Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Junkfood Day : चटकदार चवीची मोठी किंमत! जंक फूडची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक, तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

World Junk Food Day : गेल्या काही काळात जंक फूड आणि अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांचे सेवन झपाट्याने वाढत आहे. ऑनलाइन ऑफर्स, फूड डिलिव्हरी, सोशल मीडिया ट्रेंड आणि चटकदारखाण्याच्या इच्छेमुळे जंक फूडचे सेवन वाढले आहे. याचा मानवाच्या आरोग्यवार मोठा परिणाम होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 21, 2026 | 11:08 AM
Junk Food

Junk Food

Follow Us
Follow Us:

World Junkfood Day : सुनयना सोनवणे : मोबाईलवर एक नोटिफिकेशन येते… ‘आज ५० टक्के सूट!’, ‘३० मिनिटांत डिलिव्हरी!’, ‘एक घ्या, एक मोफत!’ आणि काही क्षणांत बर्गर, पिझ्झा, फ्राईज किंवा कोल्ड ड्रिंक घराच्या दारात हजर होते. चटकदार चव, सहज उपलब्धता आणि आकर्षक ऑफर्स यांच्या मोहात जंक फूड आता केवळ अधूनमधून खाल्ले जाणारे पदार्थ राहिले नसून अनेकांच्या दैनंदिन आहाराचा भाग बनले आहेत. मात्र, या चवीमागे लपलेला आरोग्याचा धोका दिवसेंदिवस गंभीर होत असून, लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांच्या वाढत्या प्रमाणाबाबत तज्ज्ञांकडून सातत्याने इशारा दिला जात आहे.

Mental Health Tip : धावपळीच्या आयुष्यात शांतता हवीय? मग ‘हा’ मंत्र वापरुन पहा, मानसिक शांतता मिळेल

बदलती जीवनशैली, ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्स, सोशल मीडियावरील फूड ट्रेंड्स आणि सहज उपलब्ध होणारे अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ यामुळे जंक फूडचे सेवन लहान मुलांपासून तरुण आणि प्रौढांपर्यंत झपाट्याने वाढत आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण नुसार महाराष्ट्रात २४.६ टक्के महिला आणि २३.४ टक्के पुरुष जास्त वजनाचे किंवा लठ्ठ आहेत. तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ आणि साखरयुक्त पेयांचे वाढते सेवन हे जीवनशैलीशी संबंधित आजारांसाठी महत्त्वाचा जोखीम घटक असल्याचे नमूद केले आहे.

जंक फूडमध्ये साखर, मीठ, ट्रान्स फॅट, संतृप्त चरबी आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते; तर जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय घटक (फायबर) अत्यल्प असतात. त्यामुळे अशा पदार्थांचे नियमित सेवन केल्यास लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, फॅटी लिव्हर, पचनाच्या तक्रारी आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सची वाढती सवय

तज्ज्ञांच्या मते, अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून तयार होणारे अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स हे आजच्या आहाराचा मोठा भाग बनत आहेत. कृत्रिम रंग, स्वाद, प्रिझर्व्हेटिव्ह्ज, इमल्सिफायर्स आणि इतर रासायनिक घटकांचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या या पदार्थांमध्ये पॅकेज्ड चिप्स, इंस्टंट नूडल्स, सॉफ्ट ड्रिंक्स, फ्लेवर्ड बिस्किटे, रेडी-टू-ईट पदार्थ, चॉकलेट्स आणि साखरयुक्त पेयांचा समावेश होतो. द लॅन्सेट आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधनांनुसार, अशा पदार्थांच्या नियमित सेवनाचा संबंध लठ्ठपणा, टाइप-२ मधुमेह, हृदयविकार आणि अकाली मृत्यूच्या वाढत्या धोक्याशी आढळून आला आहे.

आहाराबाबत आयसीएमआरने २०२४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आहार मार्गदर्शक सूचनांमध्ये अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ, साखरयुक्त पेये तसेच जास्त मीठ, साखर आणि तेल असलेले पदार्थ शक्यतो टाळण्याचा सल्ला दिला आहे. दैनंदिन आहारात भाज्या, फळे, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि घरच्या ताज्या अन्नाला प्राधान्य देण्याबरोबरच नियमित व्यायाम करण्यावर भर देण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ‘इट राईट इंडिया’ अभियानांतर्गत संतुलित आहाराचा प्रसार करत असून, पॅकेज्ड पदार्थ खरेदी करताना त्यांच्या पोषणमूल्यांचे लेबल वाचण्याचे आवाहनही केले आहे.

आहारतज्ञ डॉ. अभिजित कोरे सांगतात ‘जंक फूड पूर्णपणे बंद करण्यापेक्षा त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. आठवड्यातून एखाद्या वेळी मर्यादित प्रमाणात असे पदार्थ खाल्ले तरी चालू शकते; मात्र रोजच्या आहारात घरचे, ताजे आणि संतुलित अन्न असणे आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासूनच योग्य आहाराच्या सवयी लावण्याची गरज आहे.’

जनरल फिजिशियन डॉ. चैतन्य सोमवंशी यांच्या म्हणण्यानुसार, ‘तरुणांमध्ये वाढणारा लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यामागे निष्क्रिय जीवनशैलीबरोबरच जंक फूड आणि साखरयुक्त पेयांचे वाढते सेवन हे महत्त्वाचे कारण आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांचे मर्यादित सेवन हाच या समस्येवर प्रभावी उपाय आहे.’

जंक फूड आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फुडमध्ये फरक

जंक फूड अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स
पोषणमूल्य कमी, कॅलरी जास्त अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून तयार केलेले पदार्थ
उदा. बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज उदा. इंस्टंट नूडल्स, पॅकेज्ड चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स, फ्लेवर्ड बिस्किटे, रेडी-टू-ईट पदार्थ
बहुतांश जंक फूड हे अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स असतात. मात्र सर्व अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स हे पारंपरिक अर्थाने जंक फूड असतीलच असे नाही.

हे लक्षात ठेवा…

  • जंक फूडमध्ये कॅलरीज जास्त, पोषणमूल्य कमी असते.
  • नियमित सेवनामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकारांचा धोका वाढू शकतो.
  • अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सचे सेवन शक्य तितके कमी ठेवा.
  • पॅकेजवरील पोषणमूल्यांचे लेबल वाचूनच पदार्थांची निवड करा.
  • घरचे, ताजे आणि संतुलित अन्न हा आरोग्यदायी पर्याय आहे.
National Pollution Control Day 2025 : वाढता धोका आणि शाश्वत भविष्यासाठीची जबाबदारी

Web Title: World junk food day junk food health risks obesity diabetes marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • dinvishesh
  • healthy food
  • Side Effects Of Eating Fast Food

संबंधित बातम्या

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ
1

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
2

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
3

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
4

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.