Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chess Cometition: अमेरिकेत बारावीचे शिक्षण अन् पुण्यात बुद्धिबळाचा बादशहा! मोहम्मद इम्रानने पटकावले विजेतेपद

Chess Cometition: आंध्रप्रदेशच्या भवन कोल्लाने चंदीगडच्या गगन साहूला बरोबरीत रोखत ७.५ गुणांसह उपविजेतेपद मिळविले. महाराष्ट्राच्या प्रथमेश शेरलाने तामिळनाडूच्या अधविक देव ए.के. याचा पराभव करत ७ गुणांची कमाई केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 16, 2026 | 09:45 PM
भवन कोल्ला उपविजेता, प्रथमेश शेरला तिसरा

भवन कोल्ला उपविजेता, प्रथमेश शेरला तिसरा

Follow Us
Follow Us:
  • मोहम्मद इम्रानचे बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद
  • नवव्या फेरीअखेर ९ गुणांसह आंध्रप्रदेशच्या खेळाडूची बाजी
  • भवन कोल्ला उपविजेता, प्रथमेश शेरला तिसरा
Chess Cometition: आर्यन्स बुद्धिबळ अकादमीच्या वतीने स्वर्गीय भारतबाई हलकुडे मेमोरियल एलबीएचएम बुद्धिबळ महोत्सव तसेच स्वर्गीय प्रकाश कुंटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित अखिल (Pune) भारतीय खुल्या फिडे बुद्धिबळ स्पर्धेत आंध्रप्रदेशच्या मोहम्मद इम्रानने विजेतेपद पटकावले. नवव्या फेरीअखेर ९ गुणांची कमाई करत त्याने स्पर्धेत आपली आघाडी कायम ठेवली.

कोंढवा येथील मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या नवव्या आणि अंतिम फेरीत पहिल्या पटावरील लढतीत मोहम्मद इम्रानने तामिळनाडूच्या सुदर्शन बालाजीचा पराभव केला. किंग्ज इंडियन ओपनिंग पद्धतीने डावाची सुरुवात करणाऱ्या इम्रानने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत ४२ चालींमध्ये सुदर्शनवर मात केली. या विजयासह त्याने ९ गुणांसह स्पर्धेतील अव्वल स्थान निश्चित केले. मोहम्मद इम्रान सध्या अमेरिकेत बारावी इयत्तेत पीसीएम विषयांचे शिक्षण घेत आहे. बुद्धिबळातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले.

Chess: पुण्यात रंगणार बुद्धिबळाचा थरार! १२०० खेळाडू एकाच व्यासपीठावर, १० नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात

 विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

आंध्रप्रदेशच्या भवन कोल्लाने चंदीगडच्या गगन साहूला बरोबरीत रोखत ७.५ गुणांसह उपविजेतेपद मिळविले. महाराष्ट्राच्या प्रथमेश शेरलाने तामिळनाडूच्या अधविक देव ए.के. याचा पराभव करत ७ गुणांची कमाई केली. तसेच ५१.५ बुकोल्स कट गुणसरासरीच्या आधारे त्याने स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. स्पर्धेतील विजेता मोहम्मद इम्रान याला करंडक आणि ६० हजार १०० रुपये, उपविजेता भवन कोल्ला याला करंडक व ४० हजार रुपये, तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या प्रथमेश शेरला याला करंडक व २५ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीडीसीसीचे सहसचिव विवेक भागवत, पीडीसीसीचे खजिनदार राजेंद्र शिदोरे, एफडीएच्या सहआयुक्त प्रीती टिपरे आणि पीडीसीसी कार्यकारी समितीचे सदस्य केतन खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमकेएनएसच्या प्राचार्या वर्षा कोकिल, स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्षा वंदना हलकुडे, स्पर्धेचे आयोजन सचिव नागनाथ हलकुडे, स्पर्धा संचालक योगेश महामुनी, पीडीसीसी कार्यक्रम समितीचे सदस्य अभिजीत जोशी, चीफ आर्बिटर नितीन शेणवी आणि डेप्युटी चीफ आर्बिटर आयए आम्रीश तल्लू आदी उपस्थित होते.

जिद्दीपुढे अडचणीही फिक्या! १०६ विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय Chess स्पर्धेत सहभाग; गौरव फुलसुंदर अव्वल

💡

Frequently Asked Questions

  • Que: अखिल भारतीय खुल्या फिडे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले?

    Ans: आंध्र प्रदेशच्या मोहम्मद इम्रानने विजेतेपद पटकावले. नवव्या आणि अंतिम फेरीअखेर त्याने ९ गुणांची कमाई केली.

  • Que: मोहम्मद इम्रानने अंतिम फेरीत कोणत्या खेळाडूचा पराभव केला?

    Ans: मोहम्मद इम्रानने अंतिम फेरीतील पहिल्या पटावरील लढतीत तामिळनाडूच्या सुदर्शन बालाजीचा पराभव केला.

Web Title: Andhra pradesh mohmmed imran wins open fide chess competition in pune sports tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Chess
  • Chess Championship
  • Pune Sports News

संबंधित बातम्या

Table Tennis: नादच खुळा! Gourav Rao ने जिंकले ‘या’ स्पर्धेचे विजेतेपद; मोहित सोरडे याचा ६-१ अन् थेट…
1

Table Tennis: नादच खुळा! Gourav Rao ने जिंकले ‘या’ स्पर्धेचे विजेतेपद; मोहित सोरडे याचा ६-१ अन् थेट…

Chess Championship : वीर-हृदयची सात गुणांची ‘चेकमेट’
2

Chess Championship : वीर-हृदयची सात गुणांची ‘चेकमेट’

पुणे शहरात Football चा थरार! ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश; खडकी ब्ल्युज्‌ संघाने थेट…
3

पुणे शहरात Football चा थरार! ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश; खडकी ब्ल्युज्‌ संघाने थेट…

Chess Championship: बुद्धिबळाच्या पटावर डावपेचांचा धडाका! ३८७ खेळाडूंचा बुद्धीसंग्राम; सहा गटांत आघाडीसाठी काट्याची टक्कर
4

Chess Championship: बुद्धिबळाच्या पटावर डावपेचांचा धडाका! ३८७ खेळाडूंचा बुद्धीसंग्राम; सहा गटांत आघाडीसाठी काट्याची टक्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.