Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Ocean Day : पुण्याच्या प्रदूषणाचा फटका महासागरांना? पर्यावरण अहवालातून मोठा इशारा

World Ocean Day : पुण्यातील वाढत्या उर्जा वापर, सांडपाणी, कचरा आणि कार्बन उत्सर्जनाता परिणाम थेट महासागरांवर होत असल्याचे चित्र अहवालातून समोर आले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल शेकडो किलोमीटर दूर असलेल्या पुण्याचा महासागराशी काय संबंध? तर जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 08, 2026 | 03:52 PM
World Ocean Day

World Ocean Day

Follow Us
Follow Us:
  • समुद्राचा प्रश्न केवळ किनाऱ्यापुरता नाही
  • पुण्याचा पर्यावरणीय ठसा महासागरापर्यंत पोहोचतो
  • वाढता कचरा, सांडपाणी, ऊर्जा वापर आणि हवामानाचा दबाव
World Ocean Day : सुनयना सोनवणे : समुद्रापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या पुण्याचा महासागराशी काय संबंध? असा प्रश्न पुणेकरांना पडणे स्वाभाविक आहे. मात्र शहरातील ऊर्जा वापर, कचरा, नदी प्रदूषण, सांडपाणी आणि वाढणारे कार्बन फुटप्रिंट यांचा विचार केला तर समुद्र आणि पुणे यांच्यातील संबंध केवळ पर्यावरणीय नाही तर हवामानाच्या दृष्टीने थेट असा आहे.

महासागर हे पृथ्वीवरील अतिरिक्त उष्णतेचा मोठा भाग शोषून घेतात आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचाही मोठा हिस्सा सामावून घेतात. त्यामुळे शहरांमधून होणाऱ्या उत्सर्जनाचा परिणाम महासागरांच्या तापमानावर, पाण्याच्या रसायनशास्त्रावर आणि पुढे पर्जन्यमानाच्या स्वरूपावर होतो.

World Ocean Day : मानवी चुकांमुळे धोक्यात आले अथांग महासागरांचे अस्तित्व; वाचा, आपण समुद्राला वाचवले नाही तर काय होईल?

याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या पर्यावरण अहवाल २०२४- २५ कडे पाहिले असता वाढत्या शहरी दबावाचे चित्र समोर येते. या अहवालानुसार शहरातील एकूण वीज वापर वाढला असून निवासी क्षेत्राचा त्यात मोठा वाटा आहे. वाहनसंख्येतही वाढ झाली आहे. सकारात्मक बाब म्हणजे सौरऊर्जा क्षमतेत वाढ आणि एलईडी वापरातून ऊर्जा बचत झाली आहे; मात्र एकूण पर्यावरणीय दबाव अजूनही वाढत असल्याचे दिसून आले.

पुण्याचा समुद्राशी संबंध कसा येतो?

पण समुद्राशी या सगळ्याशी कुठे संबंध येतो? तर नदी आणि कार्बन असा हा संबंध आहे. पुणे शहरातून दररोज सुमारे ९८० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. उपलब्ध माहितीनुसार त्यातील सुमारे ६४ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होते, म्हणजे उर्वरित भाग आणि व्यवस्थेतील तफावत ही नदी परिसंस्थेवर दबाव निर्माण करते. शहरातील सांडपाणी व्यवस्था, उपचार क्षमता आणि प्रत्यक्ष प्रक्रिया यातील अंतरावर अलीकडेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, मुळा–मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पांतर्गत अतिरिक्त प्रक्रिया क्षमता उभारण्याचे काम सुरू असून शहरातील सांडपाणी व्यवस्थेवर अजून मोठी गुंतवणूक आवश्यक आहे.

पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, शहरात तयार होणारा कचरा, सांडपाणी, वाहनांचा वापर आणि ऊर्जा वापर हे चार घटक एकत्रितपणे महासागरांवर अप्रत्यक्ष परिणाम करतात. त्यात भर म्हणजे कचरा व्यवस्थापनावरील ताण. महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये कचरा निर्मिती आणि प्रक्रिया क्षमतेत अजूनही तफावत असल्याचे अलीकडील अहवालांनी अधोरेखित केले आहे.

अशी आहे ही साखळी

पुण्यातील ऊर्जा वापर → कार्बन उत्सर्जन → वातावरण गरम होणे → महासागर अतिरिक्त उष्णता शोषणे → हवामान बदल → मान्सून आणि शहरांवर परिणाम

पर्यावरण आणि हवामान अभ्यासक प्रा. डॉ. अनिल राऊत सांगतात  ‘समुद्र संवर्धन म्हणजे फक्त किनाऱ्यावरची स्वच्छता मोहीम नाही; ती शहराच्या रोजच्या सवयींमध्ये दडलेली आहे. पुण्यासारख्या शहरांसाठी त्याचा अर्थ हा कमी ऊर्जा वापर, सार्वजनिक वाहतूक, सांडपाणी प्रक्रिया वाढवणे, कचरा वर्गीकरण आणि नदी परिसंस्था जपणे असा आहे. त्यामुळे समुद्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आली आहे. कारण हा प्रश्न आता केवळ किनाऱ्यापुरता नसून तो शहरांच्या जीवनशैलीतून आकार घेत आहे.’

विश्व सागरी दिवस

दरवर्षी ८ जूनला विश्व सागरी दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी २००८ मध्ये याला अधिकृत मान्यता दिली होती. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. यंदाचा विश्व सागरी दिवस हा महासागराकडे नव्या नात्याने पाहूया या संकल्पनेवर आधारित आहे.

उद्देश

  • महासागरांचे पृथ्वीवरील महत्त्व अधोरेखित करणे
  • मानवी कृतींचा समुद्रावर होणारा परिणाम समजावणे
  • समुद्र संवर्धनासाठी जनजागृती व कृती वाढवणे
  • महासागरांच्या शाश्वत व्यवस्थापनाला चालना देणे
Ancient Temples : घंटा वाजवण्यापासून ते प्रदक्षिणेपर्यंत; प्राचीन मंदिरांमधील प्रत्येक विधीमागे आहे ‘हे’ वैज्ञानिक कारण

Web Title: World ocean day pune pollution impact on oceans environment report warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • dinvishesh
  • Marathi News
  • navarashtra special

संबंधित बातम्या

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
1

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
2

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?
3

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश
4

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.