Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Games 2024-25 : ज्युदोत महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडेचे सुवर्ण यश; आकांक्षा शिंदेला रौप्यपदक

38th National Games 2024-25 : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडेने सुवर्णपदकाची कमाई करीत मोठी कामगिरी केली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 11, 2025 | 03:52 PM
38th National Games 2024-25 : ज्युदोत महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडेचे सुवर्ण यश; आकांक्षा शिंदेला रौप्यपदक

38th National Games 2024-25 : ज्युदोत महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडेचे सुवर्ण यश; आकांक्षा शिंदेला रौप्यपदक

Follow Us
Follow Us:

देहरादून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ज्युदोमध्ये महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडे हिने सुवर्णपदक, तर आकांक्षा शिंदे हिने रौप्यपदकाची कमाई केली. मोनल संकुलात सुरू असलेल्या ज्युदो स्पर्धेत महिलांच्या ५२ किलो गटात श्रद्धा हिने अंतिम लढतीत मेहरुख मकवाना या गुजरातच्या खेळाडूवर एकतर्फी विजय मिळविला.‌
राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदके
या स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे. यापूर्वी तिने वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याखेरीज तिने आफ्रिकन खुल्या स्पर्धेतही एक रौप्य व एक कांस्यपदक जिंकले आहे. १९ वर्षाची श्रद्धा ही यशपाल सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली छ्त्रपती संभाजीनगर येथील प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. तिचे वडील कडूबा हेदेखील राष्ट्रीय कुस्ती व जुदोपटू आहेत त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन तिने ज्युदोमध्ये करिअर केले आहे. सुवर्णपदक जिंकण्याची मला खात्री होती. कारण पॅरिस येथे नुकतेच मी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सराव शिबिरात अद्यावत प्रशिक्षण घेतले आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील माझी कामगिरी सातत्यपूर्ण झाली आहे, असे श्रद्धा हिने सांगितले.
आकांक्षाची कडवी झुंज
४८ किलो गटाच्या अंतिम लढतीत आकांक्षा शिंदे हिने उत्तर प्रदेशच्या अस्मिता डे हिला कडवी लढत दिली. मात्र, अस्मिताने अडीच मिनिटांनंतर एका गुणांची कमाई करीत गुणांचे खाते उघडले. त्यानंतर आकांक्षाने गुण मिळविण्यासाठी जीवाचे रान केले. मात्र, बचावात्मक पवित्रा घेतलेल्या अस्मिताने आकांक्षाला गुण मिळणार नाही याची दक्षता घेत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. आकांक्षाला अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आकांक्षा ही नाशिकची खेळाडू असून तिने या स्पर्धेत प्रथमच पदक जिंकले आहे. यापूर्वी तिने विविध वयोगटातील गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत अर्धा डझन पदके जिंकली आहेत. नाशिक येथील एच ए एल महाविद्यालयात ती वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम करीत आहे. १९ वर्षीय खेळाडू आकांक्षा हिचे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आहे.
महाराष्ट्राच्या श्रावण शेडगेचा पराभव
पुरुषांच्या ६० किलो गटातील कांस्यपदकाच्या लढतीत महाराष्ट्राच्या श्रावण शेडगे हिला उत्तर प्रदेशच्या मोनी शर्मा याच्याकडून पराभव पत्करावा लागला. या लढतीत श्रावण याने मोनी याला चिवट लढत दिली. मात्र, सडनडेथपर्यंत झालेल्या लढतीत गोल्डन स्कोअरच्या जोरावर मोनीने बाजी मारत कांस्यपदक जिंकले.

हेही वाचा : 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25; जिम्नॉस्टिक्समध्ये महाराष्ट्राची रूपेरी कामगिरी

Web Title: 38th national games 2024 25 maharashtras shraddha chopde wins gold in judo akanksha shinde wins silver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • 38th National Games
  • gold medal
  • maharashtra
  • National Games
  • Silver Medal
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.