Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC Final : मिचेल स्टार्कने रचला इतिहास; मोहम्मद शमीचा विक्रम मोडून दिला मोठा झटका.. 

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यातदरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने २ विकेट्स घेऊन भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीचा विक्रम मोडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 12, 2025 | 07:03 PM
WTC Final: Mitchell Starc creates history; breaks Mohammed Shami's record, inflicts a big blow..

WTC Final: Mitchell Starc creates history; breaks Mohammed Shami's record, inflicts a big blow..

Follow Us
Close
Follow Us:

WTC Final : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या दिवशी स्टिव स्मिथ आणि ब्यू वेबस्टर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सर्वबाद २१२ धावा करू शकला. साऊथ आफ्रिकेचा वेगवान रबाडाने अंतिम सामन्यात ५ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला जेरीस आणले. सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशीच साऊथ आफ्रिकेवर फलंदाजी करण्याची वेळ आली. आता साऊथ आफ्रिका फलंदाजी करत आहे. त्यांचे ५ फलंदाज माघारी गेले आहेत. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीच्या एका विक्रमाला मागे टाकले आहे.

मोहम्मद शमीचा विक्रम काढला मोडीत..

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ च्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी एक इतिहास रचला आहे.  स्टार्कने आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर ही ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. स्टार्कने या सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत अंतिम सामन्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा विक्रम त्याने मोडला आहे.

हेही वाचा : अबब! ९० चेंडूंत १९० धावा, Vaibhav Suryavanshi च्या बॅटने ओकली आग! गोलंदाजांचा घेतला चांगलाच समाचार..

मिचेल स्टार्कने या सामन्यात आतापर्यंत दोन विकेट्स घतेल्या आहेत. आता त्याच्याकडे ५ आयसीसी फायनलमध्ये ११ बळी जमा झाले आहेत, ज्यामुळे तो आता या यादीत पहिल्या स्थानावर आला आहे. यापूर्वी, मोहम्मद शमी ४ आयसीसीच्या अंतिम सामन्यात १० बळी घेऊन पहिल्या क्रमांकावर होता. परंतु आता स्टार्कने त्याचा विक्रम मोडीत काढला आहे. अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी, त्याने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्यांना सुरुवातीलाच मोठे धक्के दिले आहेत.  त्याने  एडेन मार्करामला भोपळा देखील फोडू न देता माघारी पाठवले आहे. तसेच रायन रिकेलटनला देखील स्टार्कने १६ धावांवर असताना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

हेही वाचा : इंग्लंडचे कोच ब्रेंडन मॅक्युलमचे भारतीय संघाला चॅलेंज! भारताने चांगली तयारी केली असेल, पण…

मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाला खेळात परत आणले

या सामन्यात, स्टार्कच्या गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेवर चांगलाच दबदबा राखला. ज्यामुळे पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेची ४३ धावांवर ४ बळी अशी स्थिति झाली होती.  ज्यामुळे, पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया २१२ धावांवर सर्वबाद  झाल्यानंतर, स्टार्कच्या नेतृत्वाखालील गोलंदाजीने जोरदार  पुनरागमनाचा मार्ग दाखवून दिला.

सामन्याची स्थिती

ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवशी २१२ वर सर्वबाद झाली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवशी सुरवातीलाच मोठे धक्के बसले साऊथ आफ्रिकेचा वेगवान रबाडाने अंतिम सामन्यात ५ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला चांगलेच  जेरीस आणले. त्यांनंतर साऊथ आफ्रिका संघ मैदानात फलंदाजीसाठी मैदनात उतरले. परंतु यांची सुरवात चांगली झाली नाही. मिचेल स्टार्कने  एडेन मार्कराम आणि रायन रिकेलटनला(१६ धावा) देखील स्टार्कने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर,  वियान मुल्डरला(४४ चेंडू ६ धावा) कर्णधार पॅट कमिन्सने बाद केले. तसेच धोकादायक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला २ धावांवर बाद केले. त्यांतर कर्णधार टेम्बा बावुमा आणि डेव्हिड बेडिंगहॅम यांनी डाव सवरण्याचा प्रयत्न केला. टेम्बा बावुमाला पॅट कमिन्सने मंगहरी धाडले. त्याने ८४ चेंडूचा सामना करत ३६ धावा केल्या. तर आता डेव्हिड बेडिंगहॅम २९ धावांवर तर काइल व्हेरेन ११ धावांवर खेळत आहे.

Web Title: 897565wtc final mitchell starc creates history breaks mohammed shamis record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • Mitchell Starc
  • Mohammad Shami
  • SA vs AUS
  • WTC 2025 Final

संबंधित बातम्या

IPL 2026 Retention: “हस, तू लखनऊमध्ये आहेस…”LSG चे मालक संजीव गोयंकांकडून Mohammad Shami चे ‘खास’ स्वागत 
1

IPL 2026 Retention: “हस, तू लखनऊमध्ये आहेस…”LSG चे मालक संजीव गोयंकांकडून Mohammad Shami चे ‘खास’ स्वागत 

IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले 
2

IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले 

SRH कडून मोहम्मद शमीचा व्यापार! हा स्टार वेगवान ‘या’ संघाकडून उतरणार मैदानात; किती कोटी मोजावे लागले?
3

SRH कडून मोहम्मद शमीचा व्यापार! हा स्टार वेगवान ‘या’ संघाकडून उतरणार मैदानात; किती कोटी मोजावे लागले?

IND vs SA 1st Test : जसप्रीत बुमराह एक्सप्रेस सुसाट! मोहम्मद शमीला पिछाडीवर टाकत केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच भारतीय.. 
4

IND vs SA 1st Test : जसप्रीत बुमराह एक्सप्रेस सुसाट! मोहम्मद शमीला पिछाडीवर टाकत केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच भारतीय.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.