
world telecommunication and information society day 17 may 2026 history theme
आजच्या वेगवान युगात सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपण्यापूर्वीपर्यंत आपण ज्या एका गोष्टीवर सर्वात जास्त अवलंबून असतो, ती म्हणजे ‘दूरसंचार’ (Telecommunication) यंत्रणा. इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि सॅटेलाईट यांशिवाय आजच्या आधुनिक जगाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. याच डिजिटल क्रांतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि मानवी जीवनातील तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी १७ मे रोजी जगभरात ‘जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन’ (World Telecommunication and Information Society Day) साजरा केला जातो. ग्रामीण आणि शहरी भागातील ‘डिजिटल दरी’ (Digital Divide) कमी करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
या दिवसाचा इतिहास खूप जुना आणि रंजक आहे. १७ मे १८६५ रोजी पॅरिस येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी करण्यात आली होती. याच दिवशी ‘आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ’ (ITU – International Telecommunication Union) ची स्थापना झाली. पुढे चालून १९६९ मध्ये या संस्थेच्या स्थापनेचा वर्धापनदिन ‘जागतिक दूरसंचार दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. नंतरच्या काळात, म्हणजेच नोव्हेंबर २००६ मध्ये तुर्की येथील परिषदेत संयुक्त राष्ट्र महासभेने १७ मे हा दिवस ‘जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन’ म्हणून एकत्रितपणे साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump China Visit: इलाॅन मस्क समोर होते, तरी अमेरिकेने सर्वच डिजिटल उपकरणांची केली होळी; चीन दौऱ्यात नेमके असे काय घडले?
जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाचे बदलते प्रवाह लक्षात घेऊन दरवर्षी या दिवसाची संकल्पना (Theme) बदलत असते. यंदा, म्हणजेच वर्ष २०२६ साठी “डिजिटल लाईफलाईन्स: अ कनेक्टेड वर्ल्डमध्ये लवचिकता मजबूत करणे” (Digital Lifelines: Strengthening Resilience in a Connected World) ही अधिकृत थीम निश्चित करण्यात आली आहे. आज जगभरातील बँकिंग, आरोग्य सेवा, शिक्षण आणि आपत्कालीन व्यवस्थापन हे पूर्णपणे इंटरनेटच्या जाळ्यावर म्हणजेच अंडरवॉटर केबल्स, सॅटेलाईट आणि डेटा सेंटर्सवर अवलंबून आहेत. मात्र, हवामान बदल, चक्रीवादळे किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे ही संपर्क यंत्रणा कोलमडण्याचा धोका असतो. अशा संकटाच्या काळातही आपली डिजिटल नेटवर्क यंत्रणा कशी सुरक्षित आणि सक्षम राहील, यावर यंदा विशेष मंथन केले जात आहे.
How do #DigitalLifelines keep our lives running? World Telecommunication and Information Society Day #WTISD on 17 May invites us to look differently at the everyday technologies we take for granted. Learn more in @un_today: https://t.co/k5nLHOwwtN pic.twitter.com/a5fRpbfw9d — Int’l Telecommunication Union (@ITU) May 14, 2026
credit – social media and Twitter
भारताचा विचार केल्यास गेल्या एका दशकात देशाने दूरसंचार क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा पुरवणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. ५जी (5G) नेटवर्कचा वेगाने झालेला विस्तार आणि आता ६जी (6G) च्या दिशेने पडणारी पावले, यामुळे भारताने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज देशातील अगदी दुर्गम भागातील नागरिकही डिजिटल बँकिंग (UPI) आणि ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेत आहेत. ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेने टेलिकॉम क्षेत्राचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jaishankar Diplomacy : जयशंकर-अराघची भेट ठरली गेमचेंजर! भारतासाठी इराणने खोलला समुद्राचा रस्ता; युद्धखोर देशांना कडक चपराक
तंत्रज्ञानाने प्रगती केली असली, तरी आजही जगातील एका मोठ्या लोकसंख्येला इंटरनेट आणि आधुनिक साधनांचा लाभ घेता आलेला नाही. तांत्रिक कौशल्यांचा अभाव, महागडी उपकरणे आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे कोट्यवधी लोक अद्यापही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. ही ‘डिजिटल दरी’ मिटवून जगातील शेवटच्या माणसाला तंत्रज्ञानाशी जोडणे, हेच आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे (ITU) अंतिम ध्येय आहे. शिक्षण, आरोग्य आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये आयसीटीचा (ICT) वापर वाढवून शाश्वत विकास साधण्यासाठी आजचा दिवस संपूर्ण जगाला एकत्र येण्याचे आवाहन करतो.