २१ एप्रिल जागतिक सर्जनशीलता आणि नवोन्मेष दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस नव्या कल्पना, संशोधन आणि सर्जनशील उपायांमधून जागतिक आव्हानांना तोंड देण्याची प्रेरणा देतो.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 21, 2026 | 09:04 AM
World Creativity and Innovation Day

World Creativity and Innovation Day

Follow Us
Close
Follow Us:

सुनयना सोनवणे : कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना गायत्री आणि तिच्या मित्र-मैत्रिणींसमोर एक प्रश्न सतत उभा राहत होता तो म्हणजे वाढत्या कचऱ्याचं करायचं काय? घरातील टाकाऊ कपडे, कागद, कॉलेजच्या आवारातील वाळलेली झाडांची पाने अशा अनेक समस्या त्यांच्या समोर होत्या. केवळ चर्चा करून थांबण्याऐवजी त्यांनी आपल्या सर्जनशील विचारांना कृतीत उतरवण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी जुन्या कपड्यांपासून छोट्या हँडपर्स ते टोट बॅगपर्यंत विविध कापडी पिशव्या बनवण्याचा छोटासा प्रयोग सुरू केला. त्यासोबतच कागदाचा पुनर्वापर करून हँडमेड पेपर तयार करणे, त्यावर आकर्षक पेंटिंग करणे, वाळलेल्या पानांचा कल्पकतेने वापर करून डायरीचे कव्हर बनवणे अशा अनेक छोट्या गोष्टींना त्यांनी आकार दिला. या छोट्याशा कल्पनेतूनच त्यांचा स्टार्टअप उभा राहिला आणि आज तो ग्राहकांना अनेक पर्यावरणस्नेही पर्याय उपलब्ध करून देत आहे.

ही केवळ गायत्रीची गोष्ट नाही; आज देशभरातील अनेक तरुण आपल्या कलागुणांना, नव्या कल्पनांना आणि समस्यांकडे वेगळ्या नजरेने पाहण्याच्या वृत्तीला व्यवसायाचे रूप देत आहेत.

April 20 special : चिनी भाषेचा 5000 वर्षांचा इतिहास अन् तुमच्या पिझ्झाची गोष्ट; जाणून घ्या आजचा दिवस का आहे खास?

दरवर्षी २१ एप्रिल रोजी साजरा होणारा ‘जागतिक सर्जनशीलता आणि नवोन्मेष दिन’ हा दिवस नव्या कल्पना, संशोधन आणि सर्जनशील उपायांच्या माध्यमातून जागतिक आव्हानांना तोंड देण्याची प्रेरणा देतो. संयुक्त राष्ट्र महासभेने २०१७ मध्ये या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. समस्या निराकरण, आर्थिक प्रगती आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कल्पकतेचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. यंदा ‘जागतिक प्रगतीसाठी सर्जनशीलतेचा उपयोग’ आणि ‘पुढे येऊन नवनिर्मिती करा’ या संकल्पनांवर विशेष भर देण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर सर्जनशील अर्थव्यवस्था ही सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक मानली जाते. जागतिक जिडीपीमध्ये या क्षेत्राचा ३.१ टक्के वाटा असून, जगातील ६.२ टक्के रोजगार या क्षेत्रातून निर्माण होतात. त्यामुळे रोजगारनिर्मिती, आर्थिक विकास आणि सांस्कृतिक जतन यासाठीही सर्जनशीलता अत्यंत महत्त्वाची ठरते.

या दिनाचा संबंध संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी (एसडीजी) देखील जोडला जातो. विशेषतः ‘सभ्य रोजगार व आर्थिक वाढ’ (एसडीजी ८), ‘उद्योग, नवोन्मेष आणि पायाभूत सुविधा’ (एसडीजी ९) आणि ‘जबाबदार उपभोग व उत्पादन’ (एसडीजी १२) या उद्दिष्टांना गती देण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण ठरतो.

आजच्या तरुणांसाठी सर्वात मोठी संधी म्हणजे समस्यांकडे केवळ अडथळा म्हणून न पाहता, त्यातून नव्या शक्यता शोधणे. प्रत्येक अडचणीत एक नवीन कल्पना दडलेली असते आणि त्या कल्पनेला कृतीची जोड मिळाली, तर ती फक्त वैयक्तिक यशापुरती मर्यादित राहत नाही, तर समाजाच्या शाश्वत विकासाचा मार्ग ठरते. नवोन्मेषामुळे तंत्रज्ञानासह डिझाईन, माध्यम, कला, शिक्षण, सादरीकरण आणि उद्योग क्षेत्रातही व्यापक प्रगती घडून येते.

सृजन क्रिएशन्सच्या संस्थापक गायत्री पोदार यांचा हा प्रवास कधीच सोपा नव्हता. आर्थिक अडचणी, संसाधनांची कमतरता, अपयशाची भीती आणि सामाजिक मर्यादा या अडथळ्यांवर मात करत आम्ही इथपर्यंत पोचलो आहोत. मात्र, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कल्पना वास्तवात बदलू शकते असे त्या म्हणतात.

Light Pollution : भारत-चीनचा विकास की धोका? दोन देशांमुळे बिघडतोय पृथ्वीचा समतोल?

Web Title: World creativity and innovation day know the history and a student story of creative buisness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

इतिहासातील क्रूर हुकूमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलर याचा जन्मदिन; जाणून घ्या 20 एप्रिलचा इतिहास
1

इतिहासातील क्रूर हुकूमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलर याचा जन्मदिन; जाणून घ्या 20 एप्रिलचा इतिहास

यशस्वी उद्योजिका विमलाबाई गरवारे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 19 एप्रिलचा इतिहास
2

यशस्वी उद्योजिका विमलाबाई गरवारे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 19 एप्रिलचा इतिहास

स्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जयंती; जाणून घ्या १८ एप्रिलचा इतिहास
3

स्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जयंती; जाणून घ्या १८ एप्रिलचा इतिहास

ज्ञान आणि संस्कारांचा दीप शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 17 एप्रिलचा इतिहास
4

ज्ञान आणि संस्कारांचा दीप शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 17 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.