
आर्यन्स बुद्धिबळ अकादमी यांच्यावतीने आयोजन
११ वर्षीय अद्विक हा निमझो इंडियन पद्धतीने आपल्या डावाला सुरवात करत ३५ चालींमध्ये सुयोगवर विजय मिळवला. अद्विक हा इनोव्हेशन अकादमीत सहावी इयत्तेत शिकत असून जीएम शार्दूल गगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तर, महाराष्ट्राच्या कशिश जैनने पश्चिम बंगालच्या श्रीजित पॉलचा ८ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. महाराष्ट्राच्या प्रथमेश शेरलाने पश्चिम बंगालच्या संकेत चक्रवर्तीचा पराभव करून ७.५ गुण, ५५.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या जोरावर तिसरे स्थान पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या अद्विक अग्रवाल याला करंडक व १५,००० रुपये, उपविजेत्या कशिश जैनला करंडक व १०,१०० रुपये आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या प्रथमेश शेरलाला करंडक व ७,०००रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीडीसीसीचे सह सचिव विवेक भागवत, पीडीसीसीचे खजिनदार राजेंद्र शिदोरे, एफडीएच्या सह आयुक्त प्रीती टिपरे, पीडीसीसीचे कार्यकारी समितीचे सदस्य केतन खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमकेएनएसच्या प्राचार्या वर्षा कोकिल, स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष वंदना हलकुडे, स्पर्धेचे आयोजन सचिव नागनाथ हलकुडे, स्पर्धा संचालक योगेश महामुनी, पीडीसीसीचे कार्यक्रम समितीचे सदस्य अभिजीत जोशी चीफ आरबीटर नितीन शेणवी आणि डेप्युटी चीफ आरबीटर आयए आम्रीश तल्लू आदी उपस्थित होते.
सुयोग वाघ(७गुण)(महाराष्ट्र)पराभूत वि.अद्विक अग्रवाल(८.५गुण)(महाराष्ट्र), कशिश जैन(8गुण)(महाराष्ट्र) वि.श्रीजित पॉल(7गुण) (पश्चिम बंगाल), मोहम्मद इम्रान(७गुण)(आंध्रप्रदेश) सोबती वि.श्लोक शरणार्थी(७ गुण)(महाराष्ट्र), संकेत चक्री(६.५गुण)(पश्चिम बंगाल)पारभूत वि. प्रथमेश शेरला(७.५गुण)(महाराष्ट्र), भवन कोल्ला(६.५गुण)(आंध्रप्रदेश)परभूत वि.निखिल दिक्षित(७.५गुण)(महाराष्ट्र), सौरभ म्हामणे(६.५गुण)(महाराष्ट्र)परभूत वि.अविरत चौहान(७.५गुण)(महाराष्ट्र), अर्णव खेरेडेकर(६गुण)(महाराष्ट्र) पराभूत वि. वीरेश शरणार्थी(७गुण)(महाराष्ट्र), यश कपाडी(७गुण)(महाराष्ट्र) वि.वि.मट्टा विनय कुमार(६गुण)(तेलंगणा)
आरव धायगुडे (६गुण)(महाराष्ट्र)पराभूत वि.अंबरिश शर्मा (७गुण); शितिज प्रसाद(७गुण)(महाराष्ट्र) वि.वि. संकर्षा शेळके(६गुण)(महाराष्ट्र), परमार्थ मित्रा (६गुण)(पश्चिम बंगाल)परभूत वि. प्रणित कोठारी (७गुण), निहिरा कौल(६गुण)(महाराष्ट्र)परभूत वि.भुवन शितोळे(७गुण)(महाराष्ट्र);
शंकर स्वराज (६ गुण) (महाराष्ट्र) पराभूत वि. सात्विक डीएसएसयू (७ गुण) (आंध्र प्रदेश), निर्गुण केवल (७ गुण) (महाराष्ट्र) वि. सोहम पवार (६ गुण) (महाराष्ट्र), भुवन कोन्नूर (६ गुण) (महाराष्ट्र) पराभूत वि. ओम लामाके (७ गुण) (महाराष्ट्र).
Ans: महाराष्ट्राच्या ११ वर्षीय अद्विक अग्रवाल याने ८.५ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत स्वर्गीय भारतबाई हलकुडे मेमोरियल अनस्टॉपेबल एलबीएचएम ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
Ans: महाराष्ट्राच्या कशिश जैनने ८ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर महाराष्ट्राच्याच प्रथमेश शेरला याने ७.५ गुण आणि ५५.५ बुकोल्स कट गुणांच्या सरासरीच्या जोरावर तिसरे स्थान पटकावले.