Trump China Visit: इलाॅन मस्क समोर होते, तरी अमेरिकेने सर्वच डिजिटल उपकरणांची केली होळी; चीन दौऱ्यात नेमके असे काय घडले? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
US Delegation Discards Laptops China Visit : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिका आणि चीनमधील (US and China Relation) अंतर्गत वाद आणि अविश्वास आता एका अत्यंत टोकाच्या पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नुकत्याच पार पडलेल्या ऐतिहासिक चीन दौऱ्यानंतर एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. १३ ते १५ मे २०२६ या कालावधीत झालेल्या या दौऱ्यावरून परत येताच अमेरिकन शिष्टमंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी आपले महागडे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि अगदी अधिकृत ओळखपत्रे सुद्धा थेट कचऱ्यात फेकून दिली आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे जागतिक सुरक्षा वर्तुळात आणि राजनैतिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
अमेरिकन गुप्तहेर आणि सायबर सुरक्षा यंत्रणांना तीव्र संशय आहे की, चीनमध्ये असताना या उपकरणांमध्ये अत्यंत प्रगत आणि गुप्त स्पायवेअर किंवा मालवेअर प्लांट केले गेले असू शकतात. चीनची हॅकिंग सिस्टीम जगात सर्वात धोकादायक मानली जाते. जर ही उपकरणे वॉशिंग्टनमध्ये परत आणून अमेरिकेच्या मुख्य सरकारी नेटवर्क किंवा गोपनीय सर्व्हरशी जोडली गेली असती, तर अमेरिकेची अत्यंत संवेदनशील आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती थेट बीजिंगच्या हातात पडली असती. हा संभाव्य धोका मुळातून उपटून टाकण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी ही सर्व उपकरणे नष्ट करण्याचा कडक आदेश दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi: भारताकडे नेहमीच राहणार 30 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा साठा; मोदींचा UAE सोबत ‘असा’ महाकारार, भारताला मिळालं कवच
हा धोका लक्षात घेऊन अमेरिकन शिष्टमंडळ चीनमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच सज्ज झाले होते. शिष्टमंडळातील सदस्यांना त्यांचे मूळ वैयक्तिक आणि अधिकृत फोन तसेच लॅपटॉप अमेरिकेतच सुरक्षित ठेवण्यास सांगितले गेले होते. चीनच्या दौऱ्यासाठी त्यांना विशेषतः तयार केलेली ‘तात्पुरती’ किंवा ‘स्वच्छ उपकरणे’ (Clean Devices) पुरवण्यात आली होती. या उपकरणांमध्ये ट्रॅकिंग आणि हॅकिंग रोखण्यासाठी अत्यंत मर्यादित सॉफ्टवेअर लोड केलेले होते. चीनमधील संवाद केवळ याच नियंत्रित प्रणालीद्वारे केला जात होता आणि काम संपताच ही संपूर्ण यंत्रणा नष्ट करण्यात आली.
U.S. Delegation in China is under strict “digital lockdown” 🇺🇸🇨🇳 The entire U.S. delegation, led by President Trump, has left their personal smartphones, laptops, and tablets at home. Instead, officials, aides, and Secret Service personnel are using specially issued “clean” or… pic.twitter.com/qu33aA91ex — Visegrád 24 (@visegrad24) May 14, 2026
credit – social media and Twitter
चीनमध्ये सायबर सुरक्षेचे नियम इतके कडक आणि आक्रमक आहेत की, अमेरिकन अधिकाऱ्यांना तिथे साधं संभाषण करतानाही घाम फुटला. सामान्यतः वापरले जाणारे एनक्रिप्टेड अॅप्स किंवा क्लाउड सिंकिंग प्रणाली पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे शिष्टमंडळाला केवळ तात्पुरती खाती आणि अतिशय सुरक्षित चॅनेल्सचा वापर करावा लागला. अनेक वेळा तर डिजिटल हॅकिंगची भीती इतकी जास्त होती की, गोपनीय आणि अत्यंत महत्त्वाचे संदेश कोणत्याही फोनवर न पाठवता कागदावर लिहून किंवा प्रत्यक्ष भेटून एकमेकांपर्यंत पोहोचवावे लागले. अमेरिकेसाठी चीन हा डिजिटल जगातील सर्वात मोठा सुरुंग मानला जातो, त्यामुळे तिथे कोणताही डिजिटल ठसा उमटवणे म्हणजे स्वतःहून संकट ओढवून घेण्यासारखे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jaishankar Diplomacy : जयशंकर-अराघची भेट ठरली गेमचेंजर! भारतासाठी इराणने खोलला समुद्राचा रस्ता; युद्धखोर देशांना कडक चपराक
जवळपास नऊ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षांनी चीनचा दौरा केला होता. हा दौरा आधी मार्चमध्ये होणार होता, पण आखातातील इराण संकटामुळे तो मे महिन्यात आयोजित करण्यात आला. या तीन दिवसांच्या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्यापार युद्ध, आयात शुल्क, तैवानचा वाद, इराण युद्ध आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या गंभीर जागतिक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या दौऱ्यात ट्रम्प यांच्यासोबत इलॉन मस्क यांच्यासारखे बडे टेक उद्योगपतीही होते. मात्र, वरून कितीही शांतता आणि करार दिसत असले, तरी पडद्यामागे अमेरिकेला चीनवर अजिबात विश्वास नाही, हेच या गॅजेट्स नष्ट करण्याच्या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.
Ans: चीनच्या गुप्तहेर यंत्रणांनी या उपकरणांमध्ये स्पायवेअर किंवा मालवेअर टाकून अमेरिकेची गोपनीय माहिती चोरू नये, म्हणून सायबर सुरक्षेसाठी ही उपकरणे नष्ट करण्यात आली.
Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील हा ऐतिहासिक द्विपक्षीय दौरा १३ ते १५ मे २०२६ या कालावधीत चीनमध्ये पार पडला.
Ans: अमेरिकन शिष्टमंडळ त्यांचे मूळ फोन अमेरिकेत ठेवून गेले होते आणि चीनमध्ये त्यांनी केवळ विशेष नियंत्रित आणि तात्पुरते 'स्वच्छ फोन' (Clean Devices) वापरले.






