Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध टी२० सिरीजसाठी सिलेक्टर्सने संजू सॅमसन, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गजांना संघात पुन्हा घेतलंय. टीममध्ये एकूण ८ बदल करण्यात आले आहेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 02, 2026 | 10:24 AM
अफगाणिस्तानविरूद्ध सिरीजसाठी दिग्गजांचा समावेश (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अफगाणिस्तानविरूद्ध सिरीजसाठी दिग्गजांचा समावेश (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी२० सिरीज 
  • भारतीय संघात ८ मोठे बदल 
  • श्रेयर अय्यरची टीम झाली आता अधिक मजबूत 
IND vs AFG: झिम्बाब्वे दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी दिल्यानंतर, भारतीय निवड समितीने १३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी एक मजबूत संघ जाहीर केला आहे. इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या पराभवानंतर संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

पहिल्यांदाच इंग्लंड आणि आयर्लंडविरूद्ध भारतीय संघाला टी२० सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. ही अत्यंत लाजिवरवाणी बाब होती. मात्र आता या सिरीजनंतर अफगाणिस्तानविरूद्ध पुन्हा एकदा बलाढ्य संघ खेळायला मैदानात उतरणार आहे. सिलेक्टर्सने अनुभवी खेळाडूंना संघात घेतले असून चाहत्यांचे लक्ष आता या सिरीजकडे लागले आहे. 

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

संजू सॅमसनचे पुनरागमन

या नवीन संघात सर्वाधिक चर्चेत असलेले पुनरागमन म्हणजे यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनचे. जेव्हा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशी आणि प्रभसिमरन सिंग यांना संधी देण्यात आली, तेव्हा क्रिकेट चाहत्यांना वाटले होते की त्याला संघातून वगळण्यात आले आहे. आता, सॅमसनच्या पुनरागमनामुळे सलामीच्या जागेसाठीची स्पर्धा पुन्हा एकदा रंजक झाली आहे.

जसप्रीत बुमराहदेखील परतला

वैद्यकीय पथकाकडून अंतिम तंदुरुस्तीची परवानगी मिळाल्यानंतर, वेगवान गोलंदाजीला बळकटी देण्यासाठी जसप्रीत बुमराहचेही टी-२० आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. फिरकी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचाही संघात समावेश करण्यात आला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातील त्याच्या अनुपस्थितीदरम्यान, निवड समिती आरसीबीच्या कृणाल पांड्याकडे पाहू शकते अशा अफवा होत्या, पण अक्षरने आपले स्थान पुन्हा मिळवले आहे.

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

कोणते खेळाडू संघात परतले?

संघात परतलेल्या प्रमुख खेळाडूंमध्ये संजू सॅमसन, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे. संघातून वगळण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव आणि प्रभसिमरन सिंग यांचा समावेश आहे. 

भारतीय संघ कसा असेल?

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सैमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितिश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा

Web Title: 8 changes in team india against afghanistan series sanju samson axar patel bumrah included in squad ind vs afg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • IND vs AFG
  • India vs Afghanistan
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
1

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
2

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?
3

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…
4

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.